सुपरस्टारचा मुलगा संन्यास घेण्याच्या मार्गावर

सुपरस्टारचा मुलगा संन्यास घेण्याच्या मार्गावर

बॉलीवूडमध्ये कधी काय होईल याचा काहीही नेम नाही. इथे कोण कधी सुपरस्टार होईल आणि कोण रावाचा रंक होईल याचीही कल्पना नसते. स्वतःला इथे टिकवून ठेवणं अत्यंत कठीण काम आहे. बॉलीवूडमधील असाच एक सुपरस्टार विनोद खन्ना. दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांची दोन्ही मुलं अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना यांचा खूपच चांगला फॅन फॉलोईंग आहे. मात्र त्यांची दुसरी पत्नी कविताचा मुलगा साक्षी खन्नाबाबत फारसं कुणालाही माहीत नाही. साधारण दोन वर्षांपूर्वी साक्षी खन्नाचं पूनम पांडे या अभिनेत्रीबरोबर नाव जोडण्यात आलं तेव्हा तो प्रकाशझोतात आला होता. त्याचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊसदेखील असल्याचं म्हटलं जातं. पण आथा समोर आलेल्या वृत्तानुसार साक्षी खन्ना संन्यास घेण्याच्या मार्गावर आहे.

'बैजू बावरा'मध्ये रणवीरऐवजी ऋतिक होणार संजय लीला भन्सालीची बैजू

साक्षीदेखील वडिलांप्रमाणे ओशोचा भक्त

साक्षी खन्नादेखील आपले वडील विनोद खन्नाप्रमाणे ओशो रजनीशचा भक्त आहे. मिळालेल्या माहिनुसार काही महिन्यांपूर्वीच साक्षी ओशोच्या आश्रमात जाऊन आला आहे. साक्षी हा विनोद खन्ना यांची दुसरी पत्नी कविताचा मुलगा आहे. त्याला श्रद्धा नावाची बहीणही आहे. साक्षी याआधी वाईट संगतीत असल्याचंही म्हटलं जात होतं. 70 च्या दशकात विनोद खन्ना हे सुपरस्टार होते. पण ओशोच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी करिअरच्या शिखरावर असातानाच संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली होती. असं असतानाही 28 वर्षीय साक्षी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचं म्हटलं जात आहे. साक्षीने विनोद खन्नाचा एक फोटोही आपल्या इन्स्टावर अपलोड केला होता. विनोद खन्ना ओशोच्या आश्रमात असतानाचा हा फोटो आहे आणि त्यात त्याने वडिलांना फादर्स डे च्या शुभेच्छा देत त्यांचा फोटो शेअर केला होता. आपणही याने प्रभावित असल्याचं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता साक्षीदेखील याच मार्गावर असल्याचं दिसून येत आहे. साक्षी सध्या ओशोच्या आश्रमांना भेट देत असल्याचंही समजत आहे. त्यामुळे लवकरच तो संन्यास घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. 

अंदाज अपना अपना' चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण, तीन वर्ष सुरु होते शुटींग

साक्षीला मिळणार होता संजय लीला भन्साळीकडून ब्रेक

साक्षी खन्नाला संजय लीला भन्साळीकडून ब्रेक मिळणार असल्याचंही म्हटलं जात होतं. साक्षीने बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारीदेखील सांभाळली होती. यानंतरच भन्साळी साक्षीला ब्रेक देणार असल्याची चर्चा होती. पण गेल्या काही वर्षांपासून साक्षी कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नसून त्याची कोणतीही चर्चा नाही. शिवाय आपल्या दोन्ही भावांप्रमाणे तो प्रसिद्धही नाही. साक्षीचं नाव आतापर्यंत घेतलं गेलं आहे ते केवळ विचित्र गोष्टींसाठीच. तसंच कॉन्ट्रॉव्हर्सी क्वीन पूनम पांडेसोबत त्याचं काही वर्ष अफेअर होतं. दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसायचे तसंच अनेक पार्टीमध्येही ते एकत्र दिसत होते. मात्र या दोघांनीही कधीही त्याचं नातं स्वीकारलं नाही. इतकंच नाही साक्षी खन्ना एका रेव्ह पार्टीमध्येदेखील पकडला गेला होता. पण त्यावेळी आपण कोणतेही ड्रग्ज घेतले नसल्याचेही त्याने सांगितलं होतं. साक्षी आतापर्यंत जितके वेळा चर्चेत आला तितके वेळा वाईट कारणांसाठीच चर्चेत आला आहे. विनोद खन्नासारख्या सुपरस्टारचा मुलगा असून त्याला कोणतंही फेम मिळवता आलं नाही. कदाचित याचसाठी तो आता संन्यास घेणार आहे असंही म्हटलं जात आहे.

जेव्हा विराट-अनुष्काला त्या कुटुंबाने ओळखलंच नाही

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.