ब्रेकअप झाल्यानंतरही बेस्ट फ्रेंड्स आहेत हे सेलिब्रिटी कपल्स

ब्रेकअप झाल्यानंतरही बेस्ट फ्रेंड्स आहेत हे सेलिब्रिटी कपल्स

नातं जुळवणं जितकं सोपं आहे तितकंच कठीण ते टिकवणं आहे. हे आपल्याला तर माहीत आहेच. पण याची बरीच उदाहरणं तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाहायाला मिळतील. इथे तुम्हाला रोज कोणाचं तरी प्रेम जुळलेलं दिसेल आणि रोज कोणाचं तरी ब्रेकअप ऐकायला येतं. आजच कोणालातरी एकमेकांबरोबर आनंदी पाहिलं असेल तर दोनच दिवसात त्यांच्या ब्रेकअप अथवा घटस्फोटाची बातमी येणं हे आता अगदी सहज झालं आहे. यापैकी काही कपल्स मात्र असेही आहेत ज्यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना जास्त त्रास झाला. काही कपल्स वेगळे झाल्यानंतर एकमेकांना बघूही शकत नाहीत, तर काही कपल्स अशीही आहेत जी वेगळी झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं आजही टिकून आहे. 

वेगळे झाल्यानंतही बेस्ट फ्रेंड्स आहेत हे सेलिब्रिटी कपल

प्रत्येकासाठी ब्रेकअप झाल्यानंतर अथवा घटस्फोट घेतल्यानंतर समोरच्या व्यक्तीशी आपले संबंध जपून ठेवणं हे सोपं नाही. पण काही जणांनी आपल्या आयुष्यात हे करून दाखवलं आहे. याबाबतीत बॉलीवूड पुढे आहे. आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील काही अशी कपल सांगणार आहोत, ज्यांनी ब्रेकअप झाल्यानंतरही आपल्या एक्स बरोबर मैत्री तशीच ठेवली आहे. मैत्रीला कोणतीही परिभाषा नसते हेच त्यांनी दाखवून दिलं आहे. 

रणबीर कपूर-दीपिका पादुकोण

Instagram

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरची मैत्री सर्वांनाच माहीत आहे. या दोघांचं अफेअर ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटापासून सुरु झालं होतं. दोघंही अनेक सार्वजनिक ठिकाणी नेहमी एकत्र दिसायचे. इतकंच नाही तर रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दीपिकाने त्याच्या नावाचा टॅटूही करून घेतला होता. पण रणबीर त्याचवेळी कतरिनाला डबल डेट करत होता हे समजल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. रणबीरने दीपिकाचा विश्वासघात केला. पण त्यानंतरही दीपिकाने रणबीरला मोठ्या मनाने माफ करत त्याच्याबरोबर हेल्दी फ्रेंडशिप ठेवली. दोघांनी त्यानंतरही केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. इतकंच नाही तर दीपिका आणि रणवीर सिंगच्या लग्नानंतरही दीपिका आणि रणबीर अनेक पार्टीजमध्ये एकत्र मजा करताना दिसतात. सध्या रणबीरचं नाव आलिया भटबरोबर जोडलं गेलं आहे. 

हृतिक रोशन-सुझान खान

Instagram

हृतिक रोशन आणि सुझान खानने आपल्या लग्नाच्या 13 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. पण या सगळ्याचा परिणाम त्यांनी आपल्या मुलांवर अजिबातच होऊ दिला नाही. घटस्फोटानंतरही आपल्या मुलांसाठी हे दोघे नेहमीच एकत्र असतात. हे दोघेही एकमेकांंचे चांगले मित्र आहेत. शिवाय मुलांच्या बाबतीतही दोघे नेहमीच एकत्र निर्णय घेतात. घटस्फोट झाला असला तरीही दोघे एकत्र डिनर अथवा वेकेशनवर एकत्र असतात. इतकंच नाही तर नेहमीच एकमेकांंची प्रशंसा करतात. कंगना प्रकरणाच्या बाबतीतही घटस्फोटानंतरही सुझान खानने हृतिकला चांगलाच पाठिंबा दिला होता.  

हृतिक रोशन जगातील ‘हँडसम’ पुरुषांच्या यादीत अव्वल 5 मध्ये

मलायका अरोरा-अरबाज खान

Instagram

हृतिक रोशन आणि सुझान खानप्रमाणेच मलायका अरोरा आणि अरबाज खान घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या मुलासाठी हे दोघेही नेहमी एकत्र येतात. घटस्फोटानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले असून दोघांनीही पुन्हा आपले जोडीदार निवडले आहेत. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असून अरबाज खान जॉर्जिया अँन्ड्रियानीला डेट करत आहे. असं असलं तरीही अरबाज आणि मलायकाने एकमेकांबाबत कोणतेही ग्रजेस न ठेवता आपल्या मुलाच्या बाबतीत नेहमीच एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून अरबाजच्या घरच्या काही कार्यक्रमांना मलायका अजूनही उपस्थित असते. 

दिया मिर्झा -साहिल संघा

Instagram

‘रहना हैं तेरे दिल में’ या चित्रपटातून अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलेल्या दिया मिर्झाने आपला पती साहिल संघा याच्याबरोबर नुकताच घटस्फोट घेतला आहे. दिया आणि साहिल हे लग्नाच्या बंधनातून मुक्त झाले असले तरीही ते एकमेकांचे कायम मित्र राहतील आणि एकमेकांना नेहमीच पाठिंबा देतील असं दिया मिर्झाने जाहीर केलं आहे. लग्नानंतर पाच वर्षांनी हे दोघे वेगळे झाले असले तरीही कारण समजू शकलेलं नाही. मात्र गेल्या 11 वर्षांपासून हे दोघं एकमेकांचे मित्र आहेत. त्यामुळे ही मैत्री अशीच कायम राहील असं दोघांनीही सांगितलं आहे. आपल्या दोघांचं बाँडिंग चांगलं असून ते कायम तसंच राहील असंही त्यांनी सांगितलं आहे. 

Bad News: दिया मिर्झा आणि साहिल सांघाने घेतला वेगळं होण्याचा निर्णय

बिपाशा बासू-डिनो मोरिया

Instagram

बिपाशा बासू आणि डिनो मोरिया हे मॉडेलिंगच्या दिवसांत एकमेकांच्या रिलेशनमध्ये होते. दोघांनीही राज हा चित्रपट एकत्र केला. पण या चित्रपटानंतरच दोघांचंही ब्रेकअप झालं. जॉन अब्राहमशी जवळीक हे त्यांच्या दोघांच्या ब्रेकअपचं कारण म्हटलं जातं. पण असं असलं तरीही बिपाशा आणि डिनो हे एकमेकांचे आजही चांगले मित्र आहेत. इतकंच नाही बिपाशाने करण सिंह ग्रोव्हरशी लग्न केलं तेव्हा तिला शुभेच्छा देण्यासाठीही डिनो लग्नात हजर राहिला होता. अजूनही एकमेकांनी आपली मैत्री टिकून ठेवली आहे. 

अनुराग कश्यप-कल्की कोचलिन

Instagram

बॉलीवुड को "गँग्स ऑफ वासेपुर", "देव डी" आणि "मनमर्जियां" असे अनेक हिट चित्रपट देणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री कल्की कोचलीनने 2011 मध्ये लग्न केलं पण 4 वर्षांतच दोघांनीही घटस्फोट घेतला. असं असलं तरीही दोघं एकमेकांचे चांगले मित्र असून एकमेकांबरोबर आजही काम करतात. नुकतचं कल्की कोचलिनने अनुराग कश्यपच्या "सेक्रेड गेम्स" या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसंच काही पार्टीजमध्येही हे दोघं एकत्र दिसतात. 

सलमान खान-कतरिना कैफ, सलमान खान-संगीता बिजलानी

Instagram

बॉलीवूडमध्ये अफेअर आणि ब्रेकअप या गोष्टींची चर्चा होते तेव्हा सलमान खानचं नाव मागे राहूच शकत नाही. सलमान खान आतापर्यंत त्याच्या अनेक अफेअरसाठी चर्चेच राहिला आहे. पण त्यापैकी संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ या दोघींची नावं हमखास घ्यावी लागतील. कतरिना कैफचं रणबीर कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाला सर्वात मोठा आधार सलमाननेच दिला. तिचं ढेपाळलेलं करिअरही त्याने सावरलं. संगीता बिजलानीचा अझरुद्दीनबरोबर घटस्फोट झाल्यानंतरही सलमानने तिला आधार दिला. त्यांच्यातील मैत्री आजही तशीच आहे. 

रणबीरसोबतच्या ब्रेकअपबाबत पहिल्यांदा बोलली कतरिना