भारती सिंह लवकरच देणार Good News, आई होण्याची आहे इच्छा

भारती सिंह लवकरच देणार Good News, आई होण्याची आहे इच्छा

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा स्क्रिप्ट रायटर हर्ष लिंबाचिया यांच्या लग्नाला आता 2 वर्ष झाली आहेत. दोघेही आपल्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात खूप आनंदी असल्याचं नेहमीच सांगतात. काही महिन्यांपूर्वी भारती सिंह गरोदर असल्याचं सांगण्यात येत होतं. पण यामध्ये काहीच तथ्य नसल्याचंही भारतीने सांगितलं होतं. पण आता स्वतः भारतीने ही गुड न्यूज आपण लवकरच देणार आहोत असं सांगितलं आहे. भारती आणि हर्षच्या बाबतीत नेहमीच काहीना काहीतरी न्यूज येत असते. हर्ष आणि भारतीचं एकमेकांवर अतोनात प्रेम  आहे हे त्यांनी बऱ्याच ठिकाणी एकत्र असताना आणि अनेक रियालिटी शो मधूनही दाखवून दिलं आहे. हर्ष आणि भारती हे बऱ्याच शो मध्येही एकत्र दिसतात.  

Nach baliye 9 च्या सेटवर मनीष पॉलमुळे रवीना झाली नाराज

भारतीने मुलाखतीमध्ये केलं स्पष्ट

भारती आणि हर्ष सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. पण भारतीने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. एका मुलाखतीमध्ये भारतीने स्पष्ट केलं आहे. भारतीने सांगितलं की, ‘हर्ष आणि मला लवकरच कुटुंबाची सुरूवात करायची आहे. पुढच्या वर्षी अर्थात 2020 पर्यंत आम्हाला बाळ हवं आहे. पण सध्या आम्ही दोघंही आपापल्या कामामध्ये खूपच बिझी आहोत. असं असलं तरीही आम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत घरात बाळ हवं आहे.’ तसंच तिने पुढे असंही सांगितलं की, ‘लोक अनेक तऱ्हेच्या अफवा पसरवत असतात. काहींंनी मला उलटी करताना पाहिलं आणि अफवा पसरवलं की, मी गरोदर आहे. पण त्यावेळी मला गॅस्टिक प्रॉब्लेम होता. त्यापेक्षा अधिक काहीच नव्हतं. मी ओव्हरवेट आहे, त्यामुळे कधी कधी बघणाऱ्याला असंही वाटतं की, मी गरोदर आहे. पण सध्या  तरी असं काहीच नाही. ’ 

बॉलीवूडपासून दुरावलेल्या मल्लिका शेरावतचा ‘फिटनेस फंडा’

गरोदर असल्याची न्यूज मी स्वतः देईन - भारती सिंह

भारतीने पुढे आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘जेव्हा मी गरोदर असेन तेव्हा मी स्वतः सांगेन. आई होण्याचा काळ हा अत्यंत सुंदर असतो. जो काळ मला स्वतःला एन्जॉय करायचा आहे. मी गरोदर असताना अगदी नवव्या महिन्यापर्यंत मला काम करायचं आहे आणि मी हर्षलादेखील हे सांगितलं आहे.’ भारतीचा नवरा हर्ष लेखक असून तोदेखील सध्या व्यस्त आहे. हर्ष नेहमीच भारतीला सगळ्या कामांमध्ये पाठिंंबा देतो आणि तिच्या प्रत्येक कामात तिच्या पाठिशी उभा राहातो. भारतीला अनेक गोष्टीत त्याने सांभाळलं असल्याचं भारतीनेही वेळोवेळी सांगितलं आहे. मागच्या वर्षी भारती आणि हर्षने ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होऊन खूप धमाल केली होती. दरम्यान भारती आणि हर्ष सध्या ‘खतरा खतरा खतरा’ या शो मध्ये धमाल करताना दिसतात. तर भारती ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये देखील कपिलच्या आत्याची भूमिका करून मनोरंजन करताना दिसत आहे. भारतीची ही ‘कप्पू की बुवा’ खूपच प्रसिद्ध होते आहे. भारती आपल्या हास्याच्या फवाऱ्यांनी प्रेक्षकांना अगदी खदखदून हसवत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही तिच्या आयुष्यात लवकरच ही गुड न्यूज यावी असं वाटत आहे. तिचे चाहतेही या न्यूजची वाट पाहात असून तिच्यासाठी नक्कीच आनंदी आहेत.

आता भारती सिंह बनणार कपिल शर्माची 'कम्मो बुवा' पाहा तिचा नवा लुक