कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी आता सरकारने अनेक ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करायला सुरुवात केली आहे. पुढील काही दिवस लोकांनी घराबाहेर पडू नये असे सांगितले जात आहे. पण असे असतानाही काही ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित केले आणि लोकांना एकत्र केले. सरकारने सगळ्या गोष्टींवर निर्बंध लादूनही तब्लिगी जमातीच्या लोकांनी दिल्लीमध्ये मरकजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. कोरोना संक्रमणाचा धोका वाढला असताना असे बेजबाबदारपणे वागणे योग्य नसल्याचे नुसरत जहाँ म्हणाली असून तिने काही रोख ठोक विधान केली आहेत.
हा खरा सिंघम… अजय देवगणची पडद्यामागील कामगारांना मोठी मदत
काय म्हणाली नुसरत जहाँ
मरकज येथे झालेल्या या कार्यक्रमांमध्ये 1800 हून अधिक लोक सहभागी झाली होती. इतक्या मोठ्या संख्येने लोकं एकत्र येणे हे बेजबाबदारपणाचे असल्याचे नुसरत म्हणाली. तिने या संदर्भात प्रतिक्रिया देत म्हटले की, तुम्ही कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असाल तुम्हाला आता गरज आहे ते जबाबदारपणे वागण्याची देशात कोरोना सारख्या व्हायरसचा शिरकाव झाला असताना असे वागणे अजिबात चांगले नाही. मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की, सगळ्यांनी यावेळी जात,धर्म याचे राजकारण न करता एकत्र येण्याची गरज आहे. आणि मुळात घरी राहण्याची गरज आहे. सध्याचा काळ हा जातिवाद, धर्मवाद यावरुन भांडण करण्याचा नाही. त्यामुळे यासंदर्भातील अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका. अेस ती म्हणाली.
करण जोहरच्या मुलाने केली बोलती बंद, कोरोनाच्या काळात व्हिडिओ व्हायरल
अनेकांनी या बेजबाबदार वागण्यावर केली टीका
तब्लिगी जमातीतील काही लोक कोरोना बाधित आहेत. लॉकडाऊनचे कोणतेही नियम न पाळता ते बाहेर काही लोकांमध्येही मिसळले त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांना अटक केली जात आहे. पण यामध्ये धर्माचे राजकारण केले जात आहे. अनेक ठिकाणी नियमांना न पाळण्याची मक्तेदारी दिसून आली आहे.
अमृता खानविलकरचा ‘चोरीचा मामला’
भारतातील मस्जिद का होऊ शकत नाहीत बंद- जावेद अख्तर
जगावर इतकं मोठं संकट असताना काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी देखील या वागण्यावर टीका केली. जावेद अख्तर यांनी या संदर्भात एक ट्विट देखील केले आहे. त्यांनी यामध्ये अल्प संख्याक आयोगाच्या अध्यक्षांना प्रश्न केला आहे ते म्हणाले की, इतर सगळ्या देशांनी मस्जिदी बंद केल्या. आपल्या येथे ही सगळी प्रार्थना स्थळ बंद करण्याचा फतवा काढण्यात आला. पण अजूनही या मस्जिदी बंद का होत नाही. आपण आपल्या धार्मिक भावनांना समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याच्या घडीला काळजी घेणे फार गरजेचे आहे असे ते म्हणाले आहे.
नेमका कधी झाला कार्यक्रम?
दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन परीसरात हा तब्लिगी जमात राहात असून मरकजमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी 1830 लोकांमध्ये 281 परदेशी नागरिक असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी मार्च महिन्याच्या दरम्यान एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 1 मार्चपासून ते 15 मार्चपर्यंत हा जलसा सुरु होता. यामध्ये मलेशिया, अफगाणिस्तान, कुवेत, अल्जीरिया, इंडोनेशिया, सौदी अरब आणि किर्गिस्तान या देशामधूनही लोकं आले होते.
एक नक्की की धर्माचे राजकारण करण्याची ही वेळ नाही. जर कोणी अशाप्रकारच्या अफवा पसरत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही अशा बातम्या फॉरवर्डही करु नका.