आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

आपल्या मधूर गायनाने जगभरातील लोकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचं रुपेरी पंख खोचलं गेलं आहे. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 2020 चा हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. या निमित्ताने जाणून घेऊया आशा भोसले यांच्याविषयी काही रंजक माहिती

पतीला घटस्फोटीत आणि जाड म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने सुनावले खडेबोल

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी एक बैठक पार पडली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची निवड करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत  उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित विलासराव देशमुख, इतर मंत्री आणि शासकीय सदस्य उपस्थित होते. यावेळी एकमताने आशाताई भोसले यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली महाराष्ट्र सरकाराचा हा पुरस्कार हा केवळ एका क्षेत्रासाठी नाही तर आतापर्यंत वेगवेगळ्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्याता आला आहे. संगीत क्षेत्रातील आशाताई यांचे .चित्रपटसृष्टीतील  योगदान हे वाखाण्ण्यासारखे आहे. त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी गायली आहेत.  या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंद केले आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

आतापर्यंत गायली 16 हजार गाणी

संगीत म्हटले की, मंगेशकर कुटुंबियांचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. लता- आशा ही बहिणींची जोडी कोणाला माहीत नसेल अशी व्यक्ती विरळाच असेल. प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांची कन्या आशा भोसले. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी, तामिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रुसी भाषेत त्यांनी पार्श्वगायन केलेले आहे.  वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी एका चित्रपटासाठी गाणं गायलं ते गाणं म्हणजे चुनरिया चित्रपटातील ‘सावन आया है’  त्यांच्या गायनाची खासियत अशी की, त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतच गायले नाही तर त्या काळात असूनही काही सुंदर पॉप गाणी गायली जी आजही फारच प्रसिद्ध आहे. त्यांच्या या पॉप संगीताला कशाचीच तोड नाही असे म्हणायला हवे. 

‘अप्सरा आली’, साडीमधील सोनालीच्या मनमोहक अदा

पळून केले होते लग्न

आशाताई यांच्या लग्नाची गोष्टही तितकीच वेगळी आहे. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले तेव्हा मंगेशकर भावंड लहान होती. पण या मुलांना शास्त्रीय संगीताचे आधीच प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांनी लहान वयातच चित्रपटांमध्ये गाण्याची जबाबदारी घेतली. अनेक हिंदी, मराठी आणि वेगवेगळ्या भाषेत गाणी गायला त्यांनी सुरुवात केली. आशाताई यांच्या आवाजात जादू होती. त्यांनी 16 वर्षाचे असताना त्यांचे मॅनेजर गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले. पण त्यांचा संसार हा फार काळासाठी टिकला नाही. सासरच्यांकडून होणारा त्रासाला कंटाळून त्यांनी आहे त्या कपड्यानिशी घर सोडले. दोन मुले आणि पोटात असलेले  बाळ घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. त्यांच्या लग्नाने घरातले खूश नव्हते.   त्यानंतर त्यांना सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मनसोबत लग्न केले. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हे नाते निभावले. 

दरम्यान, आता आशाताई यांना हा मानाचा आणखी एक पुरस्कार मिळाला.त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

माई-माधवचा असा अवतार पाहिल्यामुळे प्रेक्षकांना बसला धक्का, उलगडणार वाड्याची कथा