अजय देवगणच्या निसाला कोरोनाची लागण, काय म्हणाला अजय

अजय देवगणच्या निसाला कोरोनाची लागण, काय म्हणाला अजय

मुंबईत कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईत आणि राज्यात या आजाराची लक्षणे दिसून येण्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. अशामध्येच सिंघम अजय देवगणची मुलगी निसा हिला Novel Corona Virusची लागण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरु लागली आहे. काही दिवसांपूर्वी काजोल आपल्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यानंतर याची कुजबूज होऊ लागली होती. पण आता या बातमीने जोर धरला आहे. निसाला कोरोना झाल्याच्या बातम्या सगळीकडे येऊ लागल्यानंतर अजय देवगणने या बातमीचे स्पष्टीकरण केले आहे.

सोशल मीडियावर अपडेट राहण्यासाठी सेलिब्रिटींना Throwback चा आधार

निसाला झाला कोरोना

Instagram

काही दिवसांपूर्वी काजोल निसाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती. ती इतक्या घाईगडबडीत होती की, एका वेबसाईटने तिला कोरोना झाल्याचा निष्कर्ष काढला. निसाला कोरोनाची ताप, खोकला, सर्दी अशी लक्षण आढळून आली असून तिला कोरोना झाल्याच्या बातमीवर शिक्का मारण्यात आला. मग काय सगळीकडे ही चर्चा होऊ लागली. सदर वेबसाईटने ही बातमी अगदी सोळा आणे सच आहे अशी लिहून शेअर केल्यानंतर ही बातमी पसरायला फारसा वेळ गेला नाही. अखेर ही बातमी सिंघम अजय देवगणपर्यंत पोहोचली. 

या सगळ्या अफवा

Instagram

अजय देवगणणे या सगळ्या बातम्या ‘Baseless’ असल्याचे म्हटले आहे. कोरोना आणि निसाचा काहीही संबंध नसताना लोकांनी नाहक कोणत्यातरी गोष्टीचा संबंध जोडला आहे, असे त्याने एका टेलिफोनिक मुलाखतीत सांगितले. पण लोकांचा यावर विश्वास बसावा यासाठी त्याने एक ट्विट करत या गोष्टीचा खुलासा केला आहे. तो त्यात म्हणाला की, मला विचारल्याबद्दल तुमचे आभार.. काजोल आणि निसा दोघीही सुरक्षित आहेत. माझ्या कानावर त्या आजारी असल्याच्या बातम्या आल्या या खोट्या आहेत.’ त्यामुळे आता अजयनेच ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

वयाच्या पंधराव्या वर्षी मी घरातून पळाले होते आणि ड्रग एडीक्टही झाले होते

अफवांपासून दूर राहा

देशात इतरवेळीही अफवांचे पेव फुटते. आता तर अशी परिस्थिती आहे की, अनेकांना घराबाहेर न पडता केवळ सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे या माध्यमातून अनेक उलट- सुलट अफवा पसरवल्या जात आहे. काहींना व्हॉटसअॅप फॉरवर्डसवर आजुबाजूच्या परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याच्या बातम्या ही फिरत आहेत. त्यामुळे लोकं आणखी घाबरुन या बातम्या पुढे फॉरवर्ड करु लागली आहेत. आता या अफवांपासून दूर राहा असा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. कारण नाहक या अफवांमुळे कोणाचा तरी जीव जायचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुम्हीही अशा अफवांना भुलून ताण घेत असाल किंवा या बातम्या पुढे शेअर करत असाल तर असे करणे तुम्ही आताच थांबवा.

घरीच राहा

पुढचे काही दिवस आपल्यासाठी फार महत्वाचे असणार आहे कारण देशात एकही कोरोना रुग्ण आपल्याला ठेवायचा नाही. त्यासाठी ही धडपड सुरु आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नका. काही कारण असेल तर घराबाहेर पडा. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझर घेऊनच फिरा. 


आता अजय देवगणने या बातमीवरुन पडदा उठवला आहे. पण तुमच्याकडे येणाऱ्या फेक न्यूजवर तुम्ही आणि तुमच्या संपर्कातील इतरांना विश्वास ठेवायला देऊ नका.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.