ADVERTISEMENT
home / मनोरंजन
खिलाडी अक्षय कुमार ट्विंकलला घेऊन पोहोचला रुग्णालयात

खिलाडी अक्षय कुमार ट्विंकलला घेऊन पोहोचला रुग्णालयात

कधीही न थांबणारी मुंबई कोरोना व्हायरसमुळे गेल्या महिन्याभरापासून थांबली आहे. आता तर गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परदेशातून आलेल्या कनिका कपूरला याची लागण झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी रडारवर आले आहेत. खूप जणांना #homequarentine करण्यात आले आहेत. पण या लॉकडाऊनच्या काळात खिलाडी अक्षय  कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना रुग्णालयात जाताना दिसली आणि एकच गोंधळ उडाला. कोरोनाची लागण ट्विंकल खन्नाला तर झाली नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला. पण थोडं थांबा नेमकं या बाबत ट्विंकल खन्ना काय म्हणाली ते जाणून घ्या. 

Lockdown असूनही घराबाहेर पडला कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि ..

ट्विंकलने शेअर केला व्हिडिओ

ट्विंकल खन्ना

Instagram

ADVERTISEMENT

ट्विंकल खन्नाने रविवारी सकाळी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. गाडीतून ती कुठेतरी जात आहे. असे या व्हिडिओतून पहिल्यांदा दिसते. बाजूला अक्षय कुमार बसलेला असून तो गाडी चालवून नेत आहे. हा व्हिडिओ करताना ती म्हणाली की, मस्त रविवारचा दिवस आहे. मुंबईतील रस्ते ही रिकामी आहेत. आम्ही बाहेर पडलो आहोत ते हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. पुढे ती म्हणाली की, घाबरु नका मला कोरोना व्हायरस झाला नाही. तर माझ्या पायाला दुखापत झाल्यामुळे मला डॉक्टरांकडे जावे लागत आहे. अनेकांना ही शेवटची ओळ ऐकल्यानंतर हुश्श्य झालं असेल. नाहीतर आणखी एक कोरोना व्हायरसचा बळी म्हणून बातम्या करायलाही फारसा वेळ गेला नसता.

अकी बनला ड्रायव्हर

 ट्विंकल खन्ना गाडीत व्हिडिओ करत असली तरी या मास्क घातलेला अकी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. गाडी चालवताना त्याचे लक्ष अगदी जबाबदार नागरिकासारखे समोर आहे. शिस्तीच्या बाबतीत अकीचा हात कोणीच धरु शकत नाही. त्यामुळे तुम्ही गाडी चालवत असताना नको ती डेअरिंग करत असाल तर ती आताच थांबवा. शिवाय विनाकारण घराबाहेर पडणे सुद्धा टाळा. 

कोरोनावर मात करण्यासाठी कपिल शर्माची गोरगरिबांना लाखोंची मदत

अक्षयने केली मदत

देशाच्या कोणत्याही कामासाठी अक्षय हा फारच तत्पर असतो. देशसेवेसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न तो करतो. सध्याच्या महामारीविरोधात लढण्यासाठी देशाला आर्थिक साहाय्याची गरज आहे. त्यामुळे अक्षयने 25 कोटीची मदत सरकारला केली आहे. त्याने याबाबत कोणताही गवगवा केला नाही. पण त्याच्या मदतीने देशाला बराच आधार मिळणार आहे. या शिवाय अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या त्यांच्या राज्यात मदतीचा हात पुढे केला आहे. 

ADVERTISEMENT

अक्षयने घेतला घराबाहेर पडणाऱ्यांचा समाचार

अक्षय कुमार आता त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा त्याच्या चाहत्यांसाठी व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे. लोकांशी चांगल्या गोष्टी शेअर करत आहे. शिवाय घराबाहेर कारण नसताना पडणाऱ्यांची कानउघडणी करायलाही तो मागे पुढे पाहात नाही.त्याने एका व्हिडिओतून घराबाहेर पडून पोलीस यंत्रणांना त्रास देणाऱ्या लोकांची चांगलीच कानउघडणी केली आहे. 

समाधानाची बाब अशी की, ट्विंकलला कोरोना झालेला नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, अत्यावश्यक गोष्टीशिवाय बाहेर पडू नका हे देखील या व्हिडिओमधून कळत आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

29 Mar 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT