कोरोना व्हायरसची झळ बॉलीवूडलाही

कोरोना व्हायरसची झळ बॉलीवूडलाही

कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड-19 संपूर्ण जगात पसरल्याचं चित्र आहे. चीनपासून सुरू झालेली ही व्हायरसची लागण आता दिल्लीतील नोएडापर्यंत पोचली आहे. या व्हायरसचा परिणाम पूर्ण जगात पाहायला मिळत आहे. एकीकडे मोठ्या संख्येत लोकांना हा रोग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे हजारो लोक याने प्रभावित झाल्याचंही समोर येत आहे. या व्हायरसच्या भीतीने आता बॉलीवूडमध्येही कलाकार घाबरले असल्याचं चित्र आहे. अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसमुळे आपल्या विदेश दौऱ्यांचे प्लॅन कॅन्सल केले असून अनेकांनी बाहेरच्या देशातील शूटींग्ज्सही रद्द केली आहेत. पाहूया कोरोना व्हायरसमुळे कोणत्या सेलिब्रिटीजने केले त्यांचे कार्यक्रम रद्द.

Instagram

दीपिका पदुकोण

बॉलीवूडची पद्ममावती दीपिका पदुकोण ही फ्रान्समध्ये होणाऱ्या Louis Vuitton FW2020 मध्ये भाग घेणार होती. पण दीपिकाला जेव्हा कळलं की, कोरोना व्हायरस आता फ्रान्समध्येही पोचला आहे. तेव्हा तिने तिचा हा फ्रान्स दौरा रद्द केला. पण रणवीरला भेटण्यासाठी ती लंडनला रवाना झाल्याचं कळतंय. दीपिकाचा एसिड हल्ल्यावरील चित्रपट छपाक नुकताच येऊन गेला. त्यानंतर आता ती आगामी 83 या चित्रपटात रिअल लाईफ नवरा रणवीर सिंगच्या बायकोच्या भूमिकेत ऑनस्क्रीन दिसणार आहे.

वरूण धवन

बॉलीवूडचा कुली नं 1 वरूण धवन आणि गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच काळापासून येत आहेत. त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग भारताबाहेर थायलंडमध्ये होणार असल्याच्या बातम्या होत्या पण आता सूत्रांकडून कळतंय की, वरूण आणि नताशाने लग्नाचा प्लॅन आणि व्हेन्यू दोन्ही कोरोना व्हायरसमुळे बदलले आहेत.

सनी लिओन

काही दिवसांपूर्वीच सनीचा डेनियल वेबर म्हणजेच नवऱ्यांसोबत चा फोटो व्हायरल झाला होता. दोघांनीही मास्क लावला होता. या फोटोतून सनीने आपल्या फॅन्सना कोरोना व्हायरसबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला होता. तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, मी स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करत आहे.

शोभिता धुलिपाला

'मेड इन हेवन' या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली शोभिता धुलिपाला या अभिनेत्रीच्या आगामी सितारा या चित्रपटावरही कोरोना व्हायरसचा परिणाम पाहायला मिळाला. रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करत असून चित्रपट निर्मात्यांनी सिताराचं केरळातील शूटींग शेड्यूल कॅन्सल केलं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिकेने सांगितलं की, आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे, त्यामुळे आम्ही कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव पाहत शूटींग रद्द केलं आहे.

परिणिती चोप्रा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री परिणिती चोप्रानेही तिचा एअरपोर्टवरचा मास्क लावलेला फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहीलं होतं की, परिस्थिती खरंच गंभीर आहे. त्यामुळे काळजी घ्या. सुरक्षितपणे ट्रॅव्हल करा. 

मग कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची नीट काळजी घ्या. भारतात किंवा इतर कुठेही बाहेर जाण्याचा प्लॅन असल्यास योग्य ती माहिती आणि काळजी घ्या. ट्रॅव्हल सेफ.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.