Corona Virus: अफवांना बळी पडून असे वागत असाल तर वाचा

Corona Virus: अफवांना बळी पडून असे वागत असाल तर वाचा


CoronaVirus अगदी मुंबई, ठाण्यात येऊन पोहोचल्यामुळे अनेकांना टेन्शन आले आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी सगळे जण इतके सज्ज झाले आहेत की सगळीकडे अधिक काळजी घेतली जात आहे. तरीसुद्धा आपल्याकडे अनेक अफवांना उधाण आले आहे. जर तुम्ही CoronaVirus ला घाबरुन नेमकं काय करायला हवं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही ज्या टिप्स तुम्हाला देणार आहोत त्या नीट वाचा म्हणजे तुम्हाला CoronaVirus ची भीती अजिबात वाटणार नाही. उलट तुम्हाला योग्य पद्धतीने काळजी घेण्याची गरज नाही. 

सावधान! कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अशी घ्या काळजी (Corona Virus Easy Care)

कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर नेमकं काय होतं?

shutterstock

इतर कोणत्याही साथीच्या आजारासारखी कोरोना व्हायरसची लक्षणं आहेत. या व्हायरसमध्येही तुम्हाला सर्दी, घसा खवखवणे, कफ, ताप,श्वसनाचा त्रास, न्यूमोनिया, अतिसार,मूत्रपिंड रिकामी होणे अशी काही लक्षणे जाणवतात. आपल्याकडे इतर कोणत्याही आजारांमध्ये अशा प्रकारची लक्षण जाणवतात. या व्यतिरिक्त या आजाराची अजून अशी काही लक्षणे नाहीत. 

या आजाराचा संसर्ग कसा होतो?

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार असून त्याची लक्षणे तुम्हाला लगेच दिसून येत नाहीत. शरीरात कोरोना व्हायरसचा विषाणू गेल्यानंतर त्याची लक्षणे जाणवण्यास थोडा वेळ लागतो. हा आजार तोंडावाटे आत जाऊ शकतो. हा आजार तोंडावाटून आत गेल्यानंतर तुम्हाला सर्दी, घसा दुखी असे काही त्रास होऊ लागतात. म्हणूनच तुम्ही तोंडाला हात लावू नका असे तुम्हाला सांगितले जाते.

मास्कचा गोंधळ घालू नका

shutterstock

आता या आजाराशी सामना करण्यासाठी तुम्हाला मास्क घालावा असे सांगण्यात आले आहे. कारण त्याचे जंतू तुमच्या तोंडावाटे शरीरात जाऊ नये इतकीच त्यामागची अपेक्षा आहे. पण सध्या बाहेर या मास्कचे इतके बाजारीकरण झाले आहे की, मास्कही मिळणे कठीण झाले आहे. जर तुम्हाला मास्क घेणे परवडत नसेल तर काहीच हरकत नाही घरी असलेल्या स्वच्छ रुमालाचा वापर तुम्ही मास्कप्रमाणे करु शकता.  जर तुम्हाला हा मास्क हाताने शिवता आले तर फार उत्तम. पण जर तसेही शक्य नसेल तर तुम्ही रुमाल सरळ स्कार्फप्रमाणे बांधा. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही साधा रुमाल मास्कप्रमाणे शिवून तो रोज बांधा. 3 ते 4 मास्क एकावेळीच तयार करा. दिवसभर मास्क वापरल्यानंतर तुम्ही तो गरम पाण्यात धुवा. त्यामध्ये डेटॉल घाला. ते उन्हात वाळवून छान इस्त्री करुन ते पुन्हा वापरा. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत तर होईलच. शिवाय ते स्वच्छ असतील याचीही खात्री होईल. 

कोरोना व्हायरसची झळ बॉलीवूडलाही

हँड सॅनिटायझरचा अति वापर टाळा

दुसरी गोष्ट सध्या सोन्याच्या भावात विकली जात आहे ती म्हणजे सॅनिटायझर. सगळीकडे सॅनिटायझर उपलब्ध असले तरी सुद्धा त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. तुम्हाला सॅनिटायझर घेणे शक्य नसेल तर तुम्ही स्वच्छ साबणाने हात धुवा. बोटांमध्ये साबण लावून साबणाचा फेस काढून हात पाण्याने धुवा. जेवणाआधी आणि बाहेरुन आल्यानंतर तुम्ही साबणाचा वापर करा.पण सतत दोन दोन मिनिटांनी त्याचा वापर करु नका. विशेषत: तुम्ही सॅनिटायझरचा वापर करु नका. कारण त्याचा अति वापर करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. कारण सॅनिटायझसाठी वापरलेले केमिकल्स जर तुमच्या पोटात गेले तरी तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.

कोरोना व्हायरसने मृत्यू ओढावतो का?

आतापर्यंत देशात कोरोना व्हायरमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथील एक वृद्धाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. पण WHOने दिलेल्या माहितीनुसार या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचा टक्का हा इतर आजारांच्या तुलनेत थोडा जास्त आहे. म्हणजे  3 % इतका आहे. पण जर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हा आजार तुम्हाला काहीच करु शकणार नाही. या आजाराचा त्रास लहान मुलांना आणि वयोवृद्धांना जास्त आहे त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्या. 


कोरोना संदर्भात पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु.


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.