IndvsPak: सलमान खानपासून तैमूरपर्यंत पूर्ण बॉलीवूडने साजरा केला भारताचा विजय

IndvsPak: सलमान खानपासून तैमूरपर्यंत पूर्ण बॉलीवूडने साजरा केला भारताचा विजय

#CWC2019 मालिकेत रविवारी रोमांचक असा भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना पार पडला. अर्थातच टीम इंडियाने पाकिस्तानला मात देत विजयाची पताका रोवली. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्डमध्ये हा सामना झाला. भारताने आपलं वर्चस्व कायम राखत पाकिस्तानला वर्ल्ड कपच्या इतिहासात 7व्यांदा हरवलं. भारताच्या या विजयाचा जल्लोष पूर्ण देशाने अगदी सणासारखा साजरा केला. या उत्साहात भारतीय टीमला शुभेच्छा देण्यासाठी आणि सामन्यासाठी बॉलीवूड सेलेब्सचा उत्साहही पाहण्यासारखा होता. सलमान खानपासून ते अगदी तैमूरपर्यंत टीम इंडियाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

रणवीर सिंगचा स्वॅग

या सामन्यावेळी सगळ्यात जास्त लक्ष वेधलं ते रणवीर सिंगने. रणवीरने खास टीम इंडियाच्या या मँचेस्टरमध्ये पोचून मॅचआधीच्या प्री शोमध्येही भाग घेतला आणि आपल्या खास अंदाजात जोशपूर्ण वातावरण निर्माण केलं. रणवीरने अनेक क्रिकेटर्ससोबत फोटो काढले. मॅच सुरू होण्याआधी त्याने शिखर धवनशीही खूप गप्पा मारल्या. तसंच स्टेडिअममध्ये उपस्थित पाकिस्तानी अँकर झैनब अब्बाससोबतही रणवीरने सेल्फी घेतली. पाहा त्याचे काही फोटोज.

सल्लू आणि किंगखानचा मॅचसाठी उत्साह

किंग खान शाहरूखने मॅच सुरू होण्याआधी आपल्या मुलगा आर्यनसोबतचा असा क्युट फोटो शेअर केला. ज्यावर त्याने लिहीलं होतं की, 'मॅचसाठी तयार... हॅपी फादर्स डे.'

तर मॅच जिंकताच सलमान खानने ट्वीटरवर इंडियन जर्सी घालून फोटो शेअर केला. या ट्वीटमध्ये त्याने टीम इंडियाचं कौतुक करत लिहीलं होतं की, 'अभिनंदन टीम भारत '

View this post on Instagram

Congratulations team Bharat... from #Bharat

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सैफही मँचेस्टरमध्ये तर तैमूरचाही फोटो व्हायरल

एकीकडे बाबा सैफ अली खान मॅच पाहण्यासाठी मँचेस्टरमध्ये पोचला तर दुसरीकडे क्युट तैमूरचाही इंडियन जर्सी घातलेला फोटो व्हायरल झाला. तैमूरने या फोटोमध्ये इंडिया लिहीलेली जर्सी घातली असून तो भारताला सॅल्यूट करत आहे.

तर सैफ सध्या आगामी चित्रपट जवानी जानेमनच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. क्रिकेट मैदानावर सैेफसोबत दिसली पूजा बेदीची मुलगी आणि या चित्रपटाची लीड अभिनेत्री आलिया एफ.  

अंबानी कुटुंबिय आणि टीम इंडिया

टीम इंडियाची मॅच असल्यावर हमखास दिसणारं कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंबिय आणि या उत्कंठावर्धक मॅचला तर उपस्थिती असणं आवश्यकच होतं. नीता अंबानी आणि आकाश अंबानी या मोस्ट अवटेड सामन्यासाठी मँचेस्टरमध्ये उपस्थित होते.

टीम इंडियाच्या विजयावर सेलेब्सचा जल्लोष

प्रसिद्ध गायक गुरु रंधावाही इंडिया-पाकिस्तानची ही मॅच बघण्यासाठी मँचेस्टरला पोचला. याशिवाय अर्जुन रामपाल, सनी लिओन, रितेश देशमुख आणि स्वरा भास्करनेही टीम इंडियाच्या विजयाबाबत ट्वीट करून अभिनंदन केलं.

टीव्ही सेलेब्सही पोचले वर्ल्ड कप पाहायला

एकीकडे बॉलीवूड सेलेब्सनी टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर दुसरीकडे टीव्ही सेलेब्स यामध्ये मागे नव्हते. टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार आशा नेगी, करण वाही, सुयश रॉय, किश्वर मर्चंट आणि रित्विक धनजानी हेही हा सामना पाहायला मँचेस्टरला पोचले होते. त्यांनी तर या मॅचआधी मैदानावर जाऊन फेरफटकाही मारला.