बिग बी, किंग खानसह संपूर्ण बॉलीवूडने केला 'विंग कमांडर अभिनंदन' यांच्या शौर्याला सलाम

बिग बी, किंग खानसह संपूर्ण बॉलीवूडने केला 'विंग कमांडर अभिनंदन' यांच्या शौर्याला सलाम

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकीस्तानामध्ये तणावपूर्ण वातावरण होतं. भारतीय वायू दलाचे विंग कमांडर 'अभिनंदन वर्थमान' यांच्या सुटकेची आस सर्वच भारतीयांना लागली होती. अखेर आज आनंदाचा तो क्षण आला आहे कारण अभिनंदन वर्थमान भारतात सुखरूप परतले आहेत. संपूर्ण भारतभर जल्लोषाचं वातावरण आहे. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी भारत देश सज्ज झाला होता. अटारी येथील वाघा बॉर्डरवर आज सकाळपासूनच भारतीय बांधवांनी गर्दी केली होती. 'भारत माता की जय', 'जय हिंद' अशा जयघोषात भारताच्या या वीरपूत्राचे स्वागत करण्यात आलं आहे.


बॉलीवूडने केलं भारताच्या वीरपूत्राचं स्वागत


बॉलीवूडमधील सर्वच दिग्गज कलाकारांनी अभिनंदन यांना आनंदाने वेलकम केलं आहे. अख्या बॉलीवूडने सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या या वीर जवानाचे स्वागत करत त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाला सलाम केला आहे.  


बॉलीवूडचा 'महानायक' अभिताभ बच्चन यांनी अभिनंदन यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करत आपल्या आगामी चित्रपट 'बदला' मधील एक गाणं देखील सोशल माडियावर शेअर केलं आहे.
बॉलीवूड सेलिब्रेटी करण जोहरनेही अभिनंदन यांच्या शौर्य आणि हिंमतीची दाद देत त्यांना सलाम केला आहे.अभिनेता वरूण धवन यानेही 'वेलकम बॅक होम' म्हणत भारताच्या या खऱ्या हिरोचं स्वागत केलं आहे.बॉलीवूडची अभिनेत्री प्रिती झिंटाने वायूदलाचं मनापासून कौतुक करत अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे.अभिनेता रितेश देशमुखनेही अभिनंदन यांना वेलकम म्हणत त्यांच्या धैर्याला सलाम केला आहे.अभिनेत्री रविना टंडनने ही अभिनंदन यांच्या शौर्याचं कौतुक करत आम्हाला तुमच्याबद्दल सार्थ अभिमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.अभिनेता अनुपम खेर यांनी संपूर्ण भारतीयांच्या वतीने अभिनंदन यांना धन्यवाद देत त्यांचं स्वागत केलं आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'विंग कमांडर अभिनंदन यांना साष्टांग दंडवत प्रणाम करत तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून भारताच्या या वीरपुत्राचे स्वागत केलं आहे.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम