Womens Day Special : तिच्या योगदानाचा होणार सन्मान…

Womens Day Special : तिच्या योगदानाचा होणार सन्मान…

मुंबईच काय तर जगभरात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. याच दिनाच्या निमित्ताने द गोदरेज इंडिया कल्चर लॅबनेही एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘वुमन इन स्टेम’. हा कार्यक्रम येत्या शनिवारी म्हणजेच 7 मार्च 2020 रोजी होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या रूढी-परंपरांमुळे (स्टिरिओटाइप) स्टेम म्हणजेच सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग आणि मॅथेमॅटिक्स या क्षेत्रातील स्त्रियांना कायम डावललं जातं. विज्ञान आणि त्याच्याशी संबंधित व शाखांमधील या स्त्रियांचे योगदान मोठे असले, तरी आजपर्यंत त्यांच्या कष्टाला किंमत देण्यात आलेली नाही. स्टिरिओटाइप्स समाजामुळे स्टेम क्षेत्रातील स्त्रियांचे स्थान कायम दुय्यम राहिले आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

गोदरेज इंडिया कल्चर लॅबने म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने विज्ञान शाखेत स्त्रियांनी मिळवलेलं यश, त्यांचे एकत्रित प्रयत्न, शक्यता आणि भारतात विज्ञान शाखेत काम करण्याचे परिणाम याविषयी संवाद साधण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. स्त्रियांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम कला, फिल्म, सादरीकरण आणि संवादाच्या माध्यमातून उलगडत जाईल. आपण माहिती करून घेतली पाहिजे, अशा या भारतीय स्त्रिया कोण आहेत? त्यांच्यासमोर असलेले वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आणि लिंगभेद असलेल्या क्षेत्रात त्यांनी कशाप्रकारे वाट काढली? या क्षेत्रातील वैविध्यपूर्णतेला कसा वाव देता येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली जातील.

या कार्यक्रमात पुढीलप्रमाणे फिल्म्स, सादरीकरण, वाचन, कला प्रदर्शन, चर्चा सत्र आणि प्रेझेंटेशन्सचा समावेश असेल. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2020 रोजी हा कार्यक्रम स्टेममधील स्त्रियांचे एकत्रित मानवी प्रवासाच्या प्रगतीमधे महत्त्वाचे योगदान देणाऱ्या स्त्रियांचा सन्मान करेल. हा कार्यक्रम आणि उपक्रम नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे -

मॅपिंग द टेरेने – इंडियन वुमन इन स्टेन – सकाळी 11 वाजता – लाइफ ऑफ सायन्सच्या संस्थापक नंदिता जयराज आणि अशिमा डोग्रा यांच्यातर्फे स्टेममधील भारतीय स्त्रियांविषयी मास्टरक्लास

प्लेझर्स, पेरिल्स अँड पॉसिबिलिटीज ऑफ स्टेम – दुपारी 1 वाजता – विज्ञान शाखेतील स्त्रियांचे योगदान आणि वास्तव यांविषयी नामांकित स्त्रियांमध्ये चर्चासत्र. या चर्चासत्रात सहभागी होतील अमृता महाले, गीता वेंकटरामन, ए. मणी, राम्या कन्नाबिरान आणि अपर्णा हेगडे. गीता चढ्ढा यांच्यातर्फे सूत्रसंचालन केलं जाईल.

स्टेम x आर्ट – दुपारी 2.30 वाजता – वेगवेगळ्या शाखांचे कलाकार स्टेममधील घटकांचा कलेच्या एकत्रीकरणातून मिलाफ साधतील. त्यानंतर प्रदर्शक आणि कलाकारांसोबत प्रश्नोत्तराचे सत्र रंगेल. यामध्ये दोन सादरीकरण पाहायला मिळणार असून त्यात विद्या शहा यांचे सांगीतिक सादरीकरण आणि बीज फाउंडेशनच्या संजुक्ता वाघ यांच्या नेतृत्वाखालील नृत्य सादरीकरणाचा समावेश असेल.

स्थळ – सभागृह (पहिला मजला), गोदरेज वन, विक्रोळी (पूर्व) (प्रवेश पूर्व द्रुतगती महामार्गावरून)

या कार्यक्रमाला तुम्हीही जाऊ शकता. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.

आरएसव्हीपी: indiaculturelab@godrejinds.com

भेट द्या: https://indiaculturelab.org/events/special-events/mission-possible-women-in-stem/

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.