वाढीव वीजबिलांचा सेलिब्रिटींना फटका, बिलाचा आकडा पाहून झाले हैराण

वाढीव वीजबिलांचा सेलिब्रिटींना फटका, बिलाचा आकडा पाहून झाले हैराण

सध्या जिकडे तिकडे चर्चा होत आहे ती वीजबिलांची. कारण वीजबिलांचा आकडा पाहून अनेकांना आकडी यायची वेळ आली आहे. गेली तीन महिने घरात राहून काम करण्याची वेळ कोरोनामुळे सगळ्यांवर आली आहे.आधीच पगार कपात किंवा कामाईचे साधन नाही. त्यात आलेल्या वीजबिलांमुळे सर्वसामान्य तर हैराण आहेच. पण सेलिब्रिटींनाही ही बिल जोईजड झाली आहेत. वीजेचा इतका वापरही केला नाही तरी इतकी वीजबिल का दिली? याची विचारण त्यांनी त्यांची बिल सादर करत ट्विट केली आहेत. तापसी पन्नू, रेणुका शहाणे, वीर दास अशा अनेकांनी त्यांची बिलं सादर करुन तक्रार केली आहे.

बॉलीवूडच्या 'मास्टरजी' सरोज खान यांचे निधन

 

बिलाच्या आकड्यामुळे सेलिब्स हैराण

साधारण मार्च महिन्यापासून आपल्या देशात अंशत: लॉकडाऊन सुरु झाला आणि पुढे तो वाढत गेला. एप्रिल, मे आणि जून असे तीन महिने सगळ्यांनीच घरी बसून काढले आहेत. घरातूनच कामं केली जात आहे. शूटिंग बंद असल्यामुळे सेलिब्रिटीही त्यांच्या घरी आहेत. आता सेलिब्रिटी म्हणजे त्यांच्या गरजा थोड्या जास्त असल्या तरी माणसांपेक्षा काही वेगळ्या नाहीत.त्यांना दर महिन्याला अपेक्षित असलेल्या बिलाहून तिप्पट बिल आल्यामुळेच त्यांचे डोळे विस्फारले हे असे का असा जबाब त्यांनी त्यांच्या वीजबोर्डाला विचारला आहे. तापसी पन्नूने तिच्या बिलाचा फोटो काढला आहे. तिला जून महिन्याचे बिल चक्क 36 हजार इतके आले आहे. या बिलासोबत तिने तिच्या आधीच्या काही महिन्यांची बिल ही सादर केली आहेत. जी बिलं 5 ते 6  हजारांच्या घरात आहेत. दुसरीकडे रेणुका शहाणे यांनी सुद्धा त्यांच्या बिलाचा फोटो काढून ट्विटरवर काढला आहे. 

अंदाजित बिलांचा सगळ्यांना फटका

सध्या लॉकडाऊनमुळे मीटर रिडींग हा प्रकार सगळीकडेच केला जात नाही. त्यामुळे बिलांची निश्चित रक्कम आणि त्या रक्कमेचे बिल काढण्यात आलेले नाही. त्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला आहे. पण जून आणि जुलै महिन्यात आलेले बिल हे तोंडाला फेस आणणारे आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. या बिलाचा आकडा आतापर्यंत भरलेल्या सगळ्या बिलांच्या तुलनेत इतका जास्त आहे की, अनेकांना ही रक्कम भरायची कसा असा प्रश्न पडला आहे. 

...तर आत्महत्या करेन..प्रसिद्ध अभिनेत्री झाली सोशल मीडियावर व्यक्त

जिकडे तिकडे बिलाची चर्चा

सध्या देशात सुरु असलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोनावर रोज चर्चा होत असताना आता वीजबिलाची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. अनेकांना वीजबिलाने इतका धक्का दिला आहे की, त्यांनी त्यावर विचारणा तर केली आहेच. पण या वीजबिलावर मीम्सही करण्याचे धाडस अनेकांनी केले आहे. त्यामुळे तुम्ही ट्विटर सुरु करा किंवा इन्स्टाग्राम तुम्हाला वीजबिलासंदर्भात मीम्स हे नक्कीच सापडणार !


एकूणच काय सेलिब्रिटी असो किंवा कोणीही वीजबिलाने सगळ्यांनाच हैराण करुन सोडले आहे. 

सुशांत सिंह राजपूतचा हा फोटो तुम्हालाही करेल भावुक