मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार 'बोनस'

मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार 'बोनस'

‘बोनस’ हा शब्द एक वेगळाच आनंद देऊन जातो. मग तो बोनस पैशांचा असो किंवा सुखाचा. बोनस मिळाला तर आनंद नाही मिळाला तर निराशा अशी काहीशी संमिश्र भावना प्रत्येकाची असते. याच विषयावरील मराठी सिनेमा फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. युवा दिग्दर्शक सौरभ भावे दिग्दर्शित 'बोनस' हा मराठी सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. लायन क्राऊन एंटरटेनमेंट आणि जीसिम्स यांची प्रस्तुती असलेला, गोविंद उभे, एन. अनुपमा, कांचन पाटील निर्मित हा सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी आणि सुंदर अभिनेत्री पूजा सावंत या कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

निर्माता म्हणून सिनेमाचा विषय निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार खास करून सर्वप्रथम केला जातो याचे उत्तर देताना गोविंद उभे यांनी म्हटले की,’निर्माता म्हणून जेव्हा सिनेमाची निवड करायची असते तेव्हा सिनेमाची गोष्ट निवडताना किंवा ‘आपण हा सिनेमा करायचाच’ असा होकार देण्यापूर्वी मी खास करून काही ठराविक गोष्टींचा विचार करतो आणि तो विचार म्हणजे प्रेक्षकांची निवड. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जर मी सिनेमाची निर्मिती करतोय तर त्यांचे निखळ मनोरंजन हे झालेच पाहिजे. ‘बोनस’ची कथा जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी ती ऐकली, समजून घेतली आणि मला ती आवडली देखील. या सिनेमाला होकार देताना हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री मला तेव्हा होती आणि अजूनही आहे. सिनेमाचा विषय चांगला आहे आणि कथेसह एक महत्त्वाचा संदेश यातून प्रेक्षकांना मिळेल." या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

(वाचा : 'वाजवूया बँड बाजा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला)

दिग्दर्शन आणि छायाचित्रणासंदर्भात गोविंद यांनी सांगितलं की,"माझ्या सिनेमाचा दिग्दर्शक सौरभ भावे हा उत्तम कथा आणि पटकथा लेखक आहे. या सिनेमाच्या निमित्ताने लिखाणासह त्याचे दिग्दर्शन कौशल्य देखील आता मराठी सिनेसृष्टीला पाहायला मिळेल. यंग दिग्दर्शक, यंग जोडी, यामुळे सिनेमात नावीन्य आणि एक वेगळी कथा पाहायला मिळेल. गश्मीर आणि पूजा हे दोघेही हुशार, समंजस आणि उत्तम कलाकार आहेत, नव्या जोडीची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांनी अगदी उत्तमरित्या सांभाळली, त्यांची कामं मी पहिली आहेत. त्यांची प्रत्येक फ्रेम ही अचूक आणि खूप काही व्यक्त करणारी असते . मला सांगायला आनंद होतोय की 'बोनस'मध्ये त्यांचा मोठा हातभार आहे."

(वाचा : 'फर्जंद'नंतर निर्माते अनिरबान सरकार घेऊन येताहेत 'ऋणानुबंध')

सिनेमाची निर्मिती हा गोविंद उभे यांचा आधीपासूनच आवडीचा विषय. कॉलेजमध्ये असतानाच सिनेमाची निर्मिती करायची हे त्यांचं पॅशन होतं. "आपल्या आवडीच्या क्षेत्रात जर काम केलं तर मनाला समाधान मिळतं. निर्माताची जबाबदारी म्हटलं तर सिनेमाचे कथा लेखणाची प्रक्रिया ते सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत निर्मात्यावर अनेक जबाबदारी असतात, जे त्याला अगदी शांतपणे आणि समजंसपणाने सांभाळाव्या लागतात", असे देखील उभे यांनी म्हटले आहे.

(वाचा : ‘स्वीटी सातारकर’चा नादच नको, सिनेमातील धमाकेदार गाणं रिलीज)

'रोहन-रोहन' यांनी 'बोनस'ला दिलं संगीत

महाराष्ट्राची आवडती संगीतकार जोडी 'रोहन-रोहन' यांनी 'बोनस'ला संगीत दिले आहे. नुकतेच त्यांचे रॅप साँगही रिलीझ झाले आहे. संगीतकार रोहन प्रधान आणि रोहन गोखले या म्युझिकल जोडीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं ते ‘व्हेंटिलेटर’मधील गाण्यांच्या माध्यमातून. त्यांच्या विषयी बोलताना गोविंद यांनी म्हटले की, "रोहन-रोहननं संगीतबद्ध केलेल्या गणपतीचं गाणं ‘या रे या’ आणि ‘बाबा’ हे वडिलांवरचं गाणं... ही दोन्ही गाणी मला प्रचंड आवडली आणि ती मनाला भावली देखील. तेव्हाच ठरवलं की या माझ्या सिनेमाला संगीत हीच जोडी देणार. नुकतंच 'बोनस' मधील 'माईक दे' हे रॅप साँग रिलीज झाले आहे आणि त्याला पसंती देखील मिळाली. सिनेमाची निर्मिती हा गोविंद उभे यांच्या फार जवळचा विषय असल्यामुळे 'बोनस' नंतर ते लवकरच आणखी एक मराठी सिनेमा घेऊन येणार आहेत.

हे देखील वाचा :
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.