ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
नेटफ्लिक्सला कोरोनाचा  या कारणामुळे बसतोय फटका

नेटफ्लिक्सला कोरोनाचा या कारणामुळे बसतोय फटका

कोरोना ज्या दिवसापासून देशात आला आहे. त्या दिवसापासून सगळेच घरी आहेत. आता जवळजवळ वर्ष झाले आहे की, लोक घरी बसून आहेत. स्वत:साठीच फारच वेळ मिळाल्यामुळे अनेकांनी मनोरंजनासाठी वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची निवड केली आणि घरी बसून आपले मनोरंजन करुन घेतले आहे. सध्या हे सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म अनेकांचा आधार आहे. सीरिज आणि चित्रपट म्हटले की, नेटफ्लिक्सचे नाव आवर्जून घेतले जाते. नेटफ्लिक्सने नव नवे सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित करुन चांगलाच फायदा मिळवला. पण तुम्हाला माहीत आहे का की, कोरोनाचा फटका नेटफ्लिक्सलाही चांगलाच बसला आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी मनोरंजन

2020 हे वर्ष  सगळ्यांनी घरीच बसून काढावे यासाठी नेटफ्लिक्सने प्रेक्षकांसाठी सीरिज आणि चित्रपट एकामागोमाग एक रिलीज केले. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत सगळ्याच क्षेत्रातील सीरिज आणि चित्रपट रिलीज करण्यात आले होते. गेल्यावर्षी ही संख्या खूप होती. पण 2021मध्ये ही संख्या पूर्णत: घटली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये 12 टक्क्यांची घट झाली आहे. ही घट नोंद घेण्यासारखी आहे. मनोरंजनाचे एकमेव उत्तम आणि चांगले साधन असताना अशापद्धतीने घट होणे हे मनोरंजन क्षेत्रासाठी मुळीच चांगले नाही, असे देखील दिसून आले आहे. पण यामागेही कंपनीकडून काही कारणं सांगण्यात आली आहे. 

ही अभिनेत्री प्रेग्नंसीमध्येही ठेवतेय स्वत:ला फिट

नव्या निर्बंधामुळे होतेय नुकसान

2021 हे वर्ष बऱ्यापैकी चांगले सुरु झाले होते. शूटिंग हे योग्य काळजी घेऊन सुरु झाले होते. पण देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या केसेसमुळे अनेक प्रोजेक्ट हे खोळंबून राहिले आहेत. परदेशात तसेच देशात शूट करण्यास फारच मज्जाव करण्यात आाल्यामुळे अनेक प्रॉजेक्ट हे अर्धवट राहिले आहेत. अर्थात त्यामुळेच हे प्रॉजेक्ट पूर्ण होऊ शकलेले नाहीत. या कारणामुळे देखील नव्या गोष्टी या प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येत नसल्याचे देखील नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आले नाही. ही परिस्थिती कधी नियंत्रणात येईल याबद्दल अअद्याप कोणालाही काहीच माहिती नसल्यामुळे सध्या तरी ही परिस्थिती कधी निवळेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे नेटफ्लिक्सची परिस्थिती कधी सुधारेल याबद्दल काहीच माहिती सध्या देता येणार नाही, हे देखील सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

सोनाली कुलकर्णी नव्या भूमिकेत, ‘क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे करणार निवेदन

जुने चित्रपट आणि सीरिज

नेटफ्लिक्सवर फार काही नवीन रिलीज होत नसले तरी देखील काही जुने चित्रपट डब करुन या रिलीज केले जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही वेगळे काही पाहायचे असेल तर नेटफ्लिक्सवर तुम्हाला हे पाहता येईल. येत्या वीकेंडला लॉकडाऊन केला जाणार आहे. या दिवशी तुम्हाला तुमचा वेळ चांगला घालवायचा असेल तर तुम्ही काही जुने चित्रपट आणि सीरिज पाहू शकता. ज्यामुळे तुमचे मनोरंजन होईल.

लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि पावभाजीवर अमृता-पुष्करने मारला ताव

नेटफ्लिक्सचे वाढले युजर्स

नेटफ्लिक्सवर फार काही नवे रिलीज झाले नसले तरी नेटफ्लिक्सने देखील चांगलीच कमाई केली आहे. गेल्यावर्षी त्यांचे अनेक सबस्करायबर्स वाढले होते. त्यांना त्यामुळे चांगलीच कमाई करता आली होती आणि अजूनही अनेक जण नेटफ्लिक्सची जोडले जात आहे. 

ADVERTISEMENT

कोरोनाची परिस्थिती पाहता आता या क्षेत्राला अजून किती फटका बसेल याची चिंता अनेकांना सतावत आहे. 

06 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT