अबब! बॉलीवूडच्या स्टार्सच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

अबब! बॉलीवूडच्या स्टार्सच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

बॉलीवूड स्टार्सचं लग्न हा त्यांच्या चाहत्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय. कोणते स्टार्स कधी लग्न करणार आणि कोणाबरोबर लग्न करणार इथपासून ते अगदी लग्नानंतर बॉलीवूड अभिनेत्री मंगळसूत्र घालणार की नाही इथपर्यंत चर्चांना उधाण येतं. आजपर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक लग्न गाजली. काही जणांनी अगदी प्रायव्हेट सोहळ्यात लग्न केलं तर काहींनी धुमधडाक्यात लग्न केलं. यापैकी काही बॉलीवूड अभिनेत्रींची अगदी मंगळसूत्रदेखील गाजली. कारण या मंगळसूत्रांची किंमत ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. या किंमतीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील एखाद्या मुलाचं शिक्षणही पूर्ण होऊ शकतं इतकी याची किंमत आहे. तुम्हालाही याची किंमत जाणून घ्यायची असेल तर आम्ही खास तुम्हाला याची माहिती देणार आहोत. 

अनुष्का शर्मा

Instagram

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं लग्न खूपच गाजलं. इटलीला जाऊन या दोघांनी लग्न केलं. कोणालाही याची कल्पना येऊ न देता केवळ कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं. पण अनुष्काच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. सर्वात महाग मंगळसूत्र अनुष्काने विकत घेतलं. तिच्या मंगळसूत्राची किंमत ही 53 लाख असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनुष्का आणि विराटने लग्न करून आल्यानंतर आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी खास पार्टीही दिली होती. यामध्ये अनुष्काने नेहमीच गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. अनुष्का अतिशय प्रायव्हेट व्यक्ती असल्याने तिने आपल्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितलं नव्हतं. 

ऐश्वर्या राय

Instagram

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचंही लग्न तेव्हा खूपच गाजलं. लग्न मुंबईतच झालं असलं तरीही जास्त लोकांना या लग्नाचं आमंत्रण नव्हतं. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचीही बरीच चर्चा झाली होती. ऐश्वर्याच्या लग्नाचे अनेक फोटो त्यावेळी व्हायरल झाले होते. तीन हिऱ्यांच्या वेगळ्या अशा या मंगळसूत्राची किंमत साधारण 48 लाख सांगण्यात आली होती. ऐश्वर्याने बरेच वेळा हे मंगळसूत्र घातलं आहे. आता त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असली तरीही त्यावेळी ही किंमत खूपच जास्त होती. 

शिल्पा शेट्टी

Instagram

शिल्पा शेट्टीने लंडनमध्ये जाऊन बिग ब्रदर हा रियालिटी शो तर जिंकला त्याचबरोबर तिने  राज कुंद्राचं मनही जिंकलं. राजने शिल्पासाठी आपल्या पहिल्या बायकोपासून फारकत घेतली. त्यावेळी शिल्पा आणि राजचं लग्न खूपच गाजलं होतं. राज कुंद्रा हा उद्योजक असून त्याने शिल्पासाठी साधारण 32 लाखाचं मंगळसूत्र बनवून घेतलं. त्यांच्याही लग्नाला आता बरीच वर्ष झाली असून शिल्पा 13 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत असल्याचं तिनं नुकतंच घोषित केलं आहे. तर शिल्पा बरेचदा आपलं हे महागडं मंगळसूत्र घालताना दिसते. प्रत्येक वर्षी करवाँ चौथला शिल्पा भारतीय परंपरेनुसार सजलेली दिसून येते. 

सोनम कपूर

Instagram

मागच्याच वर्षी लग्न झालेली सोनम कपूर ही बॉलीवूडमधील फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. लंडनमधील आनंद आहुजा या उद्योजकासह सोनमने लग्नगाठ बांधली. सोनमच्या मंगळसूत्राची किंमत ही साधारण 27 लाख असून ते वेगळ्या तऱ्हेने बनवून घेण्यात आलं होतं. त्यामुळे या मंगळसूत्राची खूपच चर्चा झाली. हिऱ्यांच्या या मंगळसूत्रामध्ये सोनमने आपल्या नवऱ्याचंही नाव कोरून घेतलं आहे. सोनम लवकरच भारत सोडून लंडनमध्ये स्थिरावण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. 

काजोल

Instagram

काजोल आणि अजय देवगण यांनी 20 वर्षांपूर्वी लग्न केलं. त्यावेळी अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने यांचं लग्न झालं. कुटुंबातील माणसं आणि जवळील मित्रपरिवाराच्या उपस्थित यांनी लग्न केलं. त्यावेळी अजयने काजोलला घातलेल्या मंगळसूत्राची किंमत ही 24 लाख रूपये होती असं म्हटलं जातं. काजोल ही घरसंसार सांभाळणारी असून अजयबरोबरील संसार तिने आता 20 वर्ष सांभाळला आहे. शिवाय आजही ही जोडी अनेक ठिकाणी एकत्र दिसली की, त्यांच्यातील प्रेम आणि बाँड दिसून येतो. 

दीपिका पादुकोण

रणवीर सिंगबरोबर दीपिकाने गेल्याच वर्षी लग्न केलं. हे लग्न खूपच गाजलं. या दोघांचे फोटो मिळण्यासाठी मीडियानेही खूप प्रयत्न केले होते. पण इटलीमध्ये हे लग्न अतिशय खासगी पद्धतीने करण्यात आलं. दीपिकाने आपल्यासाठी साधारण 20 लाख रूपयांचं मंगळसूत्र घेतलं आहे. इतकंच नाही तर तिच्या लग्नाच्या वेळी प्रसिद्ध झालेल्या लेखांमध्ये साधारण 1 कोटी रूपयांचे दागिने तिने विकत घेत असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण दीपिका आणि रणवीर हे नेहमीच आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात आणि दीपिकाही आपलं मंगळसूत्र बऱ्याचदा घालताना दिसते. 

माधुरी दीक्षित

Instagram

माधुरी दीक्षितने राम नेने यांच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेऊन अनेक चाहत्यांचं मन मोडलं होतं. अचानक तिने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. माधुरीचं लग्नही खासगी पद्धतीनेच झालं होतं. माधुरीच्या मंगळसूत्राची किंमत ही 9 लाख रूपये असल्याचं सांगण्यात येतं. माधुरीनेही मराठमोळ्या पद्धतीनेच लग्न केलं. काही वर्ष अमेरिकेत राहून आल्यानंतर पुन्हा एकदा तिने बॉलीवूडमध्ये पाय रोवले आणि आता अनेक रियालिटी शो चं परीक्षण करताना माधुरी दिसते.