कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अडकले लग्नाच्या बेडीत

कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले अडकले लग्नाच्या बेडीत

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कॉमेडिअन सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) तिच्या अप्रतिम अभिनय, विनोदबुद्धी, गायनासाठी प्रसिद्ध आहे. सुगंधा देखील नेहमीच तिच्या निखळ मनोरंजनाने सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करत असते. आता मात्र सुगंधाचं स्वतःचं आयुष्यदेखील आनंदाने भरून गेलं आहे. कारण नुकतंच तिने डॉक्टर संकेत भोसले (Dr.Sanket Bhosale) सोबत सहजीवनाची वाटचाल सुरू केली आहे. डॉ. संकेत भोसलेदेखील एक प्रसिद्ध विनोदवीर आणि मिमिक्री कलाकार आहे. त्याची स्पेशलिटी सलमान खान आणि संजय दत्तची नक्कल करणं आहे. काही दिवसांपूर्वीच सुगंधाने संकेतसोबत असलेले नातं चाहत्यांसमोर जाहीर केलं होतं. २६ एप्रिलला पंजाबमधील जालंदरमध्ये दोघांचा लग्नसोहळादेखील सुखरूप पार पडला आहे. मुंबईत लॉकडाऊन असल्यामुळे सुगंधा आणि संकेत यांनी पंजाबमध्ये केवळ कुटुंबियांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न केलं.

सुगंधाच्या लग्नाचे काही खास क्षण

सुंगधाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही काळापू्र्वी तिच्या लग्नाचे काही खास क्षण पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबत सुगंधाने शेअर केलं आहे की, आणि यासोबतच... डॉ. संकेत "तुझं आयुष्य, माझे नियम" या पोस्टमध्ये तिने डॉ. संकेत भोसलेला टॅग करत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. 

लग्नसोहळ्यातील सुंगधा आणि संकेत यांचा वेडिंग अटाअर खूपच सुंदर आहे. सुगंधाने लग्नात गोल्डन कलरचा लेंगा परिधान केला असून त्यावर पारंपरिक गुलाबी रंगाची ओढणी डोक्यावर घेतली आहे. तर तिचे पती संकेत यांनी लाइट ग्रीन रंगाची शेरवानी आणि क्रीम रंगाची पगडी परिधान केलेली आहे. सुगंधाने शेअर केलेले फोटो जयमाला विधीचे अशून त्यात सुंगधा गळ्यात वरमाला घालून घेत असताना खूपच सुंदर आणि मनापासून आनंदी दिसत आहे. सुंगधाच्या या वेडिंग फोटोजवर चाहते आणि सेलिब्रेटीज यांनी लाईक्स आणि शुभेच्छाचा पाऊस पाडला आहे. सुगंधाला लग्नासाठी श्रुती पाठक, गौहर खान, नेहा कक्कड, हर्षदिप कौर, रिद्धीमा पंडीत अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वीच सुंगधाने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत ती लग्न करत असल्याचं जाहीर केलं होतं. साखरपुड्यासाठी सुंगधाने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा आऊटफिट परिधान केला होता.संकेत यांनी देखील पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. 

साखरपुड्यानंतर सुंगधाच्या मेंदीच्या सेरेमनीचे फोटोही व्हायरल झाले होते. ज्यात तिने हातावरी मेंदी फ्लॉंट करत काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. मेंदी सेरेमनीसाठी सुगंधाने हिरव्या रंगाचे आऊटफिट घातले होते. ग्रीन आऊटफिट आणि हेव्ही ज्वैलरीमध्ये सुगंधाचे रूप नक्कीच खुलून आलं होतं. 

असा पार पडला लग्न सोहळा

अनेक दिवसांपासून सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. याआधी त्या दोघांनी असं कधीच जाहीर केलं नव्हतं. मात्र ते दोघं २०२० मध्ये लग्नाच्य बंधनात अडकणार असं सर्वांना वाटत होत. मागच्या वर्षी देशभरात कडक लॉकडाऊन झाल्यामुळे हा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला होता. यावर्षी मुंबईत लॉकडाऊन असल्यामुळे सुगंधा आणि संकेत यांनी कमी लोकांच्या उपस्थितीत पंजाबमध्ये लग्न केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुंगधा आणि संकेत याचं लग्न तीन राज्यांतील विधींनुसार पार पडलं आहे. एकाच दिवशी २४ तासात सर्व विधी उरकण्यात आले. सकाळी पारंपरिक पद्धतीने साखरपुडा करण्यात आला, संध्यांकाळी वरातीचे स्वागत आणि  इतर विधी पार पडले, रात्री तीन वाजता या दोघांनी लग्नाचे सात फेरे घेतले आणि सप्तपदी पार पडली. संकेत भोसले हे मराठी असल्यामुळे लग्नातील काही विधी महाराष्ट्रीय पद्धतीने करण्यात आले तर काही विधी पंजाबी पद्धतीचे होते. सुंगधा आणि संकेत यांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत ऑनलाईन पद्धतीने लग्नाची खरेदी केली होती. लग्नाची तयारी मागच्या वर्षी डिसेंबर पासूनच करण्यात आली होती. लग्नासाठी घरातील वीस लोक उपस्थिक होते.