Corona virus च्या दिवसांमागे काय आहे नेमके गणित

Corona virus च्या दिवसांमागे काय आहे नेमके गणित

कोरोना संदर्भातील अनेक बातम्या आपण रोजच वाचत आहोत. टीव्हीवर पाहात आहोत. आधीच्या नियमांप्रमाणे आज आपण या लॉकडाऊनमधून सुटणार होतो. पण गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करत पुढील 21 दिवसांचा कालावधी वाढवून घेतला. आजही या व्हायरससंदर्भात लोकांना अनेक प्रश्न आहेत. हा व्हायरस किती वेळ अॅक्टिव्ह राहतो. 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा परिणाम काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण या संदर्भात थोडी अधिक माहिती घेऊया.

Corona Virus: अफवांना बळी पडून असे वागत असाल तर वाचा

म्हणून घेतला 21 दिवसांचा वेळ

आता अनेकांना असा प्रश्न पडला होता की, 21 दिवसांचा वेळ घेतल्यानंतर कोरोनाचा नायनाट होईल का? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट भारताची लोकसंख्या कोटीच्या घरात आहे. शिवाय येथे अनेक शहरांमध्ये दाटीवाटीने लोक राहतात. जर एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर हा विषाणू पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच सगळे काही लॉकडाऊन करण्याचा निर्णय यासाठी घेण्यात आला. या 21 दिवसांमध्ये जर कोणाला कोरोनाची लागण झाली असेल तर त्या व्यक्ती इतक्या गर्दीमध्ये ओळखण्यात यावा. त्यांचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये. साधारण तीन आठवड्यांचा कालावधी यासाठी घेण्यामागे हे कारण आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर तो गुणाकाराच्या तुलनेत फोफावतो हे होऊ नये म्हणूनही हा वेळ घेण्यात आली आहे.

किती दिवसांनी कळतो तुम्हाला झाला कोरोना

shutterstock

आता अनेकांना पडणारा प्रश्न म्हणजे कोरोनाच्या दिवसां मागचे गणित काय? आता काही आजारांची लक्षणं आपल्याला पटकन जाणवत नाही. कोरोना हा तुमच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून आहे. काही जणांमध्ये कोरोनाची लक्षण ही अवघ्या 4 ते 5 दिवसात दिसली तर काहींमध्ये ही लक्षण दिसायला काही वेळही लागला. काहींमध्ये कोरोनाची लक्षण ही 14 दिवसांनंतरही दिसली आहेत. त्यामुळे हा कालावधी अजूनही वेगवेगळा आहे. कारण मानवी शरीराबाहेर कोरोना हा व्हायरस किती दिवस जिवंत राहू शकतो हे माहीत नाही.

42 वर्षांपूर्वी हंता व्हायरसचा लागलाय शोध, जाणून घ्या नक्की कसा करायचा सामना

कोरोनाचा विषाणू कसा पसरतो

कोरोनाच्या विषाणूबाबत सांगायचे झाले तर आधी सापडलेल्या कोणत्याही विषाणूच्या तुलनेत हा जास्त जड असतो. त्यामुळे हा विषाणू हवे मार्फत पसरत नाही. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल ही व्यक्ती चारचौघात शिंकली असेल. त्या शिंकेतून येणारे थुंक जर त्यांच्या हाताला लागली किंवा तुमच्या अंगावर उडाली. तो हात तुम्ही जर तुमच्या डोळ्यांना किंवा तोंडाला लावला तर तो विषाणू तुमच्या शरीरात जाण्याची शक्यता आहे. अभ्यासानुसार आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार एका शिंकेतून 3हजार ड्रॉपलेट्स एकावेळी बाहेर येतात. हा व्हायरस नेमका कुठून आला हे अजूनही कळलेले नाही. त्यामुळे याबाबतही कोणतीही माहिती अद्याप कळू शकली नाही.

कोरोनाची ही आहेत लक्षण

shutterstock

कोरोनाची लक्षण ही या आधीही सांगण्यात आली आहे कोरोनामध्ये तुम्हाला ताप येतो, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास ही याची काही लक्षणं आहेत. तुम्हाला येणारा ताप हा कोरोनाचा ताप असेल हे सांगता येत नाही. पण आता जर तुम्हाला न्युमोनिया झाला असेल तरी देखील तुम्हाला कोरोनाची चाचणी करायला सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष करु नका.


आता या गोष्टी लक्षात घेत स्वत:ला घरीच रोखून धरा. म्हणजे कोरोनाचा विषाणूची साखळी तुटायला मदत होईल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.