हिना खानने शेअर केला बिग बॉस 14 च्या सेटवरचा हा व्हिडिओ

हिना खानने शेअर केला बिग बॉस 14 च्या सेटवरचा हा व्हिडिओ

थंडावलेल्या टीव्ही विश्वाला मालिकांच्या नव्या एपिसोड्सनी झळाळी आणली असली तरी टीव्हीवरील रिअॅलिटी शो हे कायमच उत्सुकतेचा भाग राहिले आहेत. बिग बॉस 14 च्या सीझनची घोषणा झाल्यापासून यामध्ये कोणते स्पर्धक असणार, नियम काय असणार याचा प्रोमो कधी येणार? असे सगळे प्रश्न अनेकांना पडले आहेत. पण आता याची पहिली झलक हिना खानने शेअर केली आहे. हिना खान, सिद्धार्थ शुक्ला, गोहर खान या एक्स कंटेस्टंटना घेऊन हा प्रोमो तयार करण्यात आला आहे. हिना खानने हा व्हिडिओ शेअर करत बिग बॉस 14 चा हा नवा सीझन आधीच्या सगळ्या सीझनच्या तुलनेत फारच कठीण असणार असे दिसत आहे.

आमिर अलीपासून वेगळं झाल्यानंतर संजीदा झाली आहे जास्तच 'बोल्ड'

हिना खानने सांगितला हा नवा प्रवास असणार कसा

 हिना खानने हा नवा प्रोमो शेअर करत नव्या सीझनबद्दल थोडी हिंट दिली आहे. बिग बॉसची थीम नेहमीच वेगळी आणि खास असते.  पण कोरोनाचे दिवस असताना कोरोनाची काळजी घेऊन हा रिअॅलिटी शो सुरु होणार आहे. म्हटल्यावर याची थीम काय असणार याची उत्सुकता अनेकांना आहे. दरम्यान हिना खानने याच सेटवरचा एक व्हिडिओ तिच्या फॅन्ससाठी शेअर केला होता. तिने एक गोल्डन रंगाचा गाऊन घातला आहे. केसांचा हायबन बांधून ती या ड्रेसमध्ये आपली अदा दाखवताना दिसत आहे. तिचा हा नवा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्या सौंदर्याची तारीफ करणाऱ्या कमेंट्सही केल्या आहेत. पण कलर्स टीव्हीने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर हिना खान बिग बॉसच्या प्रोमोसाठी शूट करत असल्याचे सगळ्यांच्याच लक्षात आले.  हिना खानचं नाही तर सीझन 13 विनर सिद्धार्थ शुक्ला हा देखील या आधीच्या प्रोमोमध्ये दिसला आहे. या शिवाय गोहर खाननेही प्रोमोमध्ये आपली उपस्थिती दाखवली आहे. 

कंगनाच्या 'सॉफ्ट पॉर्न' म्हणण्यावर भडकली उर्मिला, दिले सडेतोड उत्तर

हिना खान होती बिग बॉसची स्पर्धक

बिग बॉस हा हिंदीमधील सगळ्यात गाजलेला असा रिअॅलिटी शो आहे. ज्यामध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला आहे. या शोमध्ये हिना खानही स्पर्धक म्हणून येऊन गेली आहे.  बिग बॉसच्या सीझन 11 मध्ये ती स्पर्धक होती. अगदी शेवटपर्यंत तिने यामध्ये लढत दिलेली होती. पण या सीझनची ती विजेती ठरली नाही. तर या सीझनच्या विनरचा मान हा श्वेता शिंदेही मिळाला. पण तरीही हिना खान त्यामुळे अनेकांच्या लक्षात राहिली. 

रियालिटी शो मधून आलेले हे चेहरे आहेत मनोरंजन क्षेत्रात यशस्वी

लवकरच दाखवणार नवे घर

बिग बॉसच्या घराची उत्सुकता आणखी एका कारणासाठी नेहमी असते ती म्हणजे त्याच्या घरामुळे. कारण थीमप्रमाणे या घरामध्ये नेहमी बदल होत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे घरं कसे असेल. आणि घरात जाणाऱ्या स्पर्धकांसोबत कशा पद्धतीचे टास्क खेळले जातील अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे. यातील एका गोष्टीवरुन पडदा उठणार आहे. येत्या शनिवारी बिग बॉसचे नवे घर दाखवण्यात येणार आहे. अशी घोषणा कलर्स टीव्हीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केली आहे. 

हिना खानचे चाहते

राहिला प्रश्न हिना खानचा तर तिच्या या व्हिडिओमुळे तिचे चाहते तिच्यावर चांगलेच फ्लॅट झाल्याचे दिसत आहे. हिनाचा हा ग्लॅमरस अंदाज त्यांना खूप आवडला आहे. टीव्ही मालिकेतील आदर्श सून ते कसौटी जिंदगीमधील व्हिलन असा तिचा पडद्यावरचा प्रवास आतापर्यंत अनेकांना आवडला आहे. शिवाय तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळेही ती नेहमीच चर्चेचा विषय असते. 


दरम्यान, तुम्ही अद्यापही हा प्रोमो पाहिला नसेल तर पाहायला मुळीच विसरु नका.