बॉलीवूडला घेरतोय कोरोना, अनेक कलाकारांना कोरोना

बॉलीवूडला घेरतोय कोरोना, अनेक कलाकारांना कोरोना

कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत घातक ठरत आहे. यामधून बॉलीवूडचे कलाकारही मोठ्या संख्येने आजारी पडत आहेत. याच आठवड्यात अनेक कलाकारांना कोरोना (Covid - 19) झाला असून सर्व कलाकारांनी स्वतःला आयसोलेट (isolate) करून घेतले आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच आमिर खानने आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले. तर लागोपाठ भुलभुलैय्या 2 अभिनेता कार्तिक आर्यनही कोरोना पॉझिटिव्ह आला. नुकताच आर्यन कोरोनामधून बरा झाला आहे. तर आता अक्षयकुमारला कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवरील 45 जणांना कोरोनाची बाधा झाली असून सर्वच जण आयसोलेट झाले आहेत. 

ही अभिनेत्री प्रेग्नंसीमध्येही ठेवतेय स्वत:ला फिट

अक्षयमुळे जॅकलिन आणि नुशरतही आयसोलेशनमध्ये

अक्षय कुमारबरोबर या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा काम करत असून या दोघींनीही स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. त्यामुळे सध्या बॉलीवूड धास्तावलेले आहे. कार्तिक जरी बरा झाला असला तरीही सेटवरील अजून 5 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे चित्रीकरण हे मे अथवा जूनमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे निर्मात्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पण इतकी काळजी घेत असूनही अनेक कलाकारांना या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना होत आहे. तर अनेक ठिकाणी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही याचा फटका बसत आहे. सेटवर घेतलेल्या काळजीनंतरही कोरोना होत असून कलाकारांना स्वतःला आयसोलेशनमध्ये बंदिस्त करून घ्यावे लागत आहे. 

सोनाली कुलकर्णी नव्या भूमिकेत, ‘क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे करणार निवेदन

विकी कौशल आणि कतरिनाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

नुकताच विकी कौशलने इतकी काळजी घेतल्यानंतरही आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले आहे. त्याशिवाय आपण योग्य इलाज करत असून आयसोलेशनमध्ये असल्याचेही त्याने सांगितले आहे. दरम्यान विकीचा रिपोर्ट येऊन एक दिवसही लोटला नव्हता तोपर्यंत कतरिना कैफनेदेखील आपण कोरोनाबाधित असून घरातच स्वतःला आयसोलेट करून घेतले असल्याचे कळवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर आणि आलिया भट दोघांनाही कोरोना झाल्याचे समोर आले होते. रणबीर बरा झाला असून आलिया अजूनही आयसोलेशनमध्ये आहे. तिची आई सोनी राझदानने तिची तब्बेत ठीक असल्याचे सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूला भूमी पेडणेकरनेही आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले आहे. एका बाजूला लोक कोरोनाला न जुमानता घराच्या बाहेर पडत आहेत आणि  काळजी घेत नाहीत असं म्हटलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला इतकी काळजी घेऊनही अनेक कलाकारांना कोरोना होत आहे. त्यामुळे नक्की कोरोनाचं स्वरूप काय आहे आणि नक्की काय काळजी घ्यायला हवी याचा अंदाजच येईनासा झाला आहे. 

बॉलीवूडवर कोरोनाचा विळखा

इतके कलाकार अचानक कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे बॉलीवूडवर एकप्रकारे कोरोनाने विळखा घातला असल्याचे दिसून येत आहे. हे सर्वच कलाकार स्वतःची आणि अगदी इतरांचीही काळजी घेत आहेत. पण तरीही यांना कोरोना झाल्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांमध्येही संभ्रम आहे. इतकी काळजी घेत असूनही कोरोना होत असेल तर मग सामान्य जनतेचं काय? हे असंच चालू राहिलं तर पुढे नक्की काय? व्यवसायावर आणि इतर गोष्टींवरही याचा अत्यंत वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनाचा नेटफ्लिक्सला या कारणामुळे बसतोय फटका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक