बॉलीवूडनेही केलं लॉकडाऊनचं समर्थन

बॉलीवूडनेही केलं लॉकडाऊनचं समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरससंदर्भात मंगळवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मंगळवारी रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधत त्यांनी रात्री 12 वाजल्यापासून भारतात लॉकडाऊन करत असल्याचं सांगितलं. पुढचे 21 दिवस भारतासाठी महत्त्वाचे असून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसपासून बचावाचा याशिवाय कोणताही पर्याय नाही. मोदी यांनी केलेल्या या घोषणेनंतर अनेक बॉलीवूड सेलेब्सनी त्यांच्या या निर्णयाचं समर्थन केलं आणि लोकांना लॉकडाऊन पाळण्याचं आवाहन केलं.

अमिताभ बच्चन

बिग बी यांनी पीएम मोदीचं समर्थन करत लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलं. त्यांनी ट्वीट केलं की, हात जोडून विनम्रतेने आज आपण पंतप्रधानांचं ऐकूया. हे जे निर्बंध लागले आहेत ते आरोग्यदायी आहेत. 21 दिवसांचा संकल्प निश्चितच कोरोनाचा नायनाट करेल.

ऋषी कपूर

बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर यांनी पीएम मोदींच्या घोषणेचं समर्थन करत ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहीलं की, एकासाठी सगळे आणि सगळ्यांसाठी एक. आपल्याला तेच करायचं जे आपल्याला करायचं आहे. आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. आपण सगळेच सध्या एकमेकांना बिझी ठेवूया आणि येणाऱ्या काळात मनोरंजन करूया. चिंतेचं काहीच कारण नाही. घाबरू नका. या समस्येलाही बघून घेऊया. पीएम तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. जय हिंद.

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षीनेही ट्वीट केलं आणि म्हटलं की, चुकूनही बाहेर पडू नका. घरीच राहा आणि सुरक्षित राहा.

तापसी पन्नू

21 दिवस...आपल्या आयुष्याच्या मानाने हे काहीच नाही. चला सगळ्यांनी करूया हा निर्धार आणि आशा आहे की, या लॉकडाऊनच्या शेवटी आपल्या सगळ्यांकडेच सेलिब्रेट करण्यासाठी कारण असेल, असं अभिनेत्री तापसी पन्नूने लिहीलं.

महेश भट

निर्माता-दिग्दर्शक महेश भट यांनी ट्वीट केलं की, आता आपण एका सामूहिक वळणावर आहोत. जिथे संपूर्ण भारत देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यासाठी सगळ्यांची मदत लागेल. या संकटकाळात एकजूट, मानवता, बलिदान आणि आशेची आवश्यकता आहे. कोणताही हिस्टेरिया आणि अफवा पसरवू नका.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.