#POPxoMarathiBappa : अंबानींकडे गणपतीचं जंगी सेलिब्रेशन

#POPxoMarathiBappa : अंबानींकडे गणपतीचं जंगी सेलिब्रेशन

महापूराच्या सावटानंतरही गणपतीच्या आगमनानंतर मात्र सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. मुंबईही याला अपवाद नाही. गणेशोत्सव मुंबईत आणि एकंदर मराठी - हिंदी सेलिब्रिटीज अगदी उत्साहाने साजरा करतात. मग याला अपवाद अंबानी कुटुंबिय कसे असतील. अंबानींकडील सर्व फंक्शन्स आणि सेलिब्रेशन्स शाही असतात. गणेश चतुर्थीच्या निमित्तानेही अंबानींनी ग्रँड सेलिब्रेशन केलं. पाहा अंबानींच्या घरातील गणपती डेकोरेशन….

View this post on Instagram

#antila #ambaniganpati #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आकाश आणि श्लोकाचा पहिला गणेशोत्सव

यंदाचं गणपती बाप्पाचं आगमन अंबानींकडे जास्त उत्साहपूर्ण असण्याचं अजून एक कारण म्हणजे श्लोका मेहता आणि अंबानींची कन्या ईशा अंबानीचा हा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे. या निमित्ताने अँटीलिया अगदी एखाद्या नववधूसारखं सजवण्यात आलं होतं. अंबानी कुटुंबातील नीता अंबानी, ईशा अंबानी आणि अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटही पारंपारिक वेषात दिसले. 

आता ग्रँड सेलिब्रेशन म्हटल्यावर सेलिब्रिटीजही आलेच. पाहूया अंबानींच्या बाप्पांच्या दर्शनाला आलेले सेलिब्रिटीज.

बी-टाउनची एव्हरग्रीन ब्युटी रेखा नेहमीप्रमाणे पारंपारिक साडीत इथे पोचली. रेखाने या निमित्ताने खास पर्पल आणि गोल्डन कलरची सिल्क साडी नेसली होती आणि त्यावर पर्ल गोल्डन ज्वेलरी घातली होती. या अटायरमध्ये रेखा नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.

बॉलीवूडचा चॉकलेट हिरो आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइक फेम अभिनेता विकी कौशलही मरून कलरच्या हटके कुर्त्यात आणि त्यावर कोट व व्हाईट पायजमा अशा वेषात दिसला. जो नेहमीप्रमाणे फारच हँडसम दिसत होता.

अभिनेत्री काजोलनेही इथे पोचली ब्लॅक आणि गोल्ड कॉम्बिनेशनच्या सुंदर साडीत. ज्यावर तिने स्टेटमेंट इयरिंग्ज घातले होते. पण तिच्यासोबत पतीदेव अजय देवगण मात्र दिसले नाहीत. 

गुणी अभिनेत्री अदिती राव हैदरी दिसली फ्युजन लुकमध्ये. तिने ब्लॅक आणि पिंक फ्लोरल गाऊन घातला होता आणि त्यावर स्टेटमेंट इयरिंग असा छान लुक केला होता. तसंच छोटीशी टिकलीही लावली होती.

धकधक गर्ल माधुरीही आपल्या पतीदेव राम नेने यांच्यासोबत दिसली. तिने बेबी पिंक कलरची साडी आणि स्टेटमेंट इयरिग्ज असा लुक केला होता.

यासोबतच अर्जुन रामपाल आणि गर्लफ्रेंड ग्रॅबिएला, अभिनेत्री कृती सेनोन, बॉलीवूडमधील लव्हबर्डस रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, सुनील शेट्टी आणि कुटुंबियही, कतरिना कैफ, सचिन तेंडुलकर आणि कुटंबिय, बच्चन कुटुंबिय, जितेंद्र, करिश्मा कपूर, विद्या बालन आणि पती सिद्धार्थ रॉय कपूर हेही इथे दर्शनासाठी आले होते. पाहा या सेलिब्रेटीजचा पारंपारिक वेषातील अवतार.