लवकरच येतोय ‘बिग बॉस मराठी 'सीझन 2

लवकरच येतोय ‘बिग बॉस मराठी 'सीझन 2

टीव्हीवरील सर्वात कॉन्ट्रव्हर्शिअल रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी’(Big Boss Marathi) पुन्हा एकदा परत येत आहे. हिंदीतील बिग बॉसच्या पार्श्वभूमीवर मराठीत बिग बॉसला कितपत प्रतिसाद मिळेल, अशी शंका होती. पण या सर्व शंका-कुशंकाना छेद देत पहिल्या सीझनला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता येत आहे ‘बिग बॉस मराठी सिझन 2 (Big Boss Marathi 2)’. उलट अजून पहिल्या सीझनमधील कॉन्ट्रोव्हर्सीजची चर्चा सूरू असताना आता प्रेक्षकांना लगेच दुसरा सीझन पाहायला मिळणार आहे. या सीझनमध्येही प्रेक्षकांना मिळणार आहेत भरपूर सरप्राईजेस. नवीन कंटेस्ट्स, नवीन थीम आणि एवढंच नाहीतर सुत्रानुसार, यंदा बिग बॉस मराठीचं लोकेशनही नवीन असणार आहे.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

तो परत येतोय... #BiggBossMarathi #BBMarathi #ColorsMarathi


A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on
आता लोणावळा नाही मुंबईहिंदी बिग बॉसप्रमाणे मराठी बिग बॉसचा पहिला सीझन ही लोणावळामध्ये शूट करण्यात आला होता. पण सूत्रानुसार, यंदाचा सीझन मुंबईत शूट होणार आहे. तेही मुंबईतल्या गोरेगाव फिल्मसिटी (Goregaon Filmcity)मध्ये. या आधी मल्याळममधील बिग बॉसचं शूटींग गोरेगाव फिल्मसिटीमध्ये करण्यात आलं होतं. कदाचित त्यामुळेच बिग बॉस मराठी 2 ही मुंबईत शूट करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं कळतंय. तसंच मराठी बिग बॉसच्या सेटच कामही सुरू असल्याची चर्चा आहे.पुन्हा बिग बॉस होस्ट महेश मांजरेकरच


38191578 1745431045569953 6093754394757562368 n


पहिल्या सीझनला होस्ट केलं होतं मराठी निर्माता- दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी. बिग बॉस मराठीच्या सीझन 2 चं होस्टींगही तेच करणार असल्याचं कळतंय.बिग बॉस मराठी सीझन 2 ची तारीख


मागच्या वर्षी बिग बॉस मराठीचा पहिला सीझन 15 एप्रिलला ऑन एअर झाला होता. सूत्रानुसार, यंदाही हा शो एप्रिल 14 किंवा एप्रिल 21 ला ऑन एअर होण्याची शक्यता आहे. पण निवडणूकीच्या धामधुमीमुळे अजून शो ची लाँच तारीख फायनल झालेली नाही.बिग बॉस मराठी सीझन 2 च्या कंटेस्टबद्दल उत्सुकता


सूत्रानुसार, ‘बिग बॉस सीझन 2’ साठी सेलेब्सना विचारणा करण्यात आल्याचं कळतंय.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Caption this one for me please.. 🙏🏻


A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on
'बिग बॉस मराठी सीझन 2' मध्ये भाग घेण्यासाठी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) मधील आधीची शनाया उर्फ रसिका सुनील हिला विचारण्यात आलं होतं. तसंच तांबडे बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिलिंद शिंदे आणि नेहा गद्रे हीलासुद्धा विचारण्यात आलं होतं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Beauty Attracts The Eyes But Personality Captures The SOUL💝 Veenie.J🧡🧡


A post shared by Veena Jagtap ( veenie ) :) (@veenie.j) on
एवढंच नाहीतर 'राधा प्रेम रंगी रंगली' या सीरियलमधील काही प्रमुख चेहरेही म्हणजेच वीणा जगतापसुद्धा 'बिग बॉस मराठी सीझन 2' मध्ये झळकण्याची शक्यता आहे. चर्चा आहे की, ही सीरियल लवकरच ऑफ एअर होणार आहे.


आता पाहूया 'बिग बॉस मराठी सीझन 2' मध्ये कोणते चेहरे दिसणार ते.