गेल्या वर्षीपासून कोरोना आणि लॉकडाऊन या दोन्ही बाबींमुळे सामान्य माणूसच काय पण अगदी श्रीमंत समजल्या जाणाऱ्या बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवरही घर विकण्याची वेळ आल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरापासून केवळ मध्यमवर्गीय अथवा गरीब कुटुंबाचीच आर्थिक स्थिती बिघडलेली नाही. तर ग्लॅमर आणि सतत अॅक्टिव्ह असणारी अशा फिल्म इंडस्ट्रीचेही हाल होत आहेत. यामुळेच गेल्या वर्षात अनेक लहान कलाकारांनी मायानगरी मुंबईला कायमचा रामराम ठोकणं पसंत केलं. बऱ्याच कलाकारांनी आपल्या घरातील सिक्युरीटी कमी केली असून डिझाईनर कपड्यांची मागणीही अत्यंत कमी झाली आहे. काही जणांना आपली लाईफस्टाईल व्यवस्थित सांभाळण्यासाठी आपले घरही विकण्याची वेळ आली आहे. तर काही बॉलीवूड सेलिब्रिटींनी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्समध्ये पैसे लावले आहेत. कोरोनामुळे कमाई करणं अत्यंत कठीण होऊन बसल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवणुकीसाठी पर्याय शोधणे चालू झाले आहे.
इंडस्ट्रीवरही संकट
काहीच कलाकार असतील ज्यांच्यावर कोरोनाच्या या संकटाचा अथवा लॉकडाऊनचा काही परिणाम झाला नसेल. पण अन्यथा बाकी संपूर्ण इंडस्ट्रीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. 2021 च्या सुरूवातीला पुन्हा एकदा सुरळीत होईल अशी आशा जागृत झाली होती. चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू होऊन अनेक रखडलेले चित्रपट पुन्हा पाहायला मिळतील असं वाटले होते. पण पुन्हा कोरोनामुळे या सगळ्यावर गदा आली आहे. पुन्हा एकदा मागच्या वर्षीपासून रखडलेले चित्रपट तसेच राहिले आहेत. त्यामुळे या सहामाहीची परिस्थितीही सुधारणे शक्य वाटत नाही.
दिया मिर्झा लवकरच होणार आई, फोटो व्हायरल
80% महसूल झाला कमी
वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये 1833 चित्रपट प्रदर्शित झाले तर 2020 मध्ये केवळ 441 चित्रपट प्रदर्शित होऊ शकले. थिएटरकडून मिळणारा महसूल हा 80 % कमी झाला आहे. त्यामुळे मिळालेल्या एका रिपोर्टनुसार, एंटरटेनमेंट सेक्टरच्या एकूण उत्पन्नाच्या 24 टक्के उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे हा मोठा फटकाच बॉलीवूडला बसला आहे. तर स्टार्स आता डिझाईनर ड्रेस कमी ऑर्डर करत आहेत. शूटिंगशिवाय रेड कारपेट, पार्टीज अथवा खास कार्यक्रम यासाठी लागणारे ड्रेस आता घालता येत नाहीत. एका ड्रेसची किंमत ही दहा हजारापासून ते दहा लाख रूपयांपर्यंत असते. सेलिब्रिटी फॅशन डिझाईनर यामुळे फारच धास्तावले आहेत. ऑर्डर्स अर्ध्या झाल्यामुळे त्यांना 50 टक्के माणसंही कमी करावी लागली आहेत.
श्रद्धा कपूर पहिल्यांदाच साकारणार डबल रोल, ‘चालबाज इन लंडन’चा व्हिडिओ केला शेअर
सिक्युरीटी गार्ड केले कमी
काही स्टार्सच्या घरी 20 सिक्युरीटी गार्ड असायचे पण आता त्याची संख्या केवळ 5 वर आली आहे. त्यामुळे सिक्युरीटी गार्डच्या कामावरही आता गदा आली आहे. एकूण सगळीच कामे कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे एकंदरीतच कमी झाली असून बॉलीवूडवरही त्रासदायक स्थिती उद्बवली आहे. बऱ्याच लोकांचे रोजगारीचे कामही गेले आहे. अनेक ठिकाणी चित्रीकरणही थांबवण्यात आल्यामुळे रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांचेही हाल होत आहेत. तसंच सध्या इव्हेट, पार्टी, पुरस्कार सोहळे सर्वच बंद असल्यामुळे सगळ्यांवरच घरी बसण्याची वेळ आली आहे. सध्या बॉलीवूडचीही अत्यंत हालाखीची परिस्थिती असून हे असंच चालू राहिलं तर अजून कठीण परिस्थिती बघावी लागेल.
लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि पावभाजीवर अमृता-पुष्करने मारला ताव
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक