सामान्य माणसाला पॉवर देणार ‘डोंबिवली रिटर्न्स’

सामान्य माणसाला पॉवर देणार ‘डोंबिवली रिटर्न्स’

मध्यमवर्गीयांना रेल्वेचा प्रवास किती महत्वाचा हे सांगायला नको. सकाळी उठून सगळं आवरुन रोजची ट्रेन पकडण्याची धडपड अनेकांची असते. मध्यमवर्गीयांची हीच व्यथा मांडण्याचा प्रयत्न डोंबिवली फास्टमध्ये करण्यात आला होता. आता  तब्बल १४ वर्षांनी ‘डोबिंवली रिटर्न्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काहीच तासांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या नव्या ट्रेलरमधील डोंबिवलीचा हा प्रवास पूर्णत:बदलला आहे. नवी व्यवधाने आता सिनेमातील नायकापुढे उभी राहिलेली आहेत. त्यामुळे हा नवा बदल, नवा प्रवास हा नक्कीच डोक्याला ताण आणणारा असणार आहे.


अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन 


कसा आहे ट्रेलर?


जर तुम्ही डोंबिवली रिटर्न्स हा चित्रपट पाहिला असेल तर पहिला बदल तुम्हाला दिसेल तो म्हणजे ट्रेन.गेल्या दहा वर्षात ट्रेनमध्ये अनेक बदल झाले. पूर्वी लाकडाच्या सीट होत्या आणि त्यांची जागा प्लास्टिकच्या सीटने घेतली. हा बदल साधा वाटत असला तरी तो फार मोठा आहे. मुंबई वाढली. मुंबईतली गर्दी वाढली. पण प्रवास काही संपला नाही, असेच ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ट्रेन पकडण्याची ती धडपड अजूनही संपलेली नाही. पण आता यात वेगळे ट्विस्ट आहेत. कारण पुन्हा एकदा सामान्य माणसासाठी वेलणकर लढणार आहे. पण डोंबिवली फास्ट हा सिक्वल नाही. तर ही कथा वेगळ्या पद्धतीने गुंफण्यात आलेली आहे.

Subscribe to POPxoTV

भाई चित्रपटासाठी घेण्यात आली ही विशेष मेहनत


पहिल्या भागाशी तुलना


डोंबिवली रिर्टन्सची तुलनाही डोबिंवली फास्टशी साहजिकच केली जात आहे. कारण त्या सिनेमाने एक वेगळा आशयघन लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्या तुलनेत ही कथा वेगळी असल्याचे दिसत आहे. पहिल्या भागात संदीप कुळकर्णी, शिल्पा तुळसकर, संदेश जाधव होते. तर डोंबिवली रिर्टन्समध्ये संदीप वगळता सगळी स्टारकास्ट वेगळी आहे. पुजा कासेकर, ऋषिकेश जोशी, सुनिल जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे. ट्रेलरमध्ये सध्या फारश्या गोष्टींचा उलगडा होत नसला तरी हा लढा सिस्टीम विरोधातील आहे हे स्पष्ट होते.आता हा लढा व्यापक झाला आहे हे मात्र नक्की. पण पहिल्या भागाशी तुलना केल्यामुळे अनेकांनी या ट्रेलरविषयी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्रेलर वगळता आता चित्रपटात नक्की काय असेल अशी उत्सुकता लोकांना आहे.


पुन्हा सुरु होणार हम पांच 


१४ वर्षांची प्रतिक्षा


डोंबिवली फास्ट या चित्रपटाने माधव आपटे या सामान्य माणसाची व्यथा मांडली होती. आजूबाजूला चालणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराला  कंटाळतो आणि सगळ्या गोष्टी नीट करण्यासाठी एकटाच लढत सुटतो. आता एक नवा प्रवास दाखवण्यात आला आहे.सिस्टीमशी लढा देण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्या भागात फोल ठरत असेल.पण या नव्या भागात तो काॅमन मॅनला अधिकार देण्याचा प्रयत्नात आहेत. काळानुरुप गरजा आणि अडचणीदेखील बदलल्या आहेत.  या नव्या प्रवासासाठी तब्बल  १४ वर्षांची वाट पाहावी लागली.  हा नवा चित्रपट २२ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. आता 'डोंबिवली रिटर्न्स' लोकांना किती पटतो हे पाहावे लागणार आहे. 


( फोटो सौजन्य-Instagram)