2020 मध्ये एकाही चित्रपटात नाही दिसले हे सुपरस्टार्स

2020 मध्ये एकाही चित्रपटात नाही दिसले हे सुपरस्टार्स

2020 मध्ये जगभरात जे काही घडलं ते विसरणं कोणालाही नक्कीच शक्य नाही. मात्र नव्या वर्षाचं स्वागत करताना मागच्या काही आठवणींचा उजाळा घेणं नेहमीच क्रमप्राप्त असतं. मागच्या वर्षी मार्चपासून सिनेमागृह बंद असल्यामुळे बॉलीवूडला खूप नुकसान सहन करावं लागलं. अनेक चित्रपटाचं शूटिंग थांबल्यामुळे ते या वर्षी प्रदर्शित करताच आले नाहीत. ज्यामुळे अनेक सूपरस्टार यावर्षी मोठ्या पडद्यावर झळकलेच नाहीत. यासाठीच जाणून घेऊ अशा कलाकारांबद्दल ज्यांची झलकसुद्धा त्यांच्या चाहत्यांना यंदा चित्रपटातून पाहता आली नाही. 

आमिर खान -

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमिर खान 2020 मध्ये चाहत्यांना दिसलाच नाही. वास्तविक त्याचा लाल सिंह चड्डा यावर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र अचानक लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे या चित्रपटाचं शूटिंग अर्धवटच राहीलं. आता आमिर आणि करिनाने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं असलं तरी  हा चित्रपट आता पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्येच प्रदर्शित होईल. ज्यामुळे आमिर खानचं दर्शनही चाहत्यांना नवीन वर्षातच करावं लागेल. 

अनुष्का शर्मा -

अनुष्का शर्मा 2018 मध्ये झिरो या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अनुष्काने कोणताही चित्रपट साईन केला नाही. तिने या काळात तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून पाताललोक ही वेबसिरिज आणि नेटफ्लिक्सवरील बुलबुल हा चित्रपट निर्मित केला होता. मात्र यात तिने अभिनय केला नव्हता. आता तर अनुष्का आणि विराट त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी तयार झाले आहेत. गरोदरपणामुळे लॉकडाऊननंतरही अनुष्काने कोणत्याच चित्रपटात काम केलेलं नाही. ज्यामुळे मागचे दोन वर्ष अनुष्का  चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली नाही.

शाहरूख खान -

शाहरूख खानने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही. शाहरूखचा झिरो बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला होता. असं असूनही त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत. मात्र अजुनही शाहरूखने त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव जाहीर केलेले नाही. शाहरूख यशराज फिल्मच्या पठाण या चित्रपटातून परत प्रेक्षकांसमोर येणार अशी चर्चा आहे. मात्र या वर्षी तरी त्याने चाहत्यांसमोर येणं टाळलेलेच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. 

सलमान खान -

2020 हे असं पहिलं वर्ष असेल जेव्हा सलमानचा बॉलीवूडमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्याचा राधे या चित्रपटाचा सिक्वल ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे सलमानने हा चित्रपट प्रदर्शित करणं पुढे ढकललं. ज्यामुळे या वर्षीची चाहत्यांची ईद अशाप्रकारे सलमानच्या चित्रपटाविनाच गेली.

कतरिना कैफ -

कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचा सुर्यवंशी चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. रोहीत शेट्टीच्या या चित्रपटाची चांगली हवा निर्माण झाली होती. ज्यामुळे चाहते या चित्रपटाची आवर्जून वाट पाहत होते. मात्र लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचीही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अक्षय कुमार त्याच्या लक्ष्मी चित्रपटातून ओटीपी माध्यमावर झळकला मात्र कतरिना कैफला चाहत्यांना  कोणत्याच चित्रपटातून  पाहता आले नाही. 

रणवीर सिंह -

रणवीर सिंहचे  चाहते त्याच्या 83 चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे या चित्रपटावरही संकट ओढावलं आणि त्याची प्रदर्शनाची तारीख पुढच्या वर्षीपर्यंत ढकलण्यात आली. यावर्षी रणवीरला 83 आणि जयेशभाई या दोन चित्रपटाच पाहण्याची चाहत्यांची इच्छा तशीच राहिली. आता हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होतील. 

राणी मुखर्जी -

राणी मुखर्जीने हिचकी आणि मर्दानी 2 मधून चांगला कमबॅक केला होता. तिचा बंटी और बबली जुनमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे हा चित्रपट चांगलाच रखडला आहे. ज्यामुळे राणी मुखर्जीला या वर्षी चित्रपटातून पाहणं शक्य झालं नाही. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.