आपला गुड लक चार्म घेऊनच घराबाहेर निघतात ‘हे’ बॉलीवूड स्टार्स

आपला गुड लक चार्म घेऊनच घराबाहेर निघतात ‘हे’ बॉलीवूड स्टार्स

यशस्वी होण्यासाठी नक्कीच कष्ट करावे लागतात. हे सर्वांनाच माहीत आहे. प्रतिभा आणि मेहनत ही नक्कीच तुमच्यापर्यंत यश खेचून आणतं. पण या सगळ्यानंतरही नशीब हा महत्त्वाचा भागही असतो असे मानणारे बरेच जण आहेत. यामध्ये बॉलीवूडमधील कलाकारही मागे नाहीत. नशीब चांगलं असेल तर राजाचा रंक होतो आणि मेहनतीच्या बरोबरीने रंकाचा राजाही होतो. पण त्यासाठी नशीबाची साथही लागते. तुम्हाला जर असं वाटत असेल की, आपल्यासारखे सामान्य लोक हे नशीब आणि अंधविश्वासाला बळी पडतात तर असं काहीही नाही. आपण ज्या बॉलीवूड कलाकारांना आदर्श मानतो असे काही कलाकार आहेत जे आपल्या लकी चार्मशिवाय घराबाहेरही पडत नाहीत. हा लकी चार्म त्यांच्याबरोबर असल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडणं योग्यही वाटत नाही आणि आता त्यांच्या चाहत्यांनाही याची सवय झाली आहे. जाणून घेऊया असे कोणते कलाकार आहेत जे या लकी चार्मवर विश्वास ठेवतात आणि असा लकी चार्म कायम त्यांच्याबरोबर असतो. 

बॉलीवूड सेलिब्रिटीज आणि त्यांचे गुड लक चार्म्स

आपल्या चित्रपटासाठी काही ठराविक अक्षर वापरणं अथवा हातात बऱ्याच माळा घालून फिरणं अशी अनेक उदाहरणं आहेत. असे बरेच सेलिब्रिटी आहेत. आम्ही तुम्हाला इथे अशाच काही सेलिब्रिटीबद्दल सांगणार आहोत, जे कित्येक वर्षापासून आपला गुड लक चार्म आपल्यापासून दूर ठेवत नाहीत.  तर कायम त्यांच्याजवळ असतो. 

सलमान खान

Instagram

सलमान खानच्या लकी चार्मबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. सलमान कुठेही कोणत्याही पार्टीत असो वा चित्रपटात असो.  त्याच्या हातातील सिल्व्हर आणि फिरोजी खडा असलेलं ब्रेसलेट कायम असतं. सलमान त्याच्या उजव्या हातात नेहमी हे ब्रेसलेट घालतो. हे ब्रेसलेट सलमान कधीही काढत नाही. हे  त्याला त्याच्या वडिलांनी दिलेलं असल्यामुळे त्याच्यासाठी हे खास आहे. सलमानची ही स्टाईल इतकी प्रसिद्ध आहे की, अशा तऱ्हेचे अनेक ब्रेसलेट्स आता बाजारात विकायलाही आले आहेत. 

अमिताभ बच्चन

Instagram

आपलं प्रॉडक्शन हाऊस एबीसीएल डबघाईला आल्यानंतर अमिताभ बच्चन यांना फारच नुकसान झालं होतं. यामुळे त्यांच्या संपत्तीपैकी अनेक संपत्ती जप्तदेखील झाली होती. अमिताभ नेहमी नीलम खड्याची अंगठी वापरायचे. ती तुटल्यानंतर त्यांना या सगळ्याला सामोरं जावं लागलं होतं. उजव्या हातातील मधल्या बोटात त्यांनी ही अंगठी कायम घातली होती. पण पुन्हा ही अंगठी घातल्यानंतर त्यांचं नशीब पलटलं असं म्हटलं जातं. त्यानंतर त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो साईन केला आणि पुन्हा एकदा चांगले दिवस त्यांच्या आयुष्यात परत आले असं म्हटलं जातं. अमिताभ बच्चन मेहनतीसह या अंगठीलादेखील आपला लकी चार्म मानतात. 

जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कोणते पदार्थ ठरतात फायदेशीर आणि घातक

शाहरुख खान

Instagram

बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानचे '555' या क्रमांकावर खूपच प्रेम आहे. सगळ्यांनाच याबाबत माहीत आहे. तुम्हाला हे कळल्यानंतर आश्चर्य वाटेल की, आपल्या आवडता नंबर नसणारी कार शाहरूख खान कधीही चालवत नाही. इतकंच नाही तर चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस' च्या चित्रीकरणादरम्यान वापरण्यात येणाऱ्या बाईक्सच्या लायसन्स नंबर प्लेटदेखील शाहरूख खानने बदलून '555' करून घेतल्या होत्या. 

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

रणवीर सिंह

Instagram

रणवीर सिंह लहानपणापासूनच आपल्या पायावरील खोटेजवळ काळा धागा बांधून ठेवतो. त्याच्या आईची इच्छा म्हणून तो कधीही हा काळा धागा काढत नाही. लहानपणी रणवीर खूपच आजारी असायचा, त्यामुळे त्याच्या आईने हा धागा बांधला आणि तेव्हापासून त्याच्या निरोगी आयुष्यासाठी त्याची आई हा धागा बांधून ठेवते. तिच्या इच्छेसाठी रणवीर कायम हा लकी चार्म आपल्या पायावर बांधून ठेवतो. 

दीपिका पादुकोण

Instagram

रणवीर निरोगी आयुष्यासाठी धागा बांधतो तर दीपिकाची मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीवर अपार श्रद्धा आहे. मागच्या काही वर्षांपासून दीपिका आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला नक्की जाते. इतकंच नाही तर रणवीरशी लग्न झाल्यानंतरही सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे जोडपं एकत्र गेलं होतं. 

राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती

ऋतिक रोशन

Instagram

आपल्या सगळ्यांकडे काही ना काही विशेष गोष्टी असतात. काही दोषही असतात. पण ऋतिक रोशनकडून आपले  दोषदेखील कसे जवळ करायचे हे शिकायला हवं. हृतिक रोशनला एक अंगठा जास्त आहे. पण अनेक लोकांच्या सल्ल्यानंतरही त्याने हे बोट काढण्यासाठी सर्जरी न करण्याचं ठरवलं. त्याच्यासाठी त्याचा हा अंगठा लकी चार्म आहे. हृतिकला आपल्या या अंगठ्याचा अभिमान वाटतो. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.