ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अटकेत असलेल्या राज कुंद्रावर सेलिब्रिटींच्या उमटत आहेत प्रतिक्रिया

अटकेत असलेल्या राज कुंद्रावर सेलिब्रिटींच्या उमटत आहेत प्रतिक्रिया

पॉर्न फिल्म बनवत असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा आता सर्वस्तरावर ट्रोल होऊ लागला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला पुराव्यानिशी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सबळ पुराव्याखाली अटकेत असलेल्या राज कुंदावर आता सर्वस्तरावरुन टिका होऊ लागली आहे. खूप जणांना राज कुंद्राला सोशल मीडियावर बॉयकॉट करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने देखील राज कुंद्रावर निशाणा साधत अशा प्रवृत्तींना आधीच दाबा अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे

सुप्रिया पिळगांवकर रिअल आणि रील लाईफमध्ये अशी आहे ‘आई’

या आधीही उठवला होता आवाज

राजू श्रीवास्तव याने आपले मत मांडताना म्हटले आहे की, आपल्याकडे वेबसीरिज हे असे माध्यम झाले आहे. जिथे सेक्स आणि अश्लील गोष्टी अगदी उघड उघड दाखवल्या जात आहेत. यावर या आधीही राजू श्रीवास्तव याने विरोध केला होता. यासोबतच भोजपुरी चित्रपटातही अशाच पद्धतीने नको त्या गोष्टी दाखवल्या जातात. मनोरंजनाचे माध्यम अशाप्रकारे खराब करु पाहणाऱ्या या लोकांवर आपण सोशल बॉयकॉट करणे फारच गरजेचे आहे. असे केले तरच या लोकांना त्यांच्या चुका कळतील. त्यातच आता उद्योगपती आणि शिल्पा शेट्टी कुंद्राचा नवरा राज कुंद्रा याचे असे कृत्य समोर आल्यामुळे अशा लोकांनी आपला धर्म आणि इमान विकायला काढला आहे. देशाची सभ्यता आणि संस्कृती यांच्याशी त्याच काहीही घेणं नाही. अशा लोकांबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही.

मालिकांमध्ये नायिकांना सक्षम दाखविण्यासाठी नायकांना बाहेरख्याली दाखविण्याची काय गरज

ADVERTISEMENT

आता बॉलिवूडकरांनी एकत्र येऊन बॉयकॉट करावे

याशिवाय राजू श्रीवास्तव याने पुढे जाऊन लोकांनी अशा लोकांना खऱ्या अर्थाने बॉयकॉट करायला हवे. कारण अशी लोकं मोठी असल्यामुळे सगळे बॉलिवूड यांच्या पाठिशी उभे राहते. अशा प्रकरणावर ही लोकं शांत बसतात. आता लोकांनी एकत्र येऊन आताच अशा व्यक्तिंवर बहिष्कार टाकायला हवा, असे मत राजू श्रीवास्तव यांनी मांडले आहे.

घाबरण्यासाठी व्हा सज्ज, येतेय गूढ मालिका

नेमकं प्रकरण काय?

मुंबई पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी राज कुंद्राला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.मंगळवारी पोलिसांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. त्यांनी हे रॅकेट कसे उघडकीस आणले हे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तक्रारदार महिलेने सांगितले की, चित्रपटात काम करणाऱ्या महिलांना वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्मध्ये काम मिळवून देतो या बहाण्याने ऑडिशनला बोलावले जात होते. तिथे आल्यानंतर त्यांना बोल्ड सीन्स करावे लागतील असे सांगून  त्याचे रुपांतर सेमी न्यूड आणि न्यूड सीनमध्ये केले जात होते. काही कलाकारांनी असे सीन्स देण्यास नकार दिला आणि ही तक्रार त्यांनी पुढे नेली. त्यामुळेच मुंबईच्या मढ परीसरात सुुरु असलेल्या या ऑडिशनच्या ठिकाणावर पोलिसांनी फेब्रुवारी छापा घातला. त्यावेळी हे सगळे प्रकरण समोर आले.

मिळाले राज कुंद्राचे चॅट

राज कुंद्रा याने त्याच्या सीएसोबत केेलेले चॅट हे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. या चॅटमध्ये त्यांनी अॅडल्ट कंटेटविषयी पीएशी संवाद साधला आहे. यामध्ये त्याने प्लॅन बीची तयारी केल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याती शक्यता नाकारता येत नाही. 

ADVERTISEMENT

आता या प्रकरणात अनेकांनी आपला आवाजही उठवला आहे. 

20 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT