कोरोनामुळे ‘ही’ सेलिब्रिटी लग्नं लांबणीवर

कोरोनामुळे ‘ही’ सेलिब्रिटी लग्नं लांबणीवर

देशभरात लॉकडाऊन असतानाही चर्चा आहे ती बॉलीवूड कपल्सच्या लग्नाची. 2018 साली दीपिका पदुकोण-रणवीर सिंग यांच्यासोबत प्रियांका चोप्राचंही लग्न झालं. त्यामुळे 2019 मध्येही सतत चर्चेत असणाऱ्या बॉलीवूड कपलपैकी कोणाचं तरी लग्न होईल अशी आशा होती. पण ते काही झालं नाही. 2020 मध्ये अनेक बॉलीवूड कपल्सकडून लग्नाची अपेक्षा केली जात आहे. ज्यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर सतत चर्चा असते. चला पाहूया कोणती आहेत ही बॉलीवूड कपल्स.

रणबीर कपूर आणि आलिया भट

लॉकडाऊनदरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. रालियाच्या लग्नाबाबत फॅन्स खूपच उत्सुक आहेत. बिग बजेट आणि आगामी चित्रपट ब्रम्हास्त्र च्या शूटदरम्यान दोघांचं जुळल्याची चर्चा आहे. मध्यंतरी दोघांचा बिल्डींगच्या आवारात एकत्र फिरतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. अनेक ईव्हेंट्स आणि पार्टींजनाही जोडी एकत्र दिसते. ज्यामुळे आलिया आणि रणबीरच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला हिरवा झेंडा दाखवल्याचं बोललं जातं. आता फक्त सनई-चौघडे वाजायचे बाकी आहेत. खरंतर मागच्या वर्षीपासून यांच्या लग्नाबाबतच्या अनेक बातम्या येत आहेत. आता पाहूया लॉकडाऊननंतर तरी या कपलला लग्नाचा मुहूर्त मिळतो का ते. 

वरूण धवन आणि नताशा दलाल

View this post on Instagram

Happy diwali 👷‍♂️👩🏻‍⚕️

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

सेलिब्रिटी लग्नांमध्ये वारंवार पुढे ढकलेल्या लग्नात या जोडीच्या लग्नाचा समावेश होईल. आधी वरूण त्याच्या करिअरमध्ये बिझी असल्यामुळे यांचं लग्न पोस्टपोन झालं आणि आता लॉकडाऊनमुळे. वरूण आणि नताशा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचीही कुटुंब चांगले फॅमिली फ्रेंड्स आहेत. वरूण आणि नताशाने कधीच त्यांचं नात लपवलं नाही. सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या लग्नाचं डेस्टिनेशन ठरल्याच्या आणि तारखांच्या बातम्या येत असतात. आता लॉकडाऊननंतर वरूणला करिअरमधून ब्रेक मिळून लग्न होईल, अशीच फॅन्सची इच्छा आहे.

अली फजल आणि रिचा चढ्ढा

अगदी होणार होणार म्हणत असताना अली फजल आणि रिचा चढ्ढाचं लग्न लॉकडाऊनमुळे पुढे ढकलंल गेलं. सध्या अली फजल आपल्या गर्लफ्रेंड रिचा चढ्ढापासून दूर आहे आणि दोघंही एकमेंकाना मिस करत आहेत. रिचा आणि फजल बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरच लग्नाच्या बेडीतही अडकतील. फक्त लॉकडाऊन संपायची वाट ते पाहत आहेत.

सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल

सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त रोमँटिक फोटोज व्हायरल होत आहेत ते सुश्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉलचे. या दोघांच्या फोटोजवरून हे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं दिसतंय. रोहमन मॉडेल असून त्याची आणि सुश्मिताची भेट 2018 साली झाली. या दोघांच्या वयात जरी बरंच अंतर असलं तरी केमिस्ट्री एकदम सॉलिड आहे. रोहमन फक्त सुश्मितालाच वेळ देतो असं नाहीतर तिच्या मुलींसोबतही वेळ घालवतो.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा

View this post on Instagram

♥️

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

लॉकडाऊनदरम्यान अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा प्रत्येक एक्टिव्हिटीमध्ये एकत्र दिसत आहेत. मग ते अर्जुनचं मलायकाच्या हातचा केक खाणं असो वा अजून त्यांचं एकाच घरातल्या गॅलरीत उभं राहून थाळी वाजवणं असो. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या अफेयरच्या बातम्या येऊ लागल्या. अर्जुन मलायकापेक्षा खूपच छोटा आहे. पण दोघांमधील प्रेम लगेच दिसून येतं. 2019 साली या दोघांनी आपलं नातं सोशल मीडियावर जाहीर केलं आणि ते सगळीकडे एकत्र दिसू लागले. लवकरच त्यांच्या लग्नाचीही बातमी येईलच

आता 2020 मध्ये निदान लॉकडाऊन संपल्यानंतर तरी हे सेलेब्स लग्नाच्या तयारी लागतील, अशी आशा आहे. ज्यामुळे आपल्याला एखादं तरी सेलिब्रिटी वेडिंग एन्जॉय करता येईल.