सामान्य माणूस असो अथवा कलाकार. प्रेम हे तर प्रेमच असतं. कलाकारांनाही प्रेम होतं. काहींचं टिकतं तर काहींचं तुटतं. अशा अनेक जोड्या होत्या ज्यांचं सेटवर प्रेमप्रकरण सुरू तर झालं. पण काही वर्ष अथवा काही काळ एकत्र राहिल्यानंतर या जोड्यांची प्रेमकहाणी मात्र अपूर्ण राहिली. रील लाईफमध्ये एकमेकांच्या जवळ येता येता काही जोड्या खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्या होत्या. त्यापैकी काही जोड्यांनी आपलं प्रेम स्वीकारलं नव्हतं. तर काही जणांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. पण त्यापैकी अशा काही जोड्या आहेत ज्यांचं लग्न व्हायला हवं होतं असं त्यांच्या चाहत्यांनाही वाटत होतं. या जोड्यांनीदेखील आपलं प्रेम टिकून राहावं यासाठी अथक प्रयत्न केले. पण त्यांचे हे प्रयत्न पूर्ण झाले नाहीत. त्यांचं प्रेम अपूर्ण राहिलं आणि त्यापैकी अनेक जणांनी आता दुसऱ्या व्यक्तीशी लग्नही केली आहेत. अशाच काही जोड्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अशा कोणत्या जोड्या आहेत त्या आपण पाहूया -
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडीपैकी दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा यांची जोडी होती. ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकेमध्ये दोघेही पती - पत्नी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या मालिकेप्रमाणेच या जोडीलादेखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. हे दोघेही जवळजवळ आठ वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. शरदबरोबर आपलं नातं टिकावं म्हणून आपण अंधश्रद्धेलादेखील बळी पडलो होतो असंही एका मुलाखतीदरम्यान दिव्यांकाने मान्य केलं होतं. पण या सगळ्या गोष्टीतून आपण शिकलो आणि त्यातून बाहेर पडलो असंही दिव्यांका म्हणाली. सध्या दिव्यांका आपल्या आयुष्यात आनंदी असून तिने अभिनेता विवेक दहियासह सुखाने संसार थाटला आहे. तर शरदनेदेखील रिप्सी भाटिया या फॅशन डिझाईनरबरोबर लग्न करून संसार थाटला आहे. दोघेही आपापल्या संसारात सुखी असल्याचं बघायला मिळतं.
‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेतून कृतिका कामरा आणि करण कुंद्रा यांनी टीव्हीवर पदार्पण केलं. या जोडीलादेखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. पडद्यावर प्रेम करता करता कृतिका आणि करण एकमेकांच्या प्रेमात पडले. अगदी आपलं प्रेम स्वीकारही त्यांनी केलं. पण त्यानंतर मात्र दोघं जास्त काळ या नात्यात राहू शकले नाहीत. काही वर्षातच दोघांनी ब्रेकअप करायचं ठरवलं. या दोघांचं ब्रेकअप होण्याचं कोणतंही मोठं कारण नसल्याचं एका मुलाखतीमध्ये कृतिकाने सांगितलं होतं. दोघंही आपापल्या कामात इतके गढून गेले होते की, एकमेकांसाठी वेळ काढणंही त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तसंच कृतिका आणि करण ब्रेकअपनंतरही चांगले मित्र असल्याचं म्हटलं जातं. करण कुंद्रा गेले काही वर्ष व्हीजे अनुषा दांडेकरला डेट करत असून कृतिका कामरा मात्र सध्या कुठेही दिसत नाही. तसंच तिच्याबद्दल सध्या कोणतीही चर्चाही नाही.
दिव्यांका आणि शरदच्या ब्रेकअपनंतर प्रेक्षकांना सर्वात जास्त ब्रेकअपचं दुःख जर कोणत्याही जोडीबद्दल झालं असेल तर ती जोडी होती, सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून दोघेही टीव्ही क्षेत्रात आले. पण या दोघांचाही पवित्र रिश्ता सेटवर जोडला गेला. बऱ्याचदा या दोघांनी लपून लग्न केल्याच्या बातम्याही यायच्या. पण साधारण सहा वर्ष लिव्ह इनमध्ये एकमेकांबरोबर राहिल्यानंतर हे दोघेही वेगळे झाले. सर्वात वाईट म्हणजे यांच्यामधील मैत्रीदेखील संपली. सुशांत सिंह राजपूत चित्रपटात काम करायला लागल्यानंतर या दोघांमध्ये दुरावा आला. असंही म्हटलं जातं की, सुशांतंची इतर अभिनेत्रींशी असलेली जवळीक या दोघांचं ब्रेकअप होण्यासाठी कारणीभूत ठरली. सुशांत सिंह राजपूत सध्या अभिनेत्री रिहा चक्रवर्तीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. तर अंकिता लोखंडे सध्या उद्योगपती विकी जैनला डेट करत आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
काव्यांजली या मालिकेतील अंजली आणि काव्यची प्रेमकहाणी तर सर्वांनाच आवडली होती. याच मालिकेदरम्यान अनिता आणि एजाज एकमेकांना आवडू लागले होते. पण दोघांनाही कधीच आपलं प्रेम सार्वजनिकरित्या जाहीर केलं नाही. काही दिवसांपूर्वीच एजाजने मात्र अनिताचं नाव न घेता नात्यात असल्याचा स्वीकार केला होता. त्याने अनिताचा विश्वासघात केला आणि त्यामुळे ब्रेकअप झाल्याचंही त्याने म्हटलं होतं. मात्र या सगळ्यातून निघून अनिताने उद्योगपती रोहित शेट्टीशी लग्न केलं. दोघेही अतिशय आनंदात असून नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असतात. तर एजाजने मात्र अजूनही लग्न केलं नाही.
छोटी बहू मालिकेच्या दरम्यान रूबीना दिलाईक आणि अविनाश सचदेव दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. या दोघांनी कधीही आपलं प्रेम लपवलं नाही. अनेक लोकांना ही जोडी आवडत होती. पण पाच वर्षांच्या नात्यानंतर हे दोघेही वेगळे झाले. अविनाशने सांगितल्याप्रमाणे रूबीनाचं त्याच्यावरील प्रेम अति होतं. त्याला ते असह्य झालं होतं. तर रूबीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ब्रेकअप झालं तेव्हा हे सर्व आपल्या बाबतीत का घडलं असं तिला वाटत होतं. पण त्यानंतर अविनाश सचदेव तिच्या आयुष्यात आला आणि तिने त्याच्याशी लग्न केलं. तर अविनाशने शाल्मली देसाईबरोबर लग्न केलं पण तेदेखील टिकलं नाही आणि आता अविनाशने दुसरं लग्नही केलं आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.