कोरोना हा रोग ना सेलिब्रिटी पाहतो ना गरीब. त्याचाच प्रत्यय आता येऊ लागला आहे. बॉलीवूड गायिका कनिका कपूर हिचा कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर फॅन्स आणि तिच्या नातेवाईकांमध्ये आनंद असतानाच. दुसरी बातमी आली की, बॉलीवूडमध्ये नवीन कोरोना व्हायरस पॉजिटिव्ह केस आढळली आहे.
इंग्रजी वेबसाईट स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, रा वन आणि चेन्नई एक्स्प्रेस यासारख्या चित्रपटांचे निर्माते असलेल्या करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी कोरोना पॉजिटिव्ह आहे. शजा ही 31 वर्षीय असून तिला नानावटी रूग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
मोरानी कुटुंबिय हे जुहूमध्ये राहतात. जिथे आसपास अनेक बॉलीवूड सेलेब्सची घर आहेत. महापालिकेकडून त्यांचं घर सॅनिटाईज करण्यात येईल. असंही कळतंय की, या बातमीनंतर हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मोरानी यांच्या कुटुंबात तब्बल नऊ लोक आहेत. त्यांचीही टेस्ट करण्यात येईल. असं म्हटलं जात आहे की, ही जुहूमधली पहिली केस आहे. मोरानी कुटुंबिय हे जमनाबाई नरसी स्कूलजवळ राहतात. मोरानी राहत असलेल्या बिल्डींगचं नाव शगुन असं आहे.
या वेबसाईटला केलेल्या टेक्स्ट मेसेजमध्ये करीम मोरानी यांनी सांगितलं की, माझी मुलगी कोणत्याही परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात नव्हती. एक सुजाण नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे की, ज्या व्यक्ती तिच्या संपर्कात आल्या त्यांना मेसेज करावा. त्यांनीही टेस्ट करून घ्यावी. आम्ही तिला नानावटी रूग्णालयात दाखल केलं असून तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
करीम मोरानी हे बॉलीवूडमधील मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत. शाहरूखसोबत त्यांची चांगली मैत्री आहे. त्यांनी शाहरूखचे अनेक सिनेमा प्रोड्यूस केले आहेत. या चित्रपटांमध्ये 2015 साली आलेला दिलवाले हा चित्रपटही होता. मोरानी यांना दोन मुली आहेत झोया आणि शजा. झोयाही मोठी मुलगी असून ती एक अभिनेत्री आहे तर शजा छोटी मुलगी आहे.
जनता कर्फ्यूमध्ये तिने गमावलं आपल्या वडिलांना
Corona Virus च्या या काळात सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर
corona virusमुळे चित्रपटांवर होणार परिणाम, थिएटर राहणार 31 मार्चपर्यंत बंद