एका चुकीमुळे या स्टार्सचं करिअर आलं धोक्यात, करिअरला लागला ब्रेक

एका चुकीमुळे या स्टार्सचं करिअर आलं धोक्यात, करिअरला लागला ब्रेक

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अशी वळणं येतात जिथे खूप मोठ्या चुका केल्या जातात. काही जणांना या मोठ्या चुकांनंतरही चांगलं आयुष्य मिळतं. पण काही जणांना आयुष्यभर त्याची किंमत चुकती करावी लागते. असंच काही कलाकारांच्या बाबतीतही घडले आहे. बॉलीवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांच्या एका चुकीमुळे त्यांना आपल्या चांगल्या करिअरपासून दूर जावं लागलं.  आपल्या चुकीमुळे आजही हे कलाकार पडद्यापासून दूर आहेत. त्यांना पुन्हा कधीही प्रसिद्धी मिळाली नाही. जी काही प्रसिद्धी मिळाली ती त्यांनी केलेल्या चुकांमुळे. त्यांनी केलेल्या चुका इतक्या मोठ्या होत्या की चाहत्यांनाही त्यांच्या याच चुका जास्त लक्षात आहेत असं म्हणावं लागले. पाहूया असे कोणते कलाकार आहेत, ज्यांना या चुका महागात पडल्या आहेत. 

विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi)

‘कंपनी’ सारख्या तगड्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला विवेक ओबेरॉय नक्कीच अभिनयात तगडा होता. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून विवेकला अमाप यश मिळालं. त्यामध्ये साथिया चित्रपटाचाही समावेश आहे. पण त्याने सलमान खानशी भांडण करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ऐश्वर्या रॉयमुळे विवेकला आपल्या करिअरची तिलांजली द्यावी लागली. सलमान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेकमधील जवळीक वाढली. मात्र विवेकने प्रेस कॉन्फरन्स बोलावून सलमानबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या की त्यानंतर सलमान आणि विवेकचे संबंध तर बिघडलेच पण विवेकला आपल्या करिअरपासूनही लांब जावे लागले. यानंतर विवेकला चित्रपट मिळणेही बंद झाले. 

फरदीन खान

बॉलीवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता फरदीन खान. सुरुवातील फरदीन खानचे करिअरही चांगले चालले. पण नार्कोटिक्सने कोकेन हस्तगत केल्यानंतर फरदीनला अटक केली आणि त्यानंतर फरदीनच्या करिअरलाही ग्रहण लागले. त्यानंतर फरदीन इंडस्ट्रीमधून गायब झाला. तर काही वर्षांपूर्वी फरदीनचा असा फोटो समोर आला ज्यामध्ये त्याला ओळखणेही कठीण झाले होते. फरदीन अत्यंत जाडा झाला होता. मात्र मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा फरदीनचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये फरदीनने वजन कमी केले असून अत्यंत फ्रेश दिसत आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर आता पुन्हा एकदा फरदीन कमबॅक करणार अशीही चर्चा चालू झाली आहे. मात्र कोकेन घेतल्याने त्याच्या करिअरला संपूर्ण ब्रेक लागला होता. 

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सरसावले स्टार्स, सडेतोडपणे मांडली मतं

शायनी आहुजा

शायनी आहुजा हे अत्यंत लोकप्रिय नाव होतं. कोणाच्याही वशिल्याशिवाय शायनी या इंडस्ट्रीमध्ये आला तो अभिनयाच्या जोरावर. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने शायनीने आपला एक चाहतावर्ग निर्माण केला. पण त्याच्या एका चुकीमुळे त्याचे संपूर्ण करिअर धोक्यात आले. 2009 मध्ये शायनीच्या मोलकरणीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप शायनीवर लावला आणि यासंदर्भात शायनीला सात वर्ष तुरूंगात काढावी लागली. यामुळे शायनीचे संपूर्ण करिअर संपले. आता शायनी नक्की कुठे आहे आणि काय करतो याचीही कोणाला माहिती नाही. 

दीपिका पादुकोणच्या स्मितहास्याला मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान

मनिषा कोईराला

मनिषा कोईरालाला फारच कमी वेळात स्टारडम मिळाले होते. बॉलीवूडमधील उत्तम अभिनेत्रींपैकी एक अशी तिची गणना होत होती. मात्र तिला हे स्टारडम सांभाळता आले नाही. दारू आणि सिगरेटच्या नशेमुळे तिने स्वतःच्या हाताने करिअर खराब करून घेतले. नंतर तिच्या आयुष्यात अनेक संकटं आली आणि ती पुन्हा कधीच त्यातून सावरू शकली नाही. दरम्यान मध्यंतरी तिने वेबसिरीज आणि काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र पुन्हा तिला पहिल्यासारखे स्टारडम मिळू शकले नाही. 

Bigg Boss 14: राहुल परतण्याची चर्चा,प्रेक्षकांमुळे मेकर्सना घ्यावा लागला निर्णय

ममता कुलकर्णी

करिअरला सुरूवात केल्यापासून ममता आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध होती. अनेक हिट चित्रपटांमधून ममताने काम केले आणि तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचेही अनेक चाहते होते. मात्र ममताचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले. तिच्यावर ड्रग्जची तस्करी करण्याचे आरोप आले आणि त्यानंतर दुबईमध्ये तिला तुरूंगवासही भोगावा लागला. नंतर तर ममता गायब झाली आणि बरेच वर्ष ती अंडरग्राऊंड आहे असं म्हटलं जातं. गेले कित्येक वर्ष ममता नक्की कुठे आहे याचा शोध पोलीसही घेत आहेत. अंडरवर्ल्डशी असलेल्या कनेक्शनमुळे ममताचे पूर्ण करिअर संपले. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक