प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझाला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझाला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

नृत्य म्हटलं की सध्या सर्वात पहिला चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे रेमो डिसुझा. अनेक नव्या कलाकारांनाही नृत्यामध्ये पुढे आणण्याचं काम रेमोने केले आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझाला हृदयविकाराच्या झटका आला असून मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची तब्बेत ठीक असून डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. नक्की कोणत्या कारणामुळे त्याला हा झटका आला अथवा त्याच्यावर नक्की कोणत्या गोष्टींचा ताण होता याची कोणालाही माहिती नाही. मात्र आता त्याची तब्बेत स्थिरावत असल्याचे सांगण्यात येत आहे. रेमो हा नेहमी आरोग्याची काळजी घेणारा असून नियमित व्यायाम करताना व्हिडिओही पोस्ट करत असे. त्यामुळे त्याला आलेला हा हार्ट अटॅकमुळे सगळेच धास्तावले आहेत. तर लवकरात लवकर रेमोची तब्बेत सुधारावी यासाठी त्याचे सर्व मित्र आणि चाहते प्रार्थनाही करत आहेत. दरम्यान त्याची प्रकृती स्थिर असण्याचेही सांगण्यात येत आहे. 

सैफ आणि करिनाच्या दुसऱ्या बाळाचं काय असणार नाव, केला खुलासा

रूग्णालयाच्या बाहेर धर्मेश आणि आमिर अली

रेमो डिसुझा हे नाव बॉलीवूडला नवं नाही. आपल्या तालावर अनेकांना रेमोने नाचवलं आहे. तर रेमोला नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. रेमो गेले अनेक वर्ष रियालिटी शो मध्ये परीक्षक म्हणूनही काम पाहत आहे. त्याशिवाय चित्रपटांचे दिग्दर्शनही रेमो करत आहे. अनेक नव्या मुलांना संधी देत त्यांनाही रेमोने कामं मिळवून दिली. त्यातील सर्वात महत्वाचे नाव म्हणजे धर्मेश सर. तर अभिनेता आमिर अली हा रेमोच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. सध्या रूग्णालयाच्या बाहेर धर्मेश आणि आमिर दोघेही असून रेमोच्या तब्बेतीविषयी त्यांनाही तितकीच काळजी आहे. कोरोना कालावधी असल्याने रूग्णालयात जास्त लोकांना प्रवेश नाही. मात्र कोणत्याही मदतीची गरज भासली तर त्याकरिता तिथेच थांबण्याचा निर्णय आमिर आणि धर्मेशने सध्या घेतला असावा. त्याचसह नृत्य दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवत असलेला राहुल शेट्टीही सध्या त्यांच्यासह असून लवकरच रेमोची तब्बेत सुधारेल यासह आता सगळेच प्रार्थना करत आहेत. 

Bigg Boss14 : राहुल, निकी, अली गोनी येणार परत, सुत्रांनी दिली माहिती

अजून अधिकृत स्टेटमेंट नाही

याबाबत अजून कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेमोची तब्बेत स्थित असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून आता तब्बेत ठीक आहे. मात्र त्याला भेटायला जायची कोणालाही परवानगी नाही. दरम्यान त्याच्या पत्नीने अथवा त्याच्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेले नाही. त्यामुळे कोणतीही अन्य माहिती अजून मिळालेली नाही. पण रेमो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना सुरू केली आहे. तर सोशल मीडियावर अनेक कमेंट्समधून त्याच्या तब्बेतीविषयी काळजी व्यक्त होत आहे. तर लवकरच रेमोच्या जवळच्यापैकी कोणत्याही व्यक्तीने त्याच्याविषयी सांगावे असेही बऱ्याच जणांना वाटत आहे. 

प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात, फोटो व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक