ADVERTISEMENT
home / Family Trips
Viral Video : समुद्रकिनाऱ्यावर कार नेण्याआधी ‘हा’ व्हिडीओ नक्की पाहा

Viral Video : समुद्रकिनाऱ्यावर कार नेण्याआधी ‘हा’ व्हिडीओ नक्की पाहा

मुंबई आणि आसपासच्या भागात पावसाने कालच हजेरी लावली आहे. आता सुरूवात होईल ती पावसाळी पिकनिक्स आणि हवश्या गवश्यांच्या अति उत्साही कारनाम्यांना. असाच एक अतिउत्साही ड्रायव्हरचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिलात का विरारजवळील नवापूरमधला व्हायरल झालेला हा व्हिडीओ?

समुद्रकिनाऱ्यावर वाळूत अडकलेली ही नवीकोरी पांढरी एर्टिगा गाडी आणि त्यात अडकलेला तरूण ड्रायव्हर. भरतीच्या वेळी शनिवारी विरारजवळच्या नवापूर बीचवर घडलेली ही घटना आहे. समुद्रकिनाऱ्यावर ही गाडी फिरवण्याचा मोह या गाडीच्या श्रीमंत ड्रायव्हरला खूपच महागात पडला. स्थानिकांनी मदत केली म्हणून त्याचा जीव कसाबसा वाचला पण गाडी काढायला मात्र चांगलीच कसरत करावी लागली. तब्बल दोन तास हे नाट्य सुरू होतं. पाहा हे थरारनाट्य –

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे ट्रॅक्टरलासुद्धा या गाडीला खेचणं शक्य नव्हतं. कारण लाटांच्या जोरामुळे आणि वाळूमुळे ती गाडी समुद्रात खेचली जात होती. अखेर भरती ओसरल्यावर ही गाडी खेचण्यात यश आलं. पण तोपर्यंत गाडीच्या इंजिनच चांगलंच नुकसान झालं होतं. त्यामुळे आता या समुद्र नाट्यानंतर ती गाडी कितपत चालेल, याबाबत शंकाच आहे.

beach-travel-6

ADVERTISEMENT

Also Read About अलिबाग बीच

विरार-वसईच्या आसपासचे किनारे स्वच्छ असल्याने इथे बऱ्याच प्रमाणात पर्यटक येतात. पण आजकाल पर्यटनाच्या नावाखाली पर्यटक निसर्गाचा विचार करताना मात्र दिसत नाहीत. परिणाम अशा घटना घडतात. कोकणातल्याही अनेक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत पर्यटक सर्रास चारचाकी वाहन घेऊन जातात. संध्याकाळच्या वेळी लांबच लांब अशी पार्किंगची रांग किनाऱ्यांवर दिसून येते. पण कुठेतरी हे चित्र बदलण्याची गरज आहे.

नवापूर बीचच्या घटनेत चालक बचावला पण दरवेळी असं घडेलच हे सांगता येणार नाही. त्यामुळे पुढच्या वेळी बीचवर जाताना गाडी न्या पण किनाऱ्यावर गाडी फिरवण्याचा मोह नक्की टाळा.

समुद्रकिनाऱ्यांवर घ्या अशी काळजी (Tips to follow on Rainy Beach Trip)

ADVERTISEMENT
  • मुंबई असो वा कोकण असो वा कोणताही समुद्रकिनाऱ्याचा भाग असो. समुद्रकिनारी पर्यटनाला जाताना तेही खासकरून पावसाळ्यात जाताना काही गोष्टी नक्की लक्षात घ्या.
  • कोणत्याही समुद्रकिनाऱ्यांवर गेल्यावर सर्वात आधी सूचना फलक पाहा आणि त्यावरील सूचनांच नक्की पालन करा.
  • पावसात भिजायचा कितीही उत्साह असला तरी आधी हवामानाचा अंदाज घ्या आणि मगच समुद्रकिनारी फिरायला जा.
  • व्यवस्थित पोहता येत असल्यासच पाण्यात उतरा कारण पावसाळी वातावरणात तुम्हाला समुद्राचा अंदाज येत नाही. त्यामुळे पोहता येणं आवश्यक आहे.
  • पोहण्यासाठीसुद्धा शक्यतो लाईफगार्ड्स केबिन किंवा मनोरा असलेलं ठिकाण निवडा. ज्यामुळे गरज लागल्यास तुम्हाला लगेच मदत मिळेल.
  • पावसाळ्यात बऱ्याचदा समुद्रकिनारी बुडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे समुद्रात उतरण्याआधी किनाऱ्यासंबंधी स्थानिकांकडून माहिती नक्की घ्या.
  • समुद्रातील लाटांचा अंदाज घ्या. कारण बरेचदा लाटा या आपल्या अंदाजापेक्षा जास्त ताकदीच्या असतात. नाहीतर वरच्या घटनेसारखे परिणाम भोगावे लागतील.
  • समुद्रकिनारी चारचाकी किंवा दुचाकी नेणं टाळा. किनाऱ्यांपासून विशिष्ट अंतरावर तुमची वाहनं पार्क करा.
  • समुद्रकिनारी मद्यपान करणं टाळा. तसंच समुद्री जीवांचाही अंदाज घ्या. कारण अनेक ठिकाणी समुद्रकिनारी माशांनी चावण्याच्या घटना दिसून येतात. 
  • आपल्यासोबतच्या व्यक्तींना नेहमी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर समुद्रात एखादी व्यक्ती खोलवर गेल्यास उशिरा कळल्यास काहीच उपयोग होणार नाही. पावसाळी वातावरणात कुठेही फिरायला गेल्यावर जीवावर बेतणारं साहस करणं टाळा.

पावसाळा आला आहे भरपूर एन्जॉय करा पण स्वतःचा जीव जपायला विसरू नका. 

फोटो सौजन्य – Instagram

व्हिडीओ सौजन्य – Twitter

हेही वाचा –

ADVERTISEMENT

Must Visit Destination : कोकणाच्या हृदयात वसलेलं दापोली

Weekend Gateway : शांत आणि नयनरम्य हरिहरेश्वर

उन्हाळ्यात मजामस्ती करण्यासाठी मुंबईतील परफेक्ट वॉटर पार्क्स!

11 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT