‘मर्दानी 2’ च्या टीम मेंबर्संनी राणी मुखर्जीला दिलं 'हे' अविस्मरणीय गिफ्ट

‘मर्दानी 2’ च्या टीम मेंबर्संनी राणी मुखर्जीला दिलं 'हे' अविस्मरणीय गिफ्ट

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘मर्दानी 2’ मध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपासून जयपूरमध्ये सुरू असलेल्या मर्दानी 2 च्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. राणी मुखर्जी नुकतंच जयपूरमधलं या चित्रपटाचं शूटिंग संपवून  मुंबईत आली आहे. या शिवाय राणी आता मुंबईत यशराज फिल्ममध्ये ‘मर्दानी 2’ च्या पुढील शूटिंगसाठी ती सज्ज झाली आहे. मात्र जयपूरमधलं शूटिंग जरी संपलं  असलं तरी राणीच्या स्मरणात जयपूरमधल्या शूटिंगची आठवण नक्कीच कायम राहणार आहे. कारण जयपूरच्या शूटिंगच्या टीम मेंबर्संनी राणीला येताना एक फोटो फ्रेम गिफ्ट दिली आहे. बाबू सैनी या टीम मेंबरनी राणीला ही भेटवस्तू दिली आहे. ही फोटोफ्रेम म्हणजे राणीचं एक पेंटिग आहे. ज्यामध्ये राणी मुखर्जी 'मर्दानी 2' च्या डॅशिंग लुकमध्ये दिसत आहे. राणी हे पेटिंग तिच्या सोबत मुंबईला घेऊन आली आहे. आणि तिने तिच्या घरात एका महत्त्वाच्या ठिकाणी ते लावलं आहे. राणीसाठी हे पेटिंग खास असल्याचं यावरून दिसत आहे. 

Instagram

राणी मुखर्जी पुन्हा एकदा मर्दानी अवतारात

राणी मुखर्जीचा 'मर्दानी' 2014 साली एक हिट चित्रपट ठरला होता. मर्दानी या चित्रपटात राणी मुखर्जीने शिवानी शिवाजी रॉय या पोलिस अधिकाऱ्याची  भूमिका साकारली होती. या चित्रपटातील राणीच्या या हटके भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली प्रतिसाद दिला होता. लहान मुलींची मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश या विषयावर आधारित हा चित्रपट होता. आता मर्दानी चित्रपटाचा सिक्वल येत आहे. आता 'मर्दानी 2' मध्ये राणी मुखर्जी नेमकी कोणती भूमिका साकारणार या कडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या चित्रपटात राणी पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका साकारणार आहे. सध्या सिक्वल आणि पोलिसाच्या भूमिकांचा हिंदी चित्रपटात ट्रेंड आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वल येत  आहेत. शिवाय दबंग,सिंघम,सिम्बा, मर्दानी अशा अनेक चित्रपटामधून साकारलेल्या पोलिसांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. थोडक्यात चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेला एक प्रकारचं ग्लॅमर निर्माण झालं आहे. मात्र मर्दानी मधील भूमिका ही महिला पोलिस अधिकाऱ्याची असल्याने हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा असेल.

Instagram

राणी पुन्हा साकारणार पोलिस अधिकारी

राणी मुखर्जीने तिच्या या भूमिकेसाठी प्रंचड मेहनत घेतली असून ती तिच्या सोशल मीडियावरील फोटोजवरून दिसून येत आहे. एका डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणं नक्कीच तिच्यासाठी आव्हानात्मक असणार. या चित्रपटाची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करत आहे. तर दिग्दर्शक गोपी पुथरन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. वास्तविक राणीने लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर चित्रपटात काम करणं कमी केलं होतं. मर्दानी नंतर राणीने ‘हिचकी; या चित्रपटात काम केलं होतं. हिचकीमधील तिची भूमिकादेखील प्रंचड गाजली होती. राणी मोजक्या चित्रपटात काम करत असली तरी तिच्या भूमिका हटके आणि महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे आजही राणीचे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसतात. तिच्या भूमिकांचं नेहमीच कौतुक होत असतं.

अधिक वाचा

Throwback: अभिनेत्री किरण खेर यांनी अनुपम खेर यांच्याशी लग्न करण्यासाठी उचलंल होतं हे पाऊल

अबब! आगामी चित्रपटासाठी दीपिकाला मिळाले इतके मानधन

#BBM2 : बिग बॉसच्या घरात भरलीयं शाळा

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम