लॉकडाऊनमध्ये केले या सेलिब्रिटींनी 'शुभमंगल'

लॉकडाऊनमध्ये केले या सेलिब्रिटींनी 'शुभमंगल'

लॉकडाऊन चालू असतानाही असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी लग्न केलं आहे. या काळातही लग्नसमारंभाचा जास्त थाट न करता या सेलिब्रिटींना आपला लग्नसोहळा थोडक्यात उरकून घेतला आहे. त्यांच्या चाहत्यांनाही लॉकडाऊनमध्ये या सेलिब्रिटींनी लग्न का केलं असा प्रश्न पडला असला तरीही या सेलिब्रिटींनी मात्र आपल्या जोडीदारांसह संसार सुरू करण्यासाठी हा काळ योग्य समजून लग्न करून घेतलं आहे. यावर्षी कोरोनामुळे अनेकांची लग्न पुढे ढकलली गेली. मात्र काही सेलिब्रिटींनी आता लॉकडाऊनच्या काळात आपलं लग्न उरकून घेतलं आहे. कोणताही जास्त थाटमाट न करता अगदी घरच्या आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत या सेलिब्रिटींनी हा विवाह सोहळा पार पाडला आहे. असे कोणते सेलिब्रिटी आहेत ते आपण जाणून घेऊया. 

राणा दुगुबट्टी आणि मिहिका बजाज

राणाने मिहिकाबरोबर आपण लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं मे महिन्यात सोशल मीडियावर जाहीर केले. ‘बाहुबली’फेम राणाचे अनेक चाहते आहेत. नुकताच 8 ऑगस्ट रोजी राणा आणि मिहिकाचा लग्न सोहळा कुटुंबातील सदस्य आणि अगदी जवळचे मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत पार पडला. हैदराबादमधील रामानायडू स्टुडिओमध्ये या दोघांनी लग्न केले. सर्व रितीरिवाज व्यवस्थित करूनच हे लग्न पार पडलं. मात्र लॉकडाऊन असूनही या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यात मिहिकाने लग्नाला होकार दिल्याची पोस्ट राणाने सोशल मीडियावर केली होती. मात्र याच वर्षी दोघं विवाहबद्ध होतील अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांनी केली नव्हती. मात्र दोघांनीही लगेच लग्न करून चाहत्यांनाही सुखद धक्का दिला आहे. 

प्राची तेहलान आणि रोहित सरोहा

‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्री प्राची तेहलानने दिल्लीतील उद्योगपती रोहित सरोहा याच्याशी 7 ऑगस्ट रोजी लग्नगाठ बांधली. प्राची केवळ अभिनेत्रीच नाही तर भारतीय बास्केटबॉलपटू म्हणूनही तिने नाव कमावलं आहे. प्राचीला मोठ्या धुमधडाक्यात लग्न करायचं होतं. मात्र प्राचीने लॉकडाऊनमधील सर्व नियमांचं पालन करत याच काळात लग्न करणं योग्य समजलं आहे. प्राचीच्या इन्स्टावर तिने आपल्या लग्नातील फोटोही शेअर केले आहेत. दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे.  

Good News: करिना कपूर पुन्हा होणार आई, घरात येणार पाहुणा

पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा

पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्माच्या साखरपुड्यालाही बरेच महिने झाले होते. या जोडीनेही याच काळात अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. इतकंच नाही तर या दोघांनी न्यायालयात लग्न करून लग्नासाठी साठवलेले पैसे हे कोरोनाग्रस्त लोकांना दान केल्याचंही तिने सांगितलं. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने ही माहिती दिली. पूजा  आणि कुणालने धुमधडाक्यात साखरपुडा केला होता. हे दोघेही एकमेकांना अनेक वर्ष ओळखत असून एप्रिल महिन्यात दोघेही मोठ्या स्वरूपात लग्न करणार होते. मात्र लग्नाच्या खर्चापेक्षा त्यांना मदत करणे जास्त योग्य वाटले. म्हणून त्यांनी जमवलेले पैसे दान केले आणि लग्न साध्या पद्धतीने केले. 

राकेश बापट घेणार ऑनलाईन क्लास स्वतःच बनवा 'बाप्पाची मुर्ती'

मनिष रायसिंह आणि संगीता चौहान

‘ससुराल सिमर का’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता मनिष रायसिंहने आपली प्रेयसी अभिनेत्री संगीता चौहानसह 30 जून रोजी लग्न केले. या दोघांनी आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत गुरुद्वारामध्ये लग्न केले. कोणत्याही पद्धतीचा गाजावाजा न करता दोघांनी लॉकडाऊन काळात लग्न केले आहे. मनिष आणि संगीताच्या लग्नानंतर त्यांच्या मित्रमैत्रिणींनी त्यांना सोशल मीडियावरच शुभेच्छा दिल्या होत्या.

खऱ्या आयुष्यातही व्हायचे आहे गुंजन सक्सेनाच्या वडिलांसारखे- पंकज त्रिपाठी

नितीन रेड्डी आणि शालिनी कंदुकरी

तेलगूमधील प्रसिद्ध अभिनेता नितीन रेड्डीनेदेखील लॉकडाऊन काळात शालिनी कंदुकरीशी लग्न केले. सर्व नियमांचे पालन करत हैदराबादमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. या दोघांनीही जुलै महिन्यात लग्न केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा