देशात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी आता देश पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी सुरुवात झाली आहे. लोकांना दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टी पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर आता Unlock चा आणखी एक टप्पा या महिन्यापासून (ऑक्टोबर) सुरु होणार आहे. सप्टेंबरच्या शेवटाला काही नव्या गोष्टी Unlock होण्याची यादी समोर आली असून अखेर सहा महिन्यांनी थिएटर आणि मल्टीप्लेक्स सुरु करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून थिएटर सुरु करण्यात येणार असून कोव्हिड काळातील काळजी घेत चित्रपटगृहात चित्रपटप्रेमींना प्रवेश दिला जाणार आहे.
सर्जरीनंतर पहिल्यांदाच रणदीप हुड्डाने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ
50 % क्षमतेने श्री गणेशा
गेल्या काही महिन्यांपासून जे चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. ते थिएटर सुरु होण्याची वाट पाहात आहेत. अनेक चित्रपट निर्मात्यांनी नुकसान टाळण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज केले. पण आता या नव्या निर्णयाने सगळ्यांच निर्मात्यांना आणि मल्टीप्लेक्स धारकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेल्या थिएटरला उघडण्याची परवानगी मिळाल्यामुळे आता थिएटरचे कर्मचारीही कामावर परतणार आहेत. शिवाय कोव्हिडची सर्व काळजी घेत याचा श्री गणेशा करण्यात येणार आहे. नियमावलीनुसार थिएटर्सही 50% क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या सगळ्यांची तपासणी करणे, सॅनिटाईज करणे काळजी घ्यावी लागणार आहे.
आर्थिक स्थितीत येईल सुधारणा
माहामारी आल्यानंतर एकाएकी सगळा देश थांबून गेला. गर्दीची ठिकाणं टाळण्यासाठी मॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल्स अशा सगळ्याच गोष्टी बंद करण्यात आल्या. पण अवघ्या काही महिन्यातच सगळे काही ठप्प झाल्यामुळे देशाचा आर्थिक कणा मोडून गेला. एकीकडे रुगणांची संख्या वाढत असताना देशाला पुन्हा आर्थिक उभारी देण्यासाठी तीन महिन्यानंतर Unlock ची प्रक्रिया राबण्यात आली. प्रत्येक राज्याने तेथील रुग्णांची संख्या विचारात घेऊन उद्योग, दुकानं आणि गर्दीची ठिकाणं उघडण्याची परवानगी दिली. महाराष्ट्रात मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी ही #MissionBeginAgain चा नारा देत हळुहळू मुंबई अनलॉक करायला सुरुवात केली. त्यामध्ये आता मल्टीप्लेक्स, सिनेमागृह, जलतरण तलाव, हॉटेल्स यांचा समावेश करण्यात आला आहे.
एका नवोदित अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू
चित्रपटांच्या शूटिंगचा झाला श्रीगणेशा
Unlock ला सुरुवात झाल्यापासून एक एक गोष्टी सुरु करण्याची परवानगी मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेल्या शूटिंंगलाही आता वेग आला आहे. मालिका- चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अनेक चित्रपट आता रिलीज होण्याच्या मार्गावर आाहे. थिएटर्स सुरु झाल्यानंतर आता पहिला चित्रपट कोणता पाहता येईल असा उत्साह अनेकांमध्ये संचारला आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार जे चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आले आहेत. तेच चित्रपट आता मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृहात लागण्याची दाट शक्यता आहे.
मल्टीप्लेक्ससोबतच आता 5 तारखेपासून तुम्हाला तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्याचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे हा नवा महिना तुमच्यासाठी नवा आनंद घेऊन येणार आहे.
बिग बॉस 14′ वर माँ चा आशिर्वाद, शो प्रसारित होण्याआधीच जोरदार चर्चा