ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या प्री वेडींग फंक्शन्सच्या निमित्ताने उदयपूरचं रूपांतर जणू एखाद्या स्वप्ननगरीतच झालं आहे आणि मुंबईतले बहुतांश बॉलीवूड सेलेब्स तिथे अवतरलेत. या अनुंषगाने सोशल मीडियावर काही व्हिडीओज सध्या व्हायरल होत आहेत. या आधी आम्ही ईशाच्या 8 डिसेंबरला झालेल्या प्री वेडींग फंक्शन सोहळ्यातले काही फोटोज आणि व्हिडीओज दाखवले होतेच. पण नुकतेच काही अजून सुंदर व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पाहा हे सुंदर आणि न पाहिलेले काही अजून व्हिडीओज -
करण जोहर म्हणाला 'ले जा ले जा'
बॉलीवूडचं कोणतंही फंक्शन असो वा कोणताही मोठा सोहळा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरशिवाय अपूर्णच. याचाच प्रत्यय ईशा अंबानीच्या प्री वेडींग सोहळ्यात आला. जेव्हा ईशाने आणि करणने त्याच्या कभी खुशी कभी गम या चित्रपटातील ले जा ले जा गाण्यावर डान्स केला.
View this post on Instagram@karanjohar takes stage with #IshaAmbani at the latter’s pre-wedding celebrations.
व्हिडीओ सौजन्य - Instagram/ Filmfare
अंबानी आणि पिरामल कुटुंबियांचा धमाकेदार परफॉर्मन्स
आत्तापर्यंत अंबानी कुटुंबियांच्या नृत्याची चर्चा होती. मुकेश अंबानी आणि कुटुंबियांनी सुंदर परफॉर्मन्स दिले. पण या सोहळ्यात बॉलीवूडच्या गाण्यावर ठेका धरताना ईशाचे सासरे ही मागे राहीले नाहीत. पाहा त्यांचा किंग खान शाहरूखबरोबर तोडीस तोड नाचतानाचा हा व्हिडीओ -
View this post on Instagram
व्हिडीओ सौजन्य - Instagram/ Filmfare
बॉलीवूडचे तारे उदयपूरमध्ये
ईशा अंबानी आणि आनंद पिरामलच्या लग्नाला आलेल्या सेलेब्समध्ये खान मंडळींचा ही समाावेश आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने किंग खानने आणि परफेक्शनिस्ट आमीरने स्टेज गाजवलं. पाहा ह्या दोघांचा डान्स
View this post on Instagram
व्हिडीओ सौजन्य - Instagram/ Filmfare
अॅश आणि अभिषेकचं तेरे बिना
या संगीत सोहळ्यात अजून चारचांद लावणारी जोडी म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन. या दोघांनी त्यांच्या गाजलेल्या गुरू चित्रपटातील ‘तेरे बिना’ गाण्यावर डान्स केला. गुरू हा चित्रपट धीरूभाई अंबानींच्या जीवनावर आधारित होता.
View this post on Instagram@aishwaryaraibachchan_arb and @bachchan perform at #IshaAmbani’s pre-wedding celebrations.
व्हिडीओ सौजन्य - Instagram/ Filmfare