‘श्रीदेवी बंगलो’वर चिडले बोनी कपूर, निर्मात्यांना पाठवली नोटीस

‘श्रीदेवी बंगलो’वर चिडले बोनी कपूर, निर्मात्यांना पाठवली नोटीस

बॉलीवूडची हवाहवाई श्रीदेवीची अचानक एक्झिट तिच्या तमाम फॅन्सना चटका लावून गेली. श्रीदेवीच्या मृत्यूवर खूप चर्चासुद्धा झाली. या सगळ्या दु:खातून तिचे कुटुंबीय आणि फॅन्स बाहेर पडत नाहीत तोच आता एक नवा वाद होण्याची शक्यता आहे. कारण आहे ‘श्रीदेवी बंगलो’ हा चित्रपट. या चित्रपटाचा टीझर दोन दिवसांपूर्वी लॉन्च झाला. पण या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे बोनी कपूर चिडले असून त्यांनी सिनेमाच्या निर्मात्याला नोटीस पाठवली आहे. सोशल मीडिया सेन्सेशन झालेली प्रिया वारियर या सिनेमात मुख्य भूमिकेत असून आता बोनी कपूर यांच्या नोटीसनंतर सिनेमा रिलीज होण्यास अडचणी येतात की या सिनेमाला हिरवा कंदील मिळतो हे पाहावे लागणार आहे.


 का चिडले बोनी कपूर ?


दुबईमध्ये एका लग्नाला गेलेली श्रीदेवी बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. श्रीदेवीचा खून झाला असवा,अशा देखील चर्चा रंगल्या. पण नंतर आलेल्या अहवालात श्रीदेवी दारु प्यायली होती हे समोर आले. त्यामुळेच तिचा तोल गेला आणि बाथटबमध्ये ती बुडून मेली असे स्पष्ट झाले. प्रिया वारियर स्टारर ‘श्रीदेवी बंगलो’ या सिनेमात प्रिया वारियरने एका अभिनेत्रीचे काम केले असून तिचे नाव श्रीदेवी आहे.  काही गोष्टी वगळता तिचा दाखवण्यात आलेला मृत्यू हा खऱ्या श्रीदेवीच्या मृत्यूच्या घटनाक्रमावर आधारित असल्याचा आरोप बोनी कपूर यांनी केला आहे.  या संदर्भात त्यांनी सिनेमाचे निर्माते प्रशांत माम्बुली यांना रितसर नोटीस पाठवली आहे.

Subscribe to POPxoTV

नोटीसला देणार उत्तर


प्रशांत माम्बुली यांनी देखील बोनी कपूर यांची नोटीस स्विकारली असून प्रसारमाध्यमांना  दिलेल्या मुलाखतीत याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणालेत की, बोनी कपूर यांची नोटीस मिळाली असून आम्ही सिनेमात अभिनेत्रीचे नाव श्रीदेवी ठेवले आहे. कारण ते अगदीच साधारण नाव आहे.  सिनेमाची बांधणी पूर्णत: काल्पनिक असून त्यात दाखवण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीचा श्रीदेवीच्या आयुष्याशी संबंध नाही. त्यामुळे या नोटीसला कोर्टात उत्तर देऊ असे ते म्हणाले आहेत.या ट्रेलरमध्ये कोणताही डायलॉग नाही. केवळ प्रिया वारियर आणि तिच्या चेहऱ्यावरील निरागस हसू पाहायला मिळत आहे. शिवाय त्या निरागस हसण्यामागील दु:ख देखील ट्रेलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 


प्रिया वारियर लवकरच झळकणार हिंदी सिनेमा 'Sridevi Bungalow' मध्ये


कोण आहे प्रिया वारियर?


जर तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला प्रिया वारियर कोण ते नक्कीच माहीत असेल. कारण २०१८ या वर्षात सर्वाधिक गुगल सर्च केलेली ही एकमेव सेलिब्रिटी आहे.  ‘ओरु अदार लव’ या सिनेमातील ‘माणिक्य मलराय पूवी’ या गाण्यात तिने केलेला ‘नैनमटक्का’ अनेकांच्या लक्षात राहिला आणि ती एका दिवसात सोशल मीडिया सेन्सेशन बनली. ती नॅशनल क्रश बनली असे देखील म्हणायला काहीच हरकत नाही. प्रिया ही केरळची  असून ती फक्त १८ वर्षांची आहे.  'श्रीदेवी बंगलो' हा तिचा पहिला मुख्य भूमिका असणारा चित्रपट आहे. पण आता हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे पुन्हा एकदा प्रिया वारियर सोशल मीडिया सेन्सेशन ठरणार हे मात्र नक्की!


priya variyer insta


(फोटो सौजन्य- Instagram)