Good news: कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा

Good news: कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा

2017-18 हे वर्ष सेलिब्रिटींसाठी खास होतं कारण अनेकांनी या काळात शुभमंगल सावधान केलं. पण आता 2019 मध्ये याच Newly married कपलकडून  लोकांनी Good newsची अपेक्षा सुरु केली आहे. या गूड न्युजमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे कॉमेडी क्वीन भारती सिंहचं. हाती आलेल्या माहितीनुसार भारती सिंह ही गरोदर असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे. भारती आणि हर्षच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार असल्याचे म्हटले जात आहे. पण प्रत्यक्ष भारतीने या बाबत मात्र जे काही सांगितले आहे. ते वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही.


सविता भाभीला टक्कर देऊ शकेल का ही कविता भाभी


 कधी आले प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण


bharti singh fi


सध्या भारती सिंह ‘खतरा खतरा खतरा’ या शोचे होस्टिंग डार्लिंग हब्बी हर्ष लिंबाचियासोबत करत आहे. शनिवारी शूट सुरु असताना तिची अचानक तब्येत खालावली. तिची तब्येत इतकी खालावली की, तिला लागलीच शूटवरुन घरी जावे लागले. तिचे अचानक आजारी पडणे हे तिच्या गरोदर असण्याचे लक्षण समजून अनेकांनी सेटवर अफवा पसरवायला सुरुवात केली. त्यामुळेच हर्ष आणि भारतीच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्यावर सगळ्यांनी मोहोर लावली.


प्रियांका चोप्राच्या भावाचे लग्न पुन्हा फिस्कटले?


पण भारती नेमंक काय म्हणाली?


bharti singh 1


भारतीचा सेन्स ऑफ ह्युमर काय तो अनेकांनी आतापर्यंत पाहिला आहे. सेटवरून परतलेल्या भारतीला जेव्हा आपल्या प्रेग्नंसीच्या बातमीचे कळले. तेव्हा तिने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत  जे सांगितले ते ऐकून तुम्हाला हसूच कोसळेल….भारती म्हणाली की, मी खूप जाडी आहे. त्यामुळे लोकांना असे वाटणे साहजिक आहे. हर्ष आणि मला बाळ हवे आहे. पण सध्या आम्ही कामामध्ये इतके व्यग्र आहोत की, बाळाचा विचार करायला सध्या तरी आम्हाला वेळ नाही. तिने तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीवरुन पडदा उठवला असला तरी त्या दिवशी सेटवरुन तू घरी का परतली हे विचारल्यानंतर ती म्हणाली की, मला खरचं गॅसेसचा त्रास होत होता म्हणून मी परतले यात प्रेग्नंसीचा प्रश्नच नाही.


लवकरच कळणार बाळाचा विचार


bharti singh 1 %281%29


प्रेग्नंसीच्या अफवांवरुन तिने पडदा उठवला असला तरी हर्ष आणि भारती लवकरच बाळाचा विचार करणार आहे. नोव्हेंबरनंतर आम्ही बाळासाठी प्रयत्न करुन असे म्हणत तिने सध्या तरी Good news ला फुलस्टॉप दिला आहे. त्यामुळे आता तिच्या प्रेग्नंसीबाबतच्या सगळ्या शंका दूर झाल्या आहेत. या अफवांना भारतीने दिलेले उत्तरही तितकेच खास होते असे म्हणायला हवे.


झाशीच्या राणीला काढून पद्मावतीला मिळाली अनुरागच्या चित्रपटात संधी


भारतीची लव्हस्टोरीही होती खास


हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांची लव्हस्टोरी अगदीच खास होती. भारती करत असलेल्या कॉमेडी रिअॅलिटी शोचा हर्ष हा लेखक होता. या सेटवर हर्ष भारतीच्या प्रेमात पडला. त्याने थेट भारतीला विचारले. पण कॉमेडी क्विन भारती म्हणजे काय सोपी गोष्ट वाटते का? तिने होकार दिल्यानंतरही ही त्यांची प्रेमकहाणी अनेक दिवस पडद्याआड होती. त्यांच्या लग्नाच्या बातमीने एकदम खळबळ माजवली. तिचा लग्नसोहळाही तितकाच वेगळा होता. तिच्या लग्नातल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तिने तिच्या कॉमेडीतून वेगळेपणा साधला होता.