अमिताभ बच्चन यांच्या #Diwalipartyला सेलिब्रिटींची मांदियाळी

अमिताभ बच्चन यांच्या #Diwalipartyला सेलिब्रिटींची मांदियाळी

दिवाळीचं मस्त सेलिब्रेशन सगळीकडे सुरु आहे. यात सेलिब्रिटी तरी कसे मागे असतील. त्यांची  #Diwaliparty ही तितकीच ग्रँड असणार नाही का? सध्या काही सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवाळीसाठी खास तयारी केलेले हे सेलिब्रिटी अमिताभ बच्चन यांच्या घरी असलेल्या दिवाळी पार्टीसाठी आले असल्याचे कळत आहे. या दिवाळी पार्टीला सेलिब्रिटींच्या अदा पाहून ‘क्या अदा क्या जलवे तेरे’ असेच म्हणावेसे वाटेल. हेमा मालिनीपासून श्रद्धा कपूरपर्यंत सगळे सेलिब्रिटी दिसले आहेत. 

कॉपी’ सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा

अशी साजरी झाली अमिताभ बच्चन यांच्या घरी दिवाळी

Instagram

अमिताभ बच्चन यांच्या घरी दरवर्षी त्यांच्या मुंबईतील घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण दिले जाते. आता चक्क शहनशाह अमिताभ बच्चन यांची पार्टी म्हटल्यावर सेलिब्रिटी तर हमखास येणारच ना! या पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सगळ्या सेलिब्रिटींचा ट्रेडिशनल अवतार यामध्ये पाहायला मिळाला. साड्यांपासून ते  पंजाबी सूटपर्यंत वेगवेगळ्या स्टायलिश अवतारात सेलिब्रिटी दिसले.

Evergreen साडी

 फेस्टिव्ह सीजनसाठी साडी ही नेहमीच Evergreen पर्याय असतो. हेमामालिनी यांनी या पार्टीसाठी लाल आणि हिरव्या रंगाची रंगसंगती असलेली साडी नेसली होती. तर सुप्रिया पिळगावकर यांनी जांभळ्या रंगाची आणि गोल्डन बॉर्डर असलेली साडी, श्रद्धा कपूरने या पार्टीसाठी जांभळ्या रंगाची पैठणी तर तापसी, परिणिती चोप्रा, तारा सुतारीया आणि क्रिती सनॉन या पार्टीसाठी ग्लॅमरस साड्यांमध्ये दिसले. यासोबतच माधुरी दीक्षित, काजोल यांनी देखील या खास सोहळ्यासाठी साडी नेसली होती. अनेकांनी या पार्टीला सहकुटुंब हजेरी लावली होती.

View this post on Instagram

#tarasutaria ❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

यांनीही जिंकली मनं

बच्चन यांची दिवाळी इतकी ग्रँड होती की, यासाठी भरपूर सेलिब्रिटी आले होते. सारा खान, जान्हवी कपूर, काजोल, सोनाक्षी सिन्हा, किआरा अडवानी असे सेलिब्रिटी दिसले. ते ही स्टाईल्सच्या बाबतीत काही मागे नव्हते. या सगळ्यांच्या अदांनी सगळ्यांची मनं जिंकली. त्या सगळ्यांचे मेकअप, त्यांचे गेटअप या सगळ्यांनी पापाराझींची मनं जिंकून घेतली.

सेलिब्रेटीज स्पेशल दिवाळीच्या आठवणी

सोनमनेही दिली पार्टी

अमिताभ बच्चन यांच्या पार्टीसोबत सोनम कपूर हिने देखील तिच्या घरी पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठीही सेलिब्रिटी आहे होते. सोनम कपूरचा एक वेगळा अंदाज या पार्टीसाठी दिसला. तिचा दिवाळी पार्टीसाठीचा लुक तितकाच ग्लॅमरस होता. आनंद आहुजा आणि सोनम कपूर यांनी ठेवलेल्या पार्टीमध्ये सेलिब्रिटींनी त्यांचा गेटअपही बदलला होता. एकूणच सेलिब्रिटींची ही दिवाळी एकदम खास होती. त्यामुळे 2019 ची दिवाळी ही सेलिब्रिटींसाठी एकदम खास होती.  अजूनही सेलिब्रिटीजच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण या फेस्टिव्ह सीझनला सगळ्या सेलिब्रिटीजचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळालाय. ट्रेडिशनल वेअरमध्ये फ्रेश कलरचा एकूणच ट्रेंड दिसून आला.

  खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.