बॉलीवूड कलाकार जे रिअल लाईफमध्येही आहेत 'बेस्ट फ्रेंड'

बॉलीवूड कलाकार जे रिअल लाईफमध्येही आहेत 'बेस्ट फ्रेंड'


ऑगस्टचा पहिला रविवार 'जागतिक मैत्री दिन' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बॉलीवूडमधील कलाकारांच्या मैत्रीचे  किस्से आज आपण जाणून घेणार आहोत. असं म्हटलं जातं की बॉलीवूडमध्ये कुणाची मैत्री जास्त काळ टिकू शकत नाही. मात्र ते सर्वांच्याच बाबतीत खरं नाही. कारण बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या रील लाईफमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही एकमेकांचे मित्र आहेत. यातील अनेकांची मैत्री तर वर्षांनूवर्षे टिकून आहे. 

आमिर खान आणि सलमान खान

अंदाज अपना अपना या चित्रपटात काम केल्यानंतर दोन खान हिरोजची मैत्री झाली. सलमान खान नेहमीच त्याचा मित्र आमिर खानची तोंडभरून स्तुती करत असतो. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसतात. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या कामाचे आणि चित्रपटांचे कौतुक करताना मागेपुढे पाहत नाहीत. 

Instagram

सलमान खान आणि संजय दत्त

संजय आणि सलमान यांची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. जवळजवळ टीनएजमध्ये असल्यापासून ते एकमेकांना ओळखतात. या दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामुळे मोठ्या पडद्यावरही या दोघांची मैत्री चांगली गाजली आहे. 

Instagram

अर्जून कपूर आणि रणवीर सिंह

बी टाऊनमधील सध्याची बेस्ट फ्रेंडची जोडी म्हणजे अर्जून आणि रणवीरची. या दोघांनी गुंडे चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून या दोघांना एकमेकांचे जीवलग मित्र समजले जाते. एखाद्या कार्यक्रमात एकत्र आल्यावर एकमेकांचे पाय खेचत, मजामस्ती करत ते नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. 

Instagram

शाहरूख खान आणि करण जोहर

शाहरूख आणि करणच्या मैत्रीचं एक वेगळंच समीकरण आहे. कारण करण जोहरचा कोणताही चित्रपट असो त्यात शाहरूख खान असतोच. एकमेकांच्या सुखदुःखात सतत एकत्र असणारी बॉलीवूडची एक छान बेस्ट फ्रेंडची जोडी आहे. करणची फक्त शाहरूखसोबतच नाही तर शाहरूखची पत्नी गौरीसोबतही खास मैत्री आहे. 

Instagram

करिना, करिश्मा, मलायका आणि अमृता -

करिना आणि करिश्मा, मलायका आणि अमृता या बहिणींच्या जोड्यांची एकमेकांशी किती घनिष्ठ मैत्री आहे हे सांगण्याची गरजच नाही. बी-टाऊनमध्ये ही गर्ल गॅंग नेहमीच एकत्र दिसते. करिना आणि करिश्मा या एकमेकींच्या सख्खा बहिणी आहेत तर मलायका आणि अमृता या एकमेकांच्या सख्खा बहिणी आहेत. पण या चौघीही जीवलग मैत्रीणींप्रमाणे एकत्र दिसतात. एखादा कार्यक्रम असो वा जीम अथवा शॉपिंग असो वा पार्टी सगळीकडे त्यांना एकत्रच जायला आवडतं. या चौघी म्हणजे करिनाची गॅंग आहे असं म्हटलं जातं. 

Instagram

अजय देवगण आणि रोहीत शेट्टी

अजय आणि रोहीत शेट्टीचीही मैत्री बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. जेव्हा रोहीतचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव झालेलं नव्हतं तेव्हापासून ते एकमेकांना ओळखतात. 2003 मध्ये रोहीतने जामीन या अजयच्या चित्रपटातून दिग्दर्शनामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर या दोघांनी एका पाठोपाठ एक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. ऑल दी बेस्ट,सिंघम आणि गोलमालचे तर सिक्वल निर्माण करावे लागले. 

Instagram

जॅकलिन फर्नांडिस आणि सोनम कपूर -

जॅकलिन आणि सोनम या अभिनेत्री बी टाऊनच्या सर्वात स्टायलिश सेलिब्रेटींपैकी आहेत. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का या दोघी बेस्ट फ्रेंडदेखील आहेत. म्हणूनच त्या एकमेंकीसोबत फॅशन टिप्स शेअर करतात. बऱ्याचदा त्या एकमेंकीसोबत शॉपिंगदेखील करताना आढतात. रेड कार्पेटवरही एकमेकींच्या हातात हात घालून चालतात. 

Instagram

या बॉलीवूडमधील बेस्ट फ्रेंडच्या जोड्या तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कंमटे बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्हाला फ्रेंडशिप डेसाठी हार्दिक शुभेच्छा...

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

अधिक वाचा -

बॉलीवूड कलाकार जे आहेत उत्तम लेखक

'या' बॉलीवूड कलाकारांचे आहेत राजघराण्याशी संबंध

लग्नाआधीच आई झाल्या या बॉलीवूड अभिनेत्री