छत्रपती शासन चित्रपटाची जवानांना अनोखी मानवंदना

छत्रपती शासन चित्रपटाची जवानांना अनोखी मानवंदना

अंधार होत चाललाय दिवा पाहिजे, या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे
मराठे झाले राजकारणी भक्त, मराठ्यांच्याच तलवारीला मराठ्यांचे रक्त
पुन्हा एकदा रायगडावर धावा पाहिजे, माझा हरहर महादेव हवा पाहिजे
या देशाला त्या जिजाऊचा शिवा पाहिजे...एक जवान


आगामी 'छत्रपती शासन' चित्रपटातील या शिवाजी महाराजांना समर्पित या ओळी. नुकताच छत्रपती शासन सिनेमाचा खास प्रिमियर शो जवानांसाठी बेळगावमधील मराठा लाईट इंफट्रींच्या शार्कत हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कर्नल पी. एल. जयराम, सुभेदार मेजर के.हरेकर, चंद्रकांत टिकुर्ले आणि छत्रपती शासन सिनेमाच्या निर्मात्या प्रियांका कागले तसंच रेजिमेंटमधील जवळपास ३०० ते ३५०  जवान उपस्थित होते. जवानांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या कामाचे विशेष कौतुक करण्यासाठी आयोजित केलेला सिनेमाचा खास खेळ जवानांनीदेखील मनापासून अनुभवला.
 

 

 


View this post on Instagram


 

 

बेळगाव येथील 'मराठा लाईट इनफंटरी रेजिमेंट सेंटर' येथील जवानांसाठी संपन्न झालेल्या खुशाल म्हेत्रे लिखित व दिग्दर्शित 'छत्रपती शासन' चित्रपटाच्या प्रीमिअर शो वेळी मान्यवर कर्नल पी. एल. जयराम, सुभेदार मेजर के.हरेकर व चंद्रकांत टिकुर्ले यांच्या समवेत चित्रपटाच्या निर्मात्या प्रियांका कागले व रेजिमेंट मधील जवान उपस्थित होते. सैनिकहो तुमच्या शौर्याने जातो उजळून आमचा माथा... छत्रपतींचे तुम्ही मावळे तुम्हांस अर्पण तुमचीच गाथा.. #छत्रपतीशासन ..! #१५मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात #chatrapatishashan #15march


A post shared by छत्रपती शासन (@chatrapatishasanthefilm) on
छत्रपती महाराजांची खरी ताकद म्हणजे त्यांचे मावळे. स्वराज्यासाठी प्राण तळहातावर घेऊन जगणारे महाराजांचे मावळे आणि आताचे आपले जवान यांच्या कार्याला नुसतीच ही कलाकृती फक्त अर्पण केली नसून सिनेमाच्या नफ्यातील १० टक्के भाग हा जवानांच्या हितार्थ देण्यात येणार असल्याचं कळतंय. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना कर्नल पी. एल. जयराम म्हणाले की, चित्रपट क्षेत्रातील नामांकित व्यक्तींसोबत सिनेमाचा प्रीमियर करण्याच्या परंपरेला बगल देत आर्मी जवानांसोबत या सिनेमाचा प्रीमियर करण्यात आला. ही खरंच वेगळी संकल्पना आहे. तसंच सुभेदार मेजर के. हरेकर सिनेमाबाबत एक विशेष गोष्ट नमूद केली. ती म्हणजे, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेमक्या विचारांबद्दल अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्याचा सगळ्यांनी सखोल विचार केला तर समाजात नक्की चांगल्याप्रकारे बदल होईल. आमच्या जवानांनाही हुरूप देणारा हा सिनेमा आहे. १५ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या छत्रपती शासन सिनेमाला आमच्या शुभेच्छा.’ या प्रसंगी छत्रपती शासन सिनेमाच्या टीम मधील श्रेयस गायकवाड, रवी सोनावणे, गणेश बिच्छेवार, प्रथमेश मांढरे, गौरव सुभेदार उपस्थित होते.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

"छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या रक्तात भिनलेत...?? हृदयातुन डायरेक्ट रक्तात आलेत..? मग ते जरा मेंदूत डोकावले असते तर बरं झालं नसतं का..??" मेंदूला झिणझिण्या हा संवाद आहे ‘छत्रपती शासन’ ह्या १५ मार्च ला येणा-या चित्रपटातला.. ह्या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे.. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या मराठी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा आणि तितकाच अभिमानाचा, गर्वाचा विषय. पण त्यामुळंच महाराजांवरची कुठलिही कलाकृती एका दर्जाची असेल तरच ती भावते. आणि त्यात जर महाराज नेहमीच्या पठडीतले न दाखवता, ते काय होते हे समजुन आणि इतरांना समजावुन द्यायचं असेल तर कर्मकठीण काम.. पण हे शिवधनुष्य उचललं आणि समर्थपणे पेललय ते खुशाल म्हेत्रे आणि त्यांच्या टिमनं. मनोरंजन आणि प्रबोधन याची योग्य ती सांगड घालत, महाराजांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान, त्यांची तत्व हे सगळं आजच्या युगातल्या तरुणांना भावेल, उमजेल अशा भाषेत मांडण्यात आलय. छत्रपती शासन काय होतं आणि ते परत कसं येऊ शकेल याची ही गोष्ट.. ‘छत्रपती शासन’. मकरंद देशपांडे, संतोष जुवेकर, किशोर कदम, अभिजीत चव्हाण अशी मातब्बर कलाकार मंडळी ह्या चित्रपटात आहेत.. सोबतीला काही नविन चेहरेही दिसतायेत.. चित्रपटाच्या ट्रेलरच्या व्ह्युजनं लाखाचा आकडा केंव्हाच ओलांडलाय आणि आता तर त्यातली गाणीही धुमाकुळ घालतायेत.. त्यातील एका गाण्याची लींक खास तुमच्यासाठी.. https://youtu.be/tYb4Th9bjxg प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड फिल्म्स निर्मित खुशाल म्हेत्रे व टिम कृत छत्रपती शासन मार्च १५ #छत्रपतीशासन ..! #१५मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. #chatrapatishashan #15march


A post shared by छत्रपती शासन (@chatrapatishasanthefilm) on
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरूणांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर लाँच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराज भोसले यांनी केला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे करत असून कथा आणि संवाददेखील त्यांचेच आहेत. या चित्रपटात अभिनेता मकरंद देशपांडे, किशोर कदम, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित छत्रपती शासन हा सिनेमा येत्या १५ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


हेही वाचा - 


छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला


पंच प्रवीण तरडे करणार 'सूर सपाटा'चा निवाडा


नव्या वर्षात ५ चित्रपट उलगडणार देशाचा इतिहास