#Corona मुळे पापाराझ्झींनाही ब्रेक

#Corona मुळे पापाराझ्झींनाही ब्रेक

आपलं सोशल मीडिया फिड म्हणजे काय आहे तर सेलिब्रिटींचे फोटोग्राफ्स बरोबर ना. आपल्याला सेलिब्रिटींबाबत अपडेट ठेवण्याचं अविरत काम करत असतात ते म्हणजे पापाराझ्झी. गेल्या काही वर्षात सेलिब्रिटी जिथे जातील तिथे त्यांच्यामागे धावणारे कॅमेरा आपल्याला दिसतात. मग ते कुठे डिनरला गेले असोत वा फुटबॉल खेळणारा तैमूर असो किंवा जिममधून बाहेर पडणारी मलायका असो. तुम्हाला सेलिब्रिटींची प्रत्येक घडामोड पाहायला मिळते ती या पापाराझ्झींमुळे. पण कोरोनाचा परिणाम आता पापाराझ्झींच्या कामावरही होताना दिसत आहे. कारण का पुढचे काही दिवस त्यांनाही सक्तीचा ब्रेक देण्यात आला आहे. कोरोनामुळे असलेल्या भयपूर्ण वातावरणात पापाराझ्झींनीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता पुढचे काही दिवस तुम्हाला तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचे अपडेट्स नाही दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 

प्रसिद्ध बॉलीवूड पापाराझ्झी विरल भयानीने याबाबतची बातमी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. त्याने या बातमीच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, त्यांनी हे पाऊल उचलंल नसतं जर पापाराझ्झींच्या जीवाला धोका नसता. पण आता याची खरंच गरज आहे. त्याने असंही म्हटलं आहे की, यामुळे आता त्याच्या टीमला कुटुंबासोबत घालवण्यासाठी वेळ मिळेल.

खरंच पापाराझ्झींचे आयुष्य काही सोपं नाही. जिथे आपल्याला ग्लॅमर आणि सतत सेलिब्रिटीसोबत राहणं दिसतं. त्यामागे असते या पापाराझ्झींची मेहनत आणि तासंतास सेलिब्रिटींची वाट पाहण्याचं कसब. एखादा सेलिब्रिटी कधी बाहेर येईल किंवा एअरपोर्टला कधी पोचेल याची काहीच शाश्वती नसते. हातात जड कॅमेरा धरून गर्दीतून वाट काढत परफेक्ट शॉट घेणं सोपं नसतंच. पण तरीही ते सर्व प्रयत्न करून तो मिळवतातच. पण आता वेळ आहे ती स्वतःला जपण्याची. कारण सगळ्यांनाच घरी राहण्याबद्दल आणि महत्त्वपूर्ण काम असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे पापाराझ्झींसाठीही ब्रेक तो बनता है.

आपल्यासारख्या फॅन्ससाठी ही बातमी वाईट असली तरी सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. आशा करूया की, आपली परिस्थिती लवकरच बदलेल. तोपर्यंत सेलिब्रिटी जे स्वतः अपडेट करतील तेच पाहूया.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.