अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाचं सिझलिंग हॉट फोटोशूट

अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाचं सिझलिंग हॉट फोटोशूट

अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला नेहमीच आपल्या बोल्ड आणि सेक्सी अशा हॉट फोटोशूटने इंटरनेटवर हंगामा केला आहे. ब्रुना भलेही चित्रपटांमध्ये कमी दिसते. पण सोशल मीडियावर तिच्या फोटोजचा बोलबाला आहे. नेहमीच ब्रुना आपले हॉट आणि सेक्सी फोटोज शेअर करताना दिसते. ब्रुनाचे अनेक चाहते आहेत. शिवाय ब्रुनाची फिगरही अप्रतिम आहे. नुकतंच ब्रुनाने Delton D’souza साठी Boudoir या सिरीजसाठी काम केलं आहे. ब्रुना या सिरीजच्या प्रत्येक फ्रेममध्ये अत्यंत हॉट आणि सिझलिंग दिसत आहे. ब्रुनाने याआधीदेखील फोटोशूट केले आहेत. मात्र या शूटमध्ये ब्रुनाने घातलेल्या काळ्या आणि लाल रंगाच्या लिंगरीमध्ये अत्यंत हॉट दिसत आहे.


bruna 1
ब्रुना अब्दुल्लाचं सेक्सी फोटोशूट


ब्रुना या लेटेस्ट फोटोशूटमध्ये काळ्या आणि लाल रंगाच्या लिंगरीमध्ये असून संपूर्ण फोटोशूटमध्ये मादक अदा दाखवत फोटो काढून घेतले आहेत. तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका फोटोमध्ये ती उपडी झोपली असून एका फोटोमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. यामध्ये ब्रुनाने घातलेली लेसवाली लिंगरी तिचं सौंदर्य अधिक खुलवत असल्याचं दिसून येत आहे. बॉलीवूड असो वा अभिनयाचं कोणतंही क्षेत्र. यामध्ये बोल्ड आणि ब्युटीफूल असण्याला सध्या जास्त महत्त्व दिलं जातं. शिवाय अभिनयाबरोबरच अभिनेत्रीची फिगरदेखील परफेक्ट असायला हवी याकडेदेखील बरंच लक्ष दिलं जातं. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची फिगर अप्रतिम आणि परफेक्ट आहे. यापैकीच एक ब्रुनादेखील आहे.


bruna 2
बॉलीवूडमध्ये ब्रुनाचा जलवा


‘देसी बॉईज’ या मसालेदार चित्रपटातून ‘तू मेरा हिरो’ म्हणत नाचलेली ब्रुना सर्वांना चांगलीच परिचयाची आहे. त्यानंतर तिने 2016 मध्ये अरबाज खान आणि जिमी शेरगीलबरोबरही एका चित्रपटात काम केलं. त्यानंतर ‘मस्तीजादे’ या चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका होती. पण तरीही ब्रुनाचा जास्त फॅन फॉलोईंग हा सोशल मीडियावरच आहे. शिवाय ब्रुना ‘ग्रँडमस्ती’ आणि ‘आय हेट लव्ह स्टोरी’ अशा चित्रपटांमधूनही प्रेक्षकांसमोर आली आहे. इतकंच नाही तर ब्रुनाने आतापर्यंत लहान पडद्यावरील ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘नच बलिये’ सारखे प्रसिद्ध शो करून आपली गुणवत्तादेखील सिद्ध केली आहे. पण ब्रुनाचं सौंदर्य नेहमीच अशा हॉट फोटोशूटमध्ये प्रेक्षकांना पाहायला आवडतं आणि त्यामुळे ती नेहमीच असे वेगवेगळे फोटो आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट करत असते. आता यानंतर ब्रुना कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. प्रोजेक्ट नसल्यास, कोणतं नवं फोटोशूट ब्रुना घेऊन येणार याचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.


bruna 3


ब्रुनाने याआधीदेखील केलं टॉपलेस फोटोशूट


ब्रुना अतिशय बोल्ड अभिनेत्री असून तिने याआधीदेखील टॉपलेस फोटोशूट केलं आहे. ब्रुना ब्राझिलियन मॉडेल असून मूळ भारतीय आहे. तिचा हा फोटो फोटोग्राफर राहुल झांगियानी याने काढला होता. हा फोटो बराच व्हायरलदेखील झाला होता. यामध्येदेखील ब्रुनाने आपला हॉट अवतार आपल्या चाहत्यांना दाखवला होता. बॉलीवूडमध्ये आतापर्यंत जितक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे, तिने आपला बोल्ड अवतारच प्रेक्षकांना दाखवला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही आता ब्रुनाला हॉट आणि सिझलिंग अवतारात बघायची सवय झाली आहे. 


hot-bruna


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा 


सिम्बा आता होणार जंगलचा राजा, आला ‘लायन किंग’चा नवा टीझर


अभिनेत्री स्मिता तांबेचं नवीन क्षेत्रात पदार्पण


‘टोटल धमाल’ ची बॉक्स ऑफिसवर धूम