बॉलीवूड कलाकार त्यांच्या वैयक्तिक रिलेशनशिपचा वापर चित्रपटात काम मिळवण्यासाठी करतात हे जवळजवळ उघडच आहे. पण एवढंच नाही काही कलाकारांनी तर एखाद्या को-स्टारमुळे चांगले चित्रपट नाकारलेही आहेत. चित्रपट, त्याचे कथानक, भूमिकेची गरज अथवा इतर गोष्टींचा विचार न करता फक्त सहकलाकार नकोत म्हणून अनेक कलाकारांनी हे निर्णय घेतलेले आहेत. यावरून बॉलीवूड मध्ये कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू कधी होईल हे सांगता येत नाही हेच दिसून येतं.
रणवीर सिंह आणि कतरिना कैफ
सिद्धार्थ मल्होत्राआधी ‘बार बार देखो’ हा चित्रपट रणवीर सिंहला ऑफर झाला होता. मात्र रणविरने या चित्रपटातून याची लेडी लव्ह दीपिका पादूकोन नाही म्हणून काढता पाय घेतला होता. या चित्रपटात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती. आणि रणवीर कपूरमुळे दीपिका आणि कतरिना यांच्यात दूरावा निर्माण झाला होता. सहाजिकच दीपिकासाठी रणवीर सिंहलाही या चित्रपटामधून बाहेर पडावं लागलं होतं.
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि इम्रान हाश्मी –
इम्रान हाश्मीने करण जोहरच्या कॉफी विथ करन सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातून ऐश्वर्याला प्लास्टिक या नावाने चिडवलं होतं. ऐश्वर्याला ही गोष्ट नक्कीच आवडली नव्हती. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बादशाहो’ मध्ये तिने निर्मात्यांना इम्रानच्या जागी दिलजित दोसांझला घेण्यास भाग पाडलं होतं.
कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर –
कतरिना आणि आदित्य हे जरी एकमेकांचे चांगले मित्र असले तरी कतरिनाने एका चित्रपटात आदित्यसोबत काम करण्यास नकार दिला होता. तिला तिचा करिअरग्राफ खाली जाऊ नये यासाठी हा निर्णय घ्यावा लागला होता. कतरिनाने ‘फितूर’मध्ये आदित्यसोबत काम केलं होतं. मात्र तो चित्रपट फ्लॉप ठरला होता. शिवाय रणवीर कपूर सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर आदित्यशी तिचे सूत जुळले आहे अशी अफवाही पसरली होती. आपल्या इमेजला पुन्हा असा कोणताही धक्का लागू नये यासाठी ती आता सिलेक्टेड हिरोज सोबत काम करत आहे.
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि सलमान खान –
ऐश्वर्या आणि सलमानचं बिनसलेलं नातं सर्वांना माहीतच आहे. मात्र या दोघांची केमिस्ट्री ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये लोकप्रिय ठरली होती. सहाजिकच बाजीराव मस्तानीमधील मस्तानीची भूमिका आधी ऐश्वर्याला ऑफर करण्यात आली होती. पण तिला या चित्रपटात सलमान असेल अशी भिती वाटू लागली म्हणून तिने या चित्रपटाला नकार दिला.
करिना कपूर आणि इम्रान हाश्मी –
करिना कपूर म्हणजेच बॉलीवूड ची बेगम तिचे को-स्टार बघूनच चित्रपट स्वीकारते. आताच नाही तर तिच्या करिअरच्या सुरवातीपासूनच बेबो तिच्या सहकलाकारांच्या निवडीबाबत ठाम आहे. सुरूवातीपासूनच ती फक्त सुपरस्टार्ससोबत काम करत आलेली आहे. तिने इम्रान हाश्मीसोबत स्क्रीनवर किसिंग सीन देणं त्रासदायक वाटल्याने एक चित्रपट सोडून दिला होता. मात्र नंतर काही बदल करून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटानंतर बेबोने इम्रानसोबत काम करणं कटाक्षाने टाळलं.
अमिताभ बच्चन आणि करिना कपूर –
संजय लीला भन्सालीच्या ब्लॅक चित्रपटासाठी सर्वात आधी करिना कपूरची निवड करण्यात आली होती. मात्र करिनामुळे अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण त्यावेळी करिष्मा आणि अभिषेकचं नातं तुटलं होतं. ज्याचा परिणाम म्हणून करिनाची भूमिका राणी मुखर्जीला ऑफर करण्यात आली.
रणबीर कपूर आणि सोनाक्षी सिन्हा –
रणबीर कपूरने सोनाक्षी सिन्हासोबत स्क्रीन शेअर करावी लागणार म्हणून एका चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. रणबीर कपूरच्या मते त्याच्यासोबत सोनाक्षी खूप थोराड वाटत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने या चित्रपटासाठी दुसऱ्याच अभिनेत्रीचे नाव निर्मात्याला सुचवले होते. मात्र निर्मात्याने रणवीरलाच या चित्रपटातून बाहेर काढले.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक माहिती –
या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख
हिरोंपेक्षाही हँडसम आहेत हे ऑनस्क्रिन व्हिलन
मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी या अभिनेत्री करत होत्या बी ग्रेड चित्रपटात काम