'या' बॉलीवूड कलाकारांचे आहेत राजघराण्याशी संबंध

'या' बॉलीवूड कलाकारांचे आहेत राजघराण्याशी संबंध

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे संबंध राजघराण्यासोबत आहेत. राजघराण्यातील लोकांचा थाटमाट काही औरच असतो. आजही अशी अनेक राजघराणी आहेत ज्यांचे वंशज त्याच थाटमाटात राहतात. काही बॉलीवूड कलाकारांचेही या राजघराण्यांशी खास नातं आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीज या राजकुमार आणि राजकुमारी आहेत.  राजघराण्याचे वंशज असल्यामुळे या बॉलीवूड कलाकारांना समाजात खास मानसन्मान मिळतो. त्यामुळे हे सेलिब्रेटीज आजही तितक्याच ऐटीत आपलं जीवन जगत आहेत. 

भाग्यश्री -

नव्वदीच्या काळात एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ज्या चित्रपटातून सलमान खान सोबत भाग्यश्रीने डेब्यू केला होता. मैने प्यार किया या चित्रपटामुळे भाग्यश्री हे नाव घराघरात पोहचलं. मात्र भाग्यश्रीच्या प्रसिद्धीसाठी एवढंच कारण पुरेसं नाही. भाग्यश्री पटवर्धन सांगलीतील एका राजघराण्यातील मुलगी आहे. तिचे वडील विजय सिंह राव माधवराव पटवर्धन हे सांगलीतील महाराज आहेत. भाग्यश्रीने खूप कमी वयात बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र मैने प्यार कियाच्या यशानंतर तिने विवाह केला आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. मात्र राजघराण्यातील असल्यामुळे ती आजही तितक्याच थाटमाटात राहते. 

Instagram

सैफ अली खान -

अभिनेता सैफ अली खान राजघराणातील सुपूत्र आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सैफचे  वडील नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्या मृत्यूनंतर आता सैफला 'पतौडी नवाब' म्हणून खिताब मिळाला आहे. पतौडी घराणाच्या खानदानी हवेलीमध्ये सैफ त्याच्या कुटुंबासोबत नेहमीच आराम करण्यासाठी जात असतो. या हवेलीची किंमत करोडोंच्या घरात आहे.  सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांना सोहा अली खान आणि अब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. सारा अली खानदेखील आता बॉलीवूडची एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नाव कमवत आहेत. तर त्याची दुसरी पत्नी करिना कपूर आणि सैफला तैमूर नावाचा गोंडस मुलगा आहे. सैफ आणि करिना नेहमीच पतौडी खानदानच्या ऐटीप्रमाणे आयुष्य जगताना आढळतात. 

Instagram

सोहा अली खान -

अभिनेत्री शर्मिला आणि नवाब मन्सूर अली खान पतौडी यांची  मुलगी आणि सैफची बहीण सोहादेखील अभिनेत्री आहे. सोहा अली खान पतौडी खानदानची मुलगी आहे. सोहाने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोहाने कुणाल खेमूसोबत विवाह केला आहे. सोहा आणि कुणालला नौमी इनाया नावाची मुलगी आहे. सोहा तिच्या भावाप्रमाणेच थाटामाटात आपलं आयुष्य जगताना दिसते. 

Instagram

मोहिना कुमारी -

टेलिव्हिजन वाहिनीवरील हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री मोहिना कुमारी खऱ्या आयुष्यात एक राजकुमारी आहे. मोहिनी कुमारी महाराजा पुष्पराज सिंह जुदेव यांची मुलगी आहे. ज्यामुळे मोहिनी कुमारी रॉयल जीवन जगते. ‘डांस इंडिया डांस’ या रिअॅलिटी शो मधून ती दर्शकांसमोर आली होती. मोहिनी कुमारने सुयश रावत यांच्यासोबत विवाह केला आहे. सुवत रावत हे महाराजा सतपाल महाराजांचे सुपूत्र आहेत. सतपाल महाराज हे उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री आणि आध्यात्मिक गुरूदेखील आहेत. त्यामुळे आता तिच्या जीवनातील थाटमाट राजेशाही असणार यात शंकाच नाही.

Instagram

आदिती राव हैदरी -

हैदराबादच्या राजघराण्यात जन्मलेली आदिती राव हैदरी बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. भरतनाट्यम नर्तकी असलेल्या आदितीने श्रींगारम या तामिळ चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तिने अनेक बॉलीवूड चित्रपटात काम केलं आहे. आदितीचे आजोबा राजा जे. रामेश्वर राव हे तेलंगनावर राज्य करत होते. ज्यामुळे आजही ती राजघराण्यातील थाटमाटातच राहत असते. 

Instagram

सोनल चौहान -

इमरान हाश्मी सोबत जन्नत या चित्रपटातून सोनल चौहानला लोकप्रियता मिळाली होती. सोशल मीडियावर सोनलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. एवढंच नाही सोनल राजघराण्यातील असल्यामुळे तिचा थाटमाटही औरच आहे. 

Instagram

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा -

निसा देवगणच्या सतत ट्रोल होण्याबाबत काजोलची प्रतिक्रिया

ग्रामीण महिलांसाठी या कंपनीने उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

KKK10: खतरों के खिलाडीमध्ये तेजस्वी, धर्मेश आणि करणचा जलवा