बाॅलीवूड स्टार्सना आहे विचित्र फोबिया, तुम्हाला वाटेल आश्चर्य

बाॅलीवूड स्टार्सना आहे विचित्र फोबिया, तुम्हाला वाटेल आश्चर्य

भीती तर प्रत्येक माणसाला वाटत असते. कोणीही जरी आपण घाबरत असल्याचं स्वीकारलं नाही तरी हे खरं आहे की, प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा फोबिया असतो. बॉलीवूडमधील 10- 10 गुंडांना मारणाऱ्या हिरो आणि त्यांना साथ देणाऱ्या हिरॉईन्सनादेखील आपल्या खऱ्या आयुष्यात विशिष्ट गोष्टींची भीती अर्थात फोबिया आहे. यापैकी काही नावं अशी आहेत, ज्यांना ‘या’ गोष्टींचा फोबिया कसा असू शकतो असा प्रश्न आपल्याला पडेल. आम्ही तुम्हाला इथे काही अशाच बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना काही गोष्टींचा फोबिया आहे. नुकताच ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये येऊन गेलेल्या अजय देवगण आणि सलमान खान या दोन्ही टफ हिरोंनी त्यांना लिफ्टचा फोबिया असल्याचं सांगितलं होतं. लिफ्टचा फोबिया बऱ्याच माणसांना असतो. आता जाणून घेऊया इतरही काही अशी नावं ज्यांना विचित्र फोबिया आहेत.


फळांचा फोबिया


Bollywood Stars and their Phobia- Abhishek


बदलत्या ऋतूनुसार वेगवेगळी फळं येत असतात. उन्हाळा आला की, आंबा, कलिंगड इत्यादी फळांची रेलचेल असते. तर थंडीच्या दिवसांमध्ये संत्र आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांची आपण वाट पाहात असतो. तुम्ही म्हणाल आता याचं काय मध्येच? कोणला आहे फळांचा फोबिया? पण हे खरं आहे ज्युनियर बच्चन अर्थात अभिषेक बच्चनला फळांचा फोबिया आहे. अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याने लहानपणापासून आतापर्यंत एकही फळ खाल्लं नाही. त्याला फळांकडे बघणंही आवडत नाही.


लिफ्टची भीती


Bollywood Stars and their Phobia- Sonam Lift


बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी खूपच प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? सोनम कपूर एलिवेटर्स अर्थात लिफ्टमध्ये जायला खूप घाबरते. सोनमच्या म्हणण्यानुसार, तिला लिफ्टने जाण्याऐवजी जिने चढून जाणं जास्त चांगलं वाटतं. लिफ्टमध्ये जावं लागलं तरी ती लिफ्टच्या एका कोपऱ्यात उभी राहून आपला फ्लोअर यायची वाट पाहते. विशेषतः ती कोणत्याही ताणतणावाखाली असेल तेव्हा तर लिफ्टने जाणं सोनम टाळते. अशावेळी तिला जिने चढून जायलाच बरं वाटतं.


झुरळाचा फोबिया


Bollywood Stars and their Phobia- Ranbir


बऱ्याच मुली झुरळाला घाबरतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला जर कोणी म्हटलं एखादा स्टार तोदेखील हिरो झुरळाला घाबरत आहे असं कळलं तर? हो हे खरं आहे. कपूर खानदानातील ‘रॉकस्टार’ रणबीर कपूरला झुरळाची भीती अर्थात फोबिया आहे. घरात एक जरी झुरळ अथवा कोळी दिसल्यास, रणबीरला सहन होत नाही. आपली ही भीती एकदा रणबीरने प्रियांका चोप्रालादेखील बोलून दाखवली होती. त्यामुळे कुठेही झुरळ दिसलं तर रणबीर कपूर दोन हात लांब राहणंच पसंत करतो.


अंधार! कधीच नको


Bollywood Stars and their Phobia- Alia


आपल्यामध्ये अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांना अंधारात झोपण्याची भीती वाटत असते. बॉलीवूड स्टार आलिया भटलादेखील हीच भीती आहे. आलियाला अंधाराची इतकी भीती वाटते की, ती रात्रीदेखील आपल्या बेडरूममधील लाईट लाऊन झोपते. इतकंच नाही तर ती पडदेदेखील उघडे ठेवते.


टॉमेटोची कसली भीती?


Bollywood Stars and their Phobia- katrina
तुम्ही कधी विचार तरी करू शकता की, कोणाला टॉमेटोची भीती वाटत असेल. टॉमेटो हे खरं तर सर्वाच्या आवडती भाजी आहे. पण तरीही त्यापासून कसली भीती? असा विचार आता तुमच्याही मनात डोकावला असेल. तर हे काही आमच्या मनातील नाहीये. बॉलीवूडमधील बार्बी डॉल कतरिना कैफला टॉमेटोचा फोबिया आहे. कतरिनाने ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’मध्ये केलेल्या ‘टोमेटिनो फेस्टिव्हल’नंतर तर तिचा हा फोबिया अजून वाढला. वास्तविक त्यावेळी तिने ही भीती कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित लपवली होती. पण तिला नक्की टॉमेटोचा इतका फोबिया का आहे याची पूर्ण माहिती मिळालेली नाही.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


मौनी रॉयला नखरे पडले महागात, ‘बोले चूडियाँ’ मधून हकालपट्टी


स्मिता तांबेही आता घेणार 'पंगा'


हा #Hot सेलिब्रिटी करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण