#MatKarForward - खोट्या मेसेजपासून सावध राहण्यासाठी सेलेब्रिटी सरसावले

#MatKarForward - खोट्या मेसेजपासून सावध राहण्यासाठी सेलेब्रिटी सरसावले

कोरोनाशी लढा देण्यासाठी जनजागृती वाढविण्यासाठी बॉलीवूडमधील सेलेब्रिटी अथक प्रयत्न करत आहेत. अगदी वैयक्तिक व्हिडिओपासून ते एकमेकांच्या मदतीनेही अनेक माहितीपर व्हिडिओ बनवून जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी चुकीचे  मेसेजही फॉरवर्ड होतात. ज्याला बरेच लोक बळी पडतात आणि तसं केल्याने चांगलं होईल असं वाटून ते मेसेज पुढे फॉरवर्ड करतात अथवा तसं वागण्याचा प्रयत्न करतात. पण यामध्ये या व्यक्तींचं नुकसान आहे हेदेखील त्यांना कळत नाही. असेच चुकीचे मेसेज फॉरवर्ड करण्यात येऊ नयेत म्हणून पुन्हा एकदा सेलिब्रिटी पुढे सरसावले आहेत. आयुषमान खुराणा, विराट कोहली, सारा अली खान आणि क्रिती सनॉन यांचा हा #MatKarForward व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अत्यंत चांगला विचार करून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. 

दीपिकाने कच्च्या कैरीचा फोटो केला शेअर, गरोदर असल्याचा चाहत्यांचा अंदाज

खोट्या बातम्यांपासून राहा सावधान, अफवा पसरवू नका

जितक्या इतर गोष्टी आपल्यासाठी त्रासदायक आहेत तितक्याच या काळात खोट्या बातम्या आणि अफवाही त्रासदायक आहेत. पण या अफवांना आणि अशा फॉरवर्ड मेसेजना आळा बसणंही तितकंच गरजेचे  आहे. त्यासाठी या चारही सेलिब्रिटींना पुढाकार घेत लोकांच्या जनजागृतीसाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून याला लाखो लाईक्स आणि कमेंट्ही आल्या आहेत. आपल्या हाताता टेक्नॉलॉजी आहे म्हणून त्याचा अयोग्य वापर न करता योग्य वापर करूया अशा स्वरूपाचा संदेशही यातून देण्यात आला आहे. या सगळ्या खोट्या  आणि अयोग्य गोष्टीपासून आपण सर्वांनीच लांब राहूया आणि आणि असे मेसेज फॉरवर्ड करण्यापासूनही वाचूया अशा स्वरूपाचा संदेश या व्हिडिओमार्फत या सेलिब्रिटींना दिला आहे. अगदी मनापासून आयुषमान खुराणा, विराट कोहली, सारा अली खान आणि क्रिती सनॉन यांनी लोकांना आपल्या चाहत्यांना #MatKarForward हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

चित्रपटात खलनायिका साकारूनही 'या' अभिनेत्री ठरल्या यशस्वी

सोशल मीडियावर केली जात आहे जनजागृती

सोशल मीडिया हे उत्कृष्ट माध्यम आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सगळीकडेच व्हायरल झाला आहे. असे चुकीचे मेसेज आणि अफवा पसरवणे हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. याचीच जाणीव करून देण्यात आली आहे. मात्र हा व्हिडिओ सर्वांनी आपापल्या घरी बसूनच चित्रीत केला आहे. टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने हा व्हिडिओ अप्रतिमरित्या एडिट करण्यात आला आहे. बघताना मात्र सर्व एका टेबलवर बसून बोलत असल्यासारखे दिसते. मात्र प्रत्यक्षात सर्वांनी आपापल्या घरात राहूनच सोशल डिस्टस्टिंग पाळूनच लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विराटने लिहिले, ‘आम्ही देशासाठी खेळताना तुम्ही आम्हाला नेहमीच पाठिंबा देता. पण आता देशाला तुमची गरज आहे. मी, आपण सर्वांनी आता देशासाठी झटायला हवं. तुम्हीदेखील यामध्ये सहभागी व्हाल का? #MatKarForward @TikTok_IN.’ असे चुकीचे मेसेज पसरवू नका आणि असे त्रासदायक मेसेज थांबवण्यासाठी मदत करा असा संदेशही यातून देण्यात आला आहे. कारण अशा मेसेजमधून अनेक समस्या उद्भवतात ज्यामुळे बऱ्याच जणांचे नुकसान होतानाही दिसून  येते आहे. त्यामुळे असे मेसेज पसरवणं थांबवा आणि कृपया कोणत्याही प्रकारे असे मेसेज फॉरवर्ड करू नका अशीच कळकळीची विनंती या सर्वांनी केली आहे. 

बाहुबलीनंतर एस,एस, राजमौली बनवणार का 'रामायणा'वर चित्रपट