‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचं पहिलंवहिलं ‘माझ्या दिलाचो’ गाणं झालं रिलीज

‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचं पहिलंवहिलं ‘माझ्या दिलाचो’ गाणं झालं रिलीज

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ सिनेमाचं ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणं रिलीज झालं आहे. ‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘रायझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केलं आहे.


आळंदीच्या चैतन्यचा कोंकणी सूर
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by Chaitanya Devdhe Official (@chaitanya_devdhe_official) on
‘सूर नवा ध्यास नवा’ रिएलिटी शोमध्ये दिसत असलेल्या चैतन्यचं हे पहिलं मराठी गाणं आहे. गाण्याबाबत आळंदीचा चैतन्य देवढे सांगतो की, “मी स्वत:ला खूप लकी समजतो की, सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण ह्या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असं मी मानतो.”


चैतन्यचीच निवड का?
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by Chaitanya Devdhe Official (@chaitanya_devdhe_official) on
मूळचा आळंदीचा असलेल्या चैतन्यचीच या गाण्यासाठी खास निवड करण्यामागचं कारण सांगितलं लकी चित्रपटाचे निर्माते सूरज सिंग यांनी, “या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना चैतन्यचा आवाज खूप आवडला. आळंदीच्या चैतन्यला आवाजाची दैवी देणगीच मिळालीय. त्याच्या आवाजातली निरागसता या गाण्याला अगदी साजेशी आहे.


luckee-kokani-song-4


अभयनेही हे गाणं रूपेरी पडद्यावर उत्तम साकारलंय.”


‘माझ्या दिलाचो’ गाण्याला पंकज पडघन यांचं संगीत


या गाण्याचे गीतकार ‘यो’ (सचिन पाठक)असून त्यांच्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. संगीतकार पंकज पडघन यांनी सांगितलं की, “नव्या प्रतिभेसोबत काम करायला मला आणि संजयदादांना नेहमीच आवडतं. चैतन्यची आकलन क्षमता खूप चांगली आहे. त्याने एकाच दिवसात या गाण्याचा रियाज करून गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. हे कोंकणी गाणे ऐकताना तो कोंकणी पहिल्यांदाच बोलतोय, असं तुम्हांला अजिबात वाटणार नाही, ही या गाण्याची जमेची बाजू म्हणायला हवी.”


'लकी' चित्रपटाच्या ‘कोपचा’ गाण्यातून जीतेंद्र-श्रीदेवीच्या ‘हिम्मतवाला’ सिनेमाला ट्रिब्यूट


गोव्यातील प्रतिभेलाही मिळाला गाण्यात वाव


luckee-kokani-song-2


लकी चित्रपटातलं हे गाणे अभिनेता अभय महाजनवर चित्रीत करण्यात आलंय. अभय महाजनने याबाबत दिलेली प्रतिक्रिया, “या गाण्याच्या निमित्ताने चैतन्य देवढेला जसं संजयदादांनी लाँच केलं, तसंच गोव्यातल्या प्रतिभेलाही या गाण्यातून रूपेरी पडद्यावर आणलंय. माझ्यासोबत गाण्यात नाचणारे सगळे डान्सर्स गोव्यातले आहेत आणि त्यांचीही पहिली फिल्म आहे. ऑक्टोबरच्या 40-45 डिग्रीच्या तळपत्या उन्हांत हे गाणं चित्रीत झालंय. पण चैतन्यच्या आवाजातल्या गोडव्यामूळे आणि तिथल्या डान्सर्सच्या चैतन्यामूळे असावं कदाचित डान्स करताना हुरूप येत होता.”


पाहा या गाण्याची खास झलक  
संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' या चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला रिलीज होणार आहे.